शहरं
Join us  
Trending Stories
1
ISI नं का घडवला मुंबईवर हल्ला?; पाकिस्तानी राष्ट्रपती जरदारीच्या प्रवक्त्याचा मोठा दावा
2
"...तोपर्यंत सरकार तुमच्यासमोर गुडघ्यावर येणार नाही"; कर्जमाफी घेण्यासाठी उद्धव ठाकरेंचा शेतकऱ्यांना सल्ला
3
मारुतीने आज जो इतिहास घडवला, टाटालाही झेपणार नाही; ४२ वर्षांत ३ कोटी कार विकल्या...
4
फक्त २९ पैशांचा शेअर थेट १०० रुपयांवर! १ लाखाच्या गुंतवणुकीतून झाला '३.४४ कोटींचा' नफा
5
जगातील अवघ्या ३ लोकांकडे आहे 'ही' कार! डिझाईन पाहून प्रेमात पडाल अन् किंमत ऐकून हैराण व्हाल!
6
१७ वर्षे एकाच कंपनीत काम केले, अचानक काढून टाकले, कर्मचाऱ्याने लाखमोलाचा दिला सल्ला, पोस्ट व्हायरल
7
मोदी सरकारचा मोठा निर्णय; ऑपरेशन सिंदूरनंतर पहिल्यांदाच पाकिस्तानात गेले 2100 भारतीय, कारण काय?
8
भाजी विक्रेत्याने जिंकली तब्बल ११ कोटींची लॉटरी; टॅक्स भरून हातात किती पैसे येणार?
9
चेज मास्टर विराट कोहलीचे व्यवसायिक साम्राज्य माहितीये का? क्रिकेटपेक्षा इथून करतो सर्वाधिक कमाई
10
Student Death: स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या सागरने आईच्या साडीनेच संपवले आयुष्य; एका तरुणीमुळे...
11
गुगल क्रोम वापरणाऱ्यांना मोठा धोका; हॅकर्सचं लक्ष तुमच्यावरच! सुरक्षित राहण्यासाठी 'ही' गोष्ट आताच करा
12
Shocking: गंमत म्हणून विवाहित महिलेनं डीएनए चाचणी केली, सासराच निघाला बाप!
13
देव तारी त्याला कोण मारी! भीषण रेल्वे अपघातात ढिगाऱ्याजवळ जिवंत सापडला चिमुकला, पण...
14
भाजपाची महिला पदाधिकारी, नेत्यांना पुरवायची मुली; बिहार निवडणुकीत वरिष्ठांनी दिली जबाबदारी
15
श्रीदेवीचा सुपरहिट सिनेमा 'मॉम'च्या सीक्वेलमध्ये दिसणार 'ही' अभिनेत्री, सेटवरील फोटो लीक
16
लाडकी बहीण अन् काय काय...! वर्षात १२ राज्यांनी महिलांना वाटले तब्बल १.६८ लाख कोटी रुपये
17
तो, ती आणि प्रेमाची बहार! पांड्यानं शेअर केला गर्लफ्रेंडसोबतचा खास व्हिडिओ
18
क्या बात! रितेश देशमुखच्या आईसाहेबांनी बल्बच्या प्रकाशात घेतलं ड्रॅगन फ्रूटचं पीक; सूनबाईंना कौतुक, शेअर केला व्हिडीओ
19
सोनाराच्या दुकानात ४ वर्ष काम केलं, रोज थोडं थोडं करून २.५ कोटींचं सोनं गायब केलं! कशी पकडली गेली चोरी?
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

मुख्यमंत्र्यांनी '' या '' ११ प्रश्नांची उत्तरे द्यावीत : राजू शेट्टी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 31, 2019 18:23 IST

... अन्यथा आम्ही देखील मुख्यमंत्र्यांच्या पाठोपाठ जनतेची आक्रोश यात्रा काढू, असा इशारा शेट्टी यांनी दिला.

ठळक मुद्दे स्वाभिमानी काढणार आक्रोश यात्रा

पुणे : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गुरुवारपासून महाजनादेश यात्रा काढत आहे. बांधकाम मजुरांचे मृत्यू, पीक विमा योजनेत खासगी कंपन्यांकडून करण्यात येणारी नफेखोरी, धनगर आरक्षण, कांदा आणि ठिबकचे थकलेले अनुदान अशा अकरा प्रश्नांची उत्तरे मुख्यमंत्र्यांना द्यावी लागतील. अन्यथा आम्ही देखील मुख्यमंत्र्यांच्या पाठोपाठ जनतेची आक्रोश यात्रा काढू, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिला. मुख्यमंत्री फडणवीस यांनी वसंतराव नाईक यांच्या नंतर सलग पाच वर्षे मुख्यमंत्री पदाची कारकीर्द पूर्ण केल्याचा उल्लेख करुन स्वत:ची पाठ थोपटून घेतली. आता अगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाजनादेश यात्रा काढत आहेत. पुणे शहरामधे बांधकाम मजुरांना आपले प्राण गमवावे लागले. बांधकाम कामगार मंडळाकडे दहा हजार कोटींचा निधी जमा झाला आहे. त्यातील किती पैसे बांधकाम मजुरांवर खर्च करण्यात आले. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, सहकारमंत्री सुभाष देशमुख, तानाजी सावंत, पंकजा मुंडे, राधाकृष्ण विखे-पाटील यांच्याशी संबंधित साखर कारखान्यांकडे ऊस बिलाची थकबाकी आहे. शेतकºयांनो धीर धरा असे आपण त्यांना सांगणार आहात का? असा प्रश्न शेट्टी यांनी या वेळी उपस्थित केला. धनगर समाजाला एसटी प्रवर्गाचे सर्व लाभ कसे देणार, लिंगायत समाजाला ओबीसीच्या सवलती कशा देणार, मराठवाड्यातून विमा कंपन्यांनी २९०० कोटी रुपये जमा केले. मराठवाड्यात तीव्र दुष्काळ असताना १२२१ कोटी रुपयांचा नफा मिळविला. हा नफा कसा कमावले हे आपण शेतकºयांना कसे सांगणार आहात. खरेतर सरकारने पीक विमा योजना नव्हे तर, प्रधानमंत्री कॉर्पोरेट कल्याण योजना सुरु केली असल्याची टीका शेट्टी यांनी केली. तसेच, मुख्यमंत्र्यांना या प्रश्नांची उत्तरे न दिल्यास मुख्यमंत्र्यांच्या महाजनादेश या यात्रा मार्गावरुन स्वाभिमानी संघटना जनतेची आक्रोश यात्रा काढेल, असे शेट्टी यांनी सांगितले. 

टॅग्स :PuneपुणेRaju Shettyराजू शेट्टीDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसGovernmentसरकारElectionनिवडणूक