शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

Uddhav Thackeray in Baramati: बारामतीच्या उबवणी केंद्रावरून उद्धव ठाकरेंचे भाजपावर वार; म्हणाले, विघ्न आणू नका!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 3, 2021 08:38 IST

Uddhav Thackeray in Baramati: आम्हीही २५-३० वर्षे नको ती अंडी उबविली, पुढे काय झाले ते तुम्ही बघत आहात,’ अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजप-सेना युतीवर भाष्य केले.

लोकमत न्यूज नेटवर्कबारामती : ‘राजकारणातही इन्क्युबेशन सेंटर आवश्यक असते. २५ ते ३० वर्षे आम्ही ते उघडले होते. इन्क्युबेशनला मराठीत उबवणी केंद्र म्हणतात. आम्हीही नको ती अंडी उबविली. पुढे काय झाले ते तुम्ही बघत आहात,’ अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजप-सेना युतीवर भाष्य केले.

येथील ॲग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टच्या कृषी महाविद्यालयाच्या आवारातील अटल इन्क्युबेशन सेंटरचे उद्घाटन मुख्यमंत्री ठाकरे यांच्या हस्ते मंगळवारी करण्यात आले. ते म्हणाले, पवारसाहेब आणि बाळासाहेबांची मैत्री सर्वश्रुत आहे. राजकारण असतं, पण ते चांगल्या कामात आणू नये. पाठिंबा देता येत नसला, तरी त्यात विघ्न आणू नये. 

शरद पवार म्हणाले की, देशातील ८१ टक्के शेतकऱ्यांकडे २ हेक्टरच्या आत जमीन आहे. त्यापैकी ६० टक्के शेतीला खात्रीचे पाणी नाही. ही शेती घर चालवू शकणार नाही. त्यासाठी शेतीपूरक व्यवसायावर भर देणे आवश्यक आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या सेंटरच्या माध्यमातून युवकांमध्ये संशोधनवृत्ती वाढण्यास मदत होईल, असा विश्वास व्यक्त केला. 

ॲग्रिकल्चरल डेव्हलपमेंंट ट्रस्टचे अध्यक्ष राजेंद्र पवार, खासदार सुप्रिया सुळे, उद्योजक बाबा कल्याणी, अतुल किर्लाेस्कर यांचीही भाषणे झाली. यावेळी रश्मी ठाकरे, राज्यमंत्री दत्तात्रय भरणे, आमदार रोहित पवार, विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे, आदी उपस्थित होते.

...पण धूर काढू नका- कुणी म्हणतायत फटाके फुटणार आहेत, फटाके फोडा; पण धूर काढू नका. कोरोना अजून गेला नाही, असा टोला मुख्यमंत्र्यांनी देवेंद्र फडणवीस यांचे नाव न घेता लगावला.- शरद पवारांनी विकासाचा सूर्य दाखविला. ते अजूनही थांबायला तयार नाहीत. त्यांचे काम अविरत सुरू आहे. आज देशातले सर्वांत मोठे इन्क्युबेशन सेंटर पाहतोय. संपूर्ण पवार कुटुंब विकासाच्या ध्यासाने काम करतंय’, असे ते म्हणाले.

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेSharad Pawarशरद पवारAjit Pawarअजित पवार