शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
6
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
7
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
8
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
9
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
10
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
11
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
12
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
13
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
14
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
15
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
16
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
17
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
18
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
19
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
20
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
Daily Top 2Weekly Top 5

"भाजपचे हिंदुत्व चिनी मालाप्रमाणे बनावट, मनीलाँड्रिंग तसे यांचे ह्युमन लाँड्रिंग": मुख्यमंत्री

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 2, 2022 09:25 IST

दुसरीकडे असताना भ्रष्टाचारी आणि तुमच्याकडे आल्यावर गोमूत्र शिंपडल्यावर पवित्र झाला का, मुख्यमंत्र्यांचा प्रश्न

मुंबई : बनावट चिनी मालाप्रमाणे भाजपवाले बनावट हिंदुत्ववादी आहेत. मनीलाँड्रिंगप्रमाणे भाजपमध्ये ह्युमन लाँड्रिंग चालते. भ्रष्ट नेत्यांना धुऊन घेतात, अशी शेलकी टीका शिवसेना पक्षप्रमुख मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली. दुसरीकडे असताना भ्रष्टाचारी आणि तुमच्याकडे आल्यावर गोमूत्र शिंपडल्यावर पवित्र झाला का, असा प्रश्न त्यांनी केला. उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र व कोकणात दि. २६ ते २९ मे या दरम्यान शिवसंपर्क अभियान राबविण्यात येणार आहे. त्यानिमित्ताने शिवसेनेच्या राज्यातील पदाधिकाऱ्यांशी व्हीसीच्या माध्यमातून त्यांनी संवाद साधला. विक्रांत निधीमध्ये घोटाळा करणारे भ्रष्टाचाराचे मेरुमणी  आमच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करत आहेत. आम्ही हिंदुत्वाच्या विरोधात आहोत, असे सांगत आहेत. तुमची ओळख नसताना, तुम्हाला काडीची किंमत नसताना मांडीवर घेतले आणि आम्ही या नकली व बनावट हिंदुत्ववाद्यांना पोसले. देशाच्या शत्रूंपेक्षा पक्षाचे शत्रू संपविण्याचे काम सुरू आहे, अशा शब्दात ठाकरे यांनी भाजपला सुनावले. 

कितीही अडचणी येऊ द्या, महाराष्ट्र धर्म फडकणारच कितीही अडथळे आणि संकटं येऊ देत, महाराष्ट्राची घोडदौड सुरूच राहील. महाराष्ट्र धर्माची पताका देशातच नव्हे तर विश्वात फडकविल्याशिवाय राहणार नाही, असा निर्धार व्यक्त करत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्र दिनाच्या पूर्वसंध्येला राज्यातील जनतेला शुभेच्छा दिल्या. माझे सर्वांना, अगदी विरोधी पक्ष आणि संघटना यांनादेखील कळकळीचे आवाहन आहे की, मनात विद्वेष न ठेवता महाराष्ट्राचा देशातच नव्हे तर जगात डंका वाजविण्यासाठी एकत्र येऊन महाराष्ट्राची पताका हातात घेऊयात, असेही मुख्यमंत्री म्हणाले.

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसBJPभाजपा