शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
3
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
4
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
5
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
6
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
7
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
8
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
9
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
10
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
11
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
12
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
13
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
14
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
15
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
16
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
17
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
18
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
19
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
20
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार

एक बेडूक आणि त्याची पिल्लं ओरडत सुटलेत; उद्धव ठाकरेंचा राणे कुटुंबीयांवर प्रहार

By ravalnath.patil | Updated: October 25, 2020 21:13 IST

Uddhav Thackeray’s speech at Dussehra melava : राज्यात सत्ता आल्यानंतरचा आणि उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपद स्वीकारल्यानंतर पहिल्याच दसरा मेळाव्यात जनतेशी संवाद साधला.

ठळक मुद्देराज्यातली महाविकास आघाडीचे सरकार पाडण्याच्या गोष्टी काहीजण करत आहेत. त्यासाठी तारीख पे तारीख देत आहेत. हिंमत असेल तर त्यांनी सरकार पाडून दाखवा, असे आव्हान उद्धव ठाकरे यांनी विरोधकांना दिले.

मुंबई : राज्यात काहीजणांना माणसांची इंजेक्शन्स लागू पडत नाहीत. त्यांना गुराढोरांची इंजेक्शन्स लागतात. गेल्या काही दिवसांपासून एक बेडूक आणि त्याची पिल्लं शिवसेनेविरोधात ओरडत फिरत आहेत, अशी घणाघाती उद्धव ठाकरे यांनी भाजपाचे नेते नारायण राणे आणि नितेश राणे यांच्यावर केली. उद्धव ठाकरे यांनी दसरा मेळाव्यातून जनतेशी ऑनलाईन संवाद साधला. राज्यात सत्ता आल्यानंतरचा आणि उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपद स्वीकारल्यानंतर पहिल्याच दसरा मेळाव्यात जनतेशी संवाद साधला. यावेळी उद्धव ठाकरे यांनी विरोधकांचा खरपूस भाषेत समाचार घेतला. 

भाजपामध्ये प्रवेश केल्यापासून नारायण राणे आणि नितेश राणे सातत्याने शिवसेना आणि उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करत आहेत. या टीकेला उद्धव ठाकरे यांनी तितक्याच सडेतोड भाषेत प्रत्युत्तर दिले. राज्यात काही जणांना इंजेक्शन देणे गरजेचे असते ते आम्ही देतो. बेडके किती ही फुगले तरीही ते वाघ होत नाहीत, तुम्हाला माहिती आहे. एक बेडूक आणि त्याची दोन पोरं या पक्षातून त्या पक्षात उड्या मारतात. आपण गोष्टीत बेडकीने बैल पाहिला हे ऐकले असेल. पण या बेडकाच्या पिल्लांनी वाघ पाहिला. त्यानंतर ही पिल्ले आपल्या वडिलांकडे गेली. तेव्हा मोठ्या बेडकाने ओरडायचा प्रयत्न केला. पण त्याचा आवाज आता चिरका झालाय, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली.

याचबरोबर, राज्यातली महाविकास आघाडीचे सरकार पाडण्याच्या गोष्टी काहीजण करत आहेत. त्यासाठी तारीख पे तारीख देत आहेत. हिंमत असेल तर त्यांनी सरकार पाडून दाखवा, असे आव्हान उद्धव ठाकरे यांनी विरोधकांना दिले. आम्ही गुळाला चिकटलेले मुंगळे नाहीत. महाराष्ट्र हा लेच्या पेच्यांचा प्रदेश नाही, हे वाघांचं राज्य आहे. जो महाराष्ट्रच्या हिताच्या आडवा येईल त्याला आडवा पाडून गुडी उभी करणार. असा इशारा उद्धव ठाकरे यांनी दिला. तसेच, देशात कोरोनाचं संकट असताना त्यांना राजकारण सूचतंय. निवडणुकीच्या तोंडावर बिहारमध्ये मोफत कोरोनाची लस देण्याची घोषणा करता. मग उर्वरित भारत काय बांगलादेश आहे का? त्यांच्याकडून पैसे घेणार का? असा सवाल उद्धव ठाकरे यांनी विचारला.

 काय म्हणाले उद्धव ठाकरे?- हिंमत असेल तर सरकार पाडून दाखवा.- वाटेला जात तर मुंगळा कसा डसतो, ते दाखवू. - वाघाची अवलाद आहे, डिवचाल तर पस्तवाल.- महाराष्टाच्या हिताच्या आड येणाऱ्यांच्या छाताडावर गुढी पाडवा साजरा करेन.- मला संयमचे महत्त्व कळतं.- मी आज मुख्यमंत्रीपदाचा मास्क काढून टाकलाय. - वाघाला डिवचण्याचा प्रयत्न केला तर फटका मारणारचं.- घंटा बडवा थाळ्या बडवा हे तुमचं हिंदुत्व, आमचं हिंदुत्व असलं नाही, हिंदुत्व हे आमचं राष्ट्रीयत्व.- बाबरी वेळी शेपट्या घालणारे हिंदुत्त्वावर प्रश्न विचारतायेत.- इथे गाय म्हणजे माता, पलिकडे जाऊन खाता,  गोव्यात गोवंश बंदी का नाही- सरसंघचालकांकडून हिंदुत्व शिकून घ्या, भाजपाला टोला- राजकारण म्हणजे शस्त्रूमधील युद्ध नव्हे, हे सरसंघचालकाकडून शिकावे.- गोव्यात गोवंश हत्येला बंदी का नाही? उद्धव ठाकरेंचा भाजपाला सवाल- देश संकटात आहे आणि हे राजकरण करत आहे.- कोरोना आहे, संकटं आहेत, जीएसटी नाही, पैसे येणार कुठून? - आमचा जीएसटीचा निधी केंद्र सरकार का देत नाही?- जीएसटी सदोष असेल तर मोदींनी मागे घ्यावी .- सर्व मुख्यमंत्र्यांनी जीएसटी रद्द करण्याची मागणी करावी.- जीएसटी फेस गेली असेल तर पंतप्रधानांनी माफी मागावी.. -संघमुक्त भारत म्हणणारे नितीश कुमार चालतात- दानवेंचा बात दिल्लीत असेल माझा बाप भाडोत्री नाही.- सेक्युलरपणाची लस कुणी कुणाला?- दानवेंचा बात दिल्लीत असेल माझा बाप भाडोत्री नाही.- घरी खायला मिळत नाही म्हणून मुंबईत यायचं.- बिहारमध्ये मोफत लस, मग आम्ही काय बांगलादेशचे?- महाराष्ट्र पुढं जातोय म्हणून बदनामी करायची.- मला माझ्या पोलीस दलाबद्दल अभिमान आहे .- छाताडावर गोळ्या झेलून अतिरेक्यांना पकडणारे माझे पोलीस, मला त्यांचा प्रचंड अभिमान.- मुंबई हा पाकव्याप्त काश्मीर आहे म्हणणारा रावण आला आहे .- घरी खायला मिळत नाही म्हणून मुंबईत यायचं आणि मुंबईशी नमकहरामी करायची, उद्धव ठाकरेंचा कंगनावर प्रहार- आमच्या अंगणात तुळशीची वृंदावने आहेत, गांजाची वृंदावने नाहीत.- आमच्या अंगावरती येत आहात,महाराष्ट्र द्वेष पाहिल्यानंतर मी महाराष्ट्राच्या जनतेला आवाहन करतो, सावध राहा .- आदित्य, ठाकरे कुटुंबावर चिखलफेक झाली हे भयंकर होतं. बिहारच्या सुपुत्रार चिखलफेक करणारे महाराष्ट्राच्या सुपुत्रावर चिखलफेक करतायेत.- तुम्ही रातोरात झाडांची कत्तल करत होता, आम्ही ८०८ एकराचं जंगल वाचवलं, एक रुपया खर्च न करता मेट्रो कारशेड उभारतोय- बेडूक आणि त्याची पिल्लं वाघ पाहून ओरडत सुटलेत; उद्धव ठाकरेंचा राणे कुटुंबीयांवर प्रहार - केवळ पाडापाडी करण्यात भाजपा  ा रस  हे, ही अराजकता आहे- विरोधक म्हणजे अहंकारी राजा आणि कळसुत्री बाहुल्या आहेत - महाराष्ट्र आता कळसुत्री बाहुल्यांचा खेळ होणार नाही

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेNarayan Raneनारायण राणे DasaraदसराShiv SenaशिवसेनाBJPभाजपा