शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

शिवसेना नाणारवरुन यू टर्न घेणार? मुख्यमंत्री कोकणात असूनही आंदोलकांची भेट नाकारणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2020 10:34 IST

दोन दिवसांपूर्वी सामनाच्या पहिल्या पानावर नाणारची जाहिरात; शिवसेनेची भूमिका बदलल्याची चर्चा

मुंबई: मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या दोन दिवसीय कोकण दौऱ्याला सुरुवात होताच नाणार रिफायनरी प्रकल्पाचा मुद्दा तापला आहे. दोनच दिवसांपूर्वी शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामनाच्या पहिल्याच पानावर नाणार रिफायनरीची जाहिरात प्रसिद्ध झाली होती. त्यामुळे शिवसेनेचा नाणार विरोध मावळल्याची चर्चा सुरू झाली. त्यामुळेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर नाणार प्रकल्पविरोधी समिती आक्रमक झाली आहे. मात्र मुख्यमंत्री वेळेअभावी आंदोलकांची भेट घेणार नसल्याचं वृत्त 'एबीपी माझा'नं दिलं आहे. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यानंतर पहिल्यांदाच कोकण दौऱ्यावर येत आहेत. रायगड, रत्नागिरी आणि त्यानंतर ते सिंधुदुर्गला जाणार आहेत. सकाळी रायगडचा दौरा केल्यानंतर ते रत्नागिरील्या गणपतीपुळे इथे दाखल होतील. गणपतीपुळेत आल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सुरुवातीला श्रींचे दर्शन घेणार आहेत. त्यानंतर विकास आराखड्यातील प्रमुख कामांचे भूमिपूजन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार आहे.उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यासाठी शिवसेनेनं जोरदार तयारी केली आहे. या दौऱ्यादरम्यान उद्धव ठाकरे नाणारवर काय बोलणार याकडे साऱ्यांचं लक्ष लागलं आहे. भाजपासोबत सत्तेत असताना शिवसेनेनं कायम नाणार प्रकल्पाला विरोध केला. उद्धव यांनी गेल्या एप्रिल महिन्यात नाणारला भेट दिली होती. नाणार जाणार नाही, तर इथे होऊ घातलेला प्रकल्प जाणार, अशी स्पष्ट भूमिका त्यांनी घेतली होती. नाणारवरुन शिवसेना आणि भाजपा आमनेसामने आल्याचं चित्रदेखील पाहायला मिळालं होतं.शिवसेनेची भूमिका बदलली?दोनच दिवसांपूर्वी (१४ फेब्रुवारी) शिवसेनेच्या सामनाच्या कोकण आवृत्तीच्या पहिल्याच पानावर रत्नागिरी रिफायनरी अ‍ॅण्ड पेट्रोकेमिकल्स लिमिटेडची (आरआरपीसीएल) जाहिरात छापून आली. नाणारमुळे स्थानिकांना रोजगार आणि उत्तम शैक्षणिक सुविधा उपलब्ध होतील, असा मजकूर या जाहिरातीत होता. 'रत्नागिरी रिफायनरीचे प्रत्येक पाऊल कोकणवासियांच्या उन्नतीसाठीच', असा  उल्लेख जाहिरातीमध्ये होता.

नाणार रिफायनरीच्या उभारणीत दीड लाख लोकांना रोजगार मिळेल. रिफायनरी कार्यान्वित झाल्यामुळे २० हजार जणांना थेट रोजगार उपलब्ध होईल. सर्वोत्तम शैक्षणिक सुविधा मिळतील. यामुळे कोकणवासियांचं स्थलांतर थांबेल, असा दावा आरआरपीसीएलनं जाहिरातीत करण्यात आला होता.  

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेShiv SenaशिवसेनाNanar Refineryनाणार तेल शुद्धिकरण प्रकल्पnanar refinery projectनाणार प्रकल्प