शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

काही जण फक्त मोठमोठं तत्वज्ञान सांगतात; पवारांच्या बारामतीतून मुख्यमंत्र्यांचा निशाणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 16, 2020 13:09 IST

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची बारामतीमधून फटकेबाजी

बारामती: काही जण फक्त मोठंमोठं तत्वज्ञान सांगतात. पण बारामतीमधल्या कृषी प्रदर्शनात सर्व गोष्टींची प्रात्यक्षिकं पाहायला मिळतात, असं म्हणत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवारांचं कौतुक केलं. बारामतीमध्ये आयोजित करण्यात आलेल्या कृषिक प्रदर्शनाचं मुख्यमंत्र्यांनी आज उद्घाटन केलं. यानंतर त्यांनी उपस्थितांशी संवाद साधताना शरद पवारांच्या बारामतीमधल्या कामाची मुक्तकंठानं प्रशंसा केली. मी याआधीही अनेक प्रदर्शनं पाहिली आहेत. मात्र आज बारामतीमधल्या प्रदर्शनाला आलो नसतो, तर मोठ्या अनुभवाला मुकलो असतो, असं उद्धव ठाकरे म्हणाले. यावेळी त्यांनी शरद पवारांच्या बारामतीमधल्या कामाचं तोंडभरुन कौतुक केलं. काही जण फक्त मोठंमोठं तत्त्वज्ञान सांगतात. मात्र इथं प्रात्यक्षिकं पाहायला मिळतात, असं उद्धव ठाकरे म्हणाले. या विधानातून उद्धव यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर अप्रत्यक्षपणे निशाणा साधल्याचं बोललं जात आहे. इवलेसे रोप लाविले दारी, त्याचा वेलू गेला गगनावरी, त्याचा जिवंत अनुभव बारामतीत येतो, अशा शब्दांत उद्धव यांनी शरद पवारांवर स्तुतीसुमनं उधळली. 'एका माळरानावर पवारांनी नंदनवन उभं केलं. त्यांच्या या कामाचं कौतुक व्हायलाच हवं. आमचे राजकीय मतभेद असू शकतात. पण झालेलं काम नाकारणं हा करंटेपणा झाला. तो मी करणार नाही,' असं उद्धव यांनी म्हटलं. शेतकऱ्यांनी नवं तंत्रज्ञान स्वीकारायला हवं. काही शेतकरी तर स्वत: अतिशय कल्पकतेनं नवे शोध लावत आहेत, असं उद्धव ठाकरे म्हणाले. यावेळी त्यांनी चंद्रपूरमधल्या एका शेतकऱ्याचं उदाहरण दिलं. चंद्रपुरातल्या एका शेतकऱ्यानं अतिशय मेहनतीनं तांदळाचं वाण शोधून काढलं. त्यावेळी त्याच्या हातावर एचएमटीचं घड्याळ होतं. त्यामुळे त्या वाणाला त्यानं एचएमटी नाव दिलं. शेवटी त्याच्या हातात घड्याळ होतं ना, असं म्हणत उद्धव यांनी व्यासपीठावर उपस्थित असलेल्या शरद पवारांकडे पाहिलं. यानंतर कार्यक्रमस्थळी एकच हशा पिकला.  

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेSharad Pawarशरद पवार