शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
3
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
4
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
5
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
6
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
7
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
8
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
9
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
10
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
11
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
12
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
13
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
14
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
15
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
16
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
17
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
18
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
19
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
20
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
Daily Top 2Weekly Top 5

लोकप्रिय मुख्यमंत्र्यांच्या यादीत उद्धव ठाकरे केजरीवालांच्याही पुढे; पण...

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 2, 2020 15:48 IST

लोकप्रिय मुख्यमंत्र्यांच्या यादीत ठाकरे पाचव्या क्रमांकावर; पहिल्या पाचांत भाजपाचा एकही मुख्यमंत्री नाही

मुंबई: प्रशासनाचा फारसा प्रत्यक्ष अनुभव नसताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सध्या कोरोना संकट हाताळत आहे. राज्यातील कोरोना रुग्णांचा आकडा ७० हजारांच्या पुढे गेला आहे. तर मृतांचा आकडादेखील सर्वाधिक आहे. सत्तेवर आल्यानंतर अवघ्या काही महिन्यांतच कोरोनाशी दोन हात करणाऱ्या मुख्यमंत्री ठाकरेंची लोकप्रियता चांगली असल्याचं एका सर्वेक्षणातून समोर आलं आहे. तीनच महिन्यांपूर्वी प्रचंड बहुमतानं दिल्लीतील सत्ता राखणाऱ्या अरविंद केजरीवाल यांच्यापेक्षा ठाकरेंची लोकप्रियता जात असल्याचं सर्वेक्षणातील आकडेवारी सांगते.सी व्होटर संस्थेनं देशातील नेत्यांच्या लोकप्रियतेचा आढावा घेण्याचा प्रयत्न केला. त्यात ६६ टक्के लोकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पारड्यात आपलं मत टाकलं. तर २३ टक्के लोकांनी राहुल यांना पसंती दिली. देशातली सगळी राज्यं आणि केंद्रशासित प्रदेशातील ३ हजारहून जणांची मतं सी-व्होटरनं विचारात घेतली. यामधून मुख्यमंत्र्यांच्या लोकप्रियतेचा आढावादेखील घेण्यात आला. सर्वाधिक लोकप्रिय मुख्यमंत्र्यांच्या यादीत ओदिशाचे नवीन पटनायक पहिल्या स्थानी आहेत. त्यांची लोकप्रियता जवळपास ८३ टक्के इतके आहेत. त्यांच्यानंतर छत्तीसगडचे भूपेश बघेल (८१ टक्के), केरळचे पिनरायी विजयन (८० टक्के), आंध्र प्रदेशचे जगनमोहन रेड्डी (७८ टक्के) यांचा क्रमांक लागतो. या यादीत उद्धव ठाकरे पाचव्या स्थानी (७६ टक्के) आहेत. ठाकरे यांच्यानंतर अरविंद केजरीवाल यांचा क्रमांक लागतो. त्यांची लोकप्रियता ७४ टक्के इतकी आहे. विशेष म्हणजे या यादीतील पहिल्या सहा नावांमध्ये एकही मुख्यमंत्री भाजपाचा नाही.अतिशय कमी लोकप्रियता असलेल्या मुख्यमंत्र्यांच्या यादीत हरयाणाचे मनोहर लाल खट्टर पहिल्या स्थानी आहेत. त्यांची लोकप्रियता केवळ ४.४७ टक्के आहे. त्यानंतर उत्तराखंडचे त्रिवेंद्र सिंह रावत (१७.७२ टक्के), पंजाबचे कॅप्टन अमरिंदर सिंग (२७.५१ टक्के), बिहारचे नितीश कुमार (३०.८४ टक्के), तमिळनाडूचे पलानीस्वामी (४१.२८ टक्के) यांचा क्रमांक लागतो.

खबरदारी घ्या, सूचनांचं पालन करा, वादळानंतर पर्यावरणमंत्र्यांचं जनतेला आवाहन...तर ठाकरे सरकार कोणीही वाचवू शकणार नाही; अमित शहांचं सूचक विधान

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेArvind Kejriwalअरविंद केजरीवाल