शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
3
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
4
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
5
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
6
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
7
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
8
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
9
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
10
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
11
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
12
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
13
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
14
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
15
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
16
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
17
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
18
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
19
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
20
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
Daily Top 2Weekly Top 5

शिवसेनेचं ठरलं; उद्धव ठाकरे आमदारकीसाठी निवडणार 'वरचा मार्ग'

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2020 11:44 IST

उद्धव ठाकरेंना सहा महिन्यांत विधिमंडळात निवडून यावं लागणार आहे.

मुंबई: युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे निवडणूक लढवणारे पहिले ठाकरे ठरले. मुंबईतील वरळी मतदारसंघातून विधानसभेची निवडणूक जिंकणारे आदित्य महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये कॅबिनेट मंत्रीदेखील झाले. यानंतर आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे नेमकं काय करणार याकडे राज्याचं लक्ष लागलं आहे. मात्र उद्धव ठाकरे विधानसभा निवडणूक न लढवता विधानपरिषदेचे सदस्य होण्याची शक्यता आहे. 'मुंबई मिरर'नं याबद्दलचं वृत्त दिलं आहे.एप्रिलमध्ये विधान परिषदेच्या अनेक जागा रिक्त होणार आहेत. त्याचवेळी उद्धव ठाकरे निवडणूक लढवतील, अशी माहिती शिवसेनेच्या एका वरिष्ठ पदाधिकाऱ्यानं दिल्याचं 'मुंबई मिरर'नं म्हटलं आहे. 'विधान परिषदेचे सदस्य विधानसभेच्या आमदारांमधून निवडले जातात. विधानसभेत शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडे पुरेसं संख्याबळ आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे बिनविरोध निवडून येतील', असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. विधानसभा किंवा विधानपरिषदेवर निवडून येण्यासाठी मुख्यमंत्र्यांकडे सहा महिन्यांचा कालावधी असल्याचंदेखील या नेत्यानं सांगितलं. धनंजय मुंडेंनी विधानसभा निवडणूक जिंकल्यामुळे विधानपरिषदेची जागा रिक्त झाली. त्यामुळे याच जागेवरुन उद्धव ठाकरे विधानपरिषदेची निवडणूक लढवतील अशी शक्यता होती. मुंडेंचा विधानपरिषदेतील कार्यकाळ जुलै २०२२ मध्ये संपणार होता. त्यामुळे उद्धव यांनी ती जागा लढवल्यास त्यांचा कार्यकाळ पुढील अडीच वर्षात संपेल. तसं झाल्यास त्यांना पुन्हा एकदा निवडणूक लढवाली लागेल. त्यामुळेच एप्रिलमध्ये विधानपरिषद लढवून ६ वर्ष विधानपरिषदेवर राहण्याची तयारी उद्धव ठाकरेंनी सुरू केली आहे. महाविकास आघाडी सरकारचा कार्यकाळ २०२४ मध्ये संपणार आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे एप्रिलमध्ये विधानपरिषद लढवतील आणि २०२६ पर्यंत विधानपरिषदेचे सदस्य राहतील, अशी माहिती शिवसेनेच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यानं दिली.उद्धव ठाकरे विधानसभा निवडणूक लढवण्यास फारसे उत्सुक नसल्याचंदेखील या पदाधिकाऱ्यानं सांगितलं. 'माहीम किंवा शिवडी मतदारसंघातून उद्धव ठाकरेंनी निवडणूक लढवावी असा आग्रह होता. मात्र त्यासाठी विद्यमान आमदाराला राजीनामा द्यावा लागेल. याशिवाय संपूर्ण पक्षाला त्या मतदारसंघाकडे लक्ष द्यावं लागेल. त्यापेक्षा विधान परिषदेच्या निवडणुकीची प्रक्रिया अतिशय सोपी आहे,' असं या नेत्यानं म्हटलं.  

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेShiv Senaशिवसेना