शहरं
Join us  
Trending Stories
1
"अरे कहना क्या चाहते हो.." डायलॉगफेम फेम ज्येष्ठ अभिनेते अच्युत पोतदार काळाच्या पडद्याआड
2
शाळेला निघालेली मुलं पाेलिस ठाण्यात! माटुंगा येथे दोन स्कूल बस अडकल्या गुडघाभर पाण्यात...
3
अतिवृष्टीचा ४ लाख हेक्टरवरील पिकांना फटका; मुंबईसह कोकण, मराठवाड्यात पावसाचे धुमशान
4
मुंबई: वडाळ्यात बेस्ट बसच्या धडकेत टॅक्सीची वाट बघत उभ्या असलेल्या आई, मुलाचा मृत्यू
5
माेफत शिका, तुम्हीही ‘एआय’ एक्स्पर्ट बना; केंद्राच्या स्वयम पोर्टलवर अनेक काेर्सेस उपलब्ध
6
मुंबई, ठाण्याची दैना; आठवड्याच्या पहिल्याच दिवशी दाणादाण; आज रेड अलर्ट तर उद्या यलाे अलर्ट!
7
मुख्य निवडणूक आयुक्तांविरोधात ‘इंडिया’कडून महाभियोगाची तयारी; मतदारयादी त्रुटींबाबत आक्रमक
8
"अख्खा जिल्हा, ९९१ एकर जमीन एकाच कंपनीला दिली, ही काय चेष्टा लावलीय का?" हायकोर्ट संतापले
9
माणुसकीला काळीमा फासणारी घटना! ४ वर्षाच्या मुलाचं गुप्तांग कापलं; कारण ऐकून संताप अनावर होईल
10
टोल नाक्यावर सैन्यातील जवानाला मारहाण, NHAI ची मोठी कारवाई; कंपनीला २० लाख दंड, सोबतच...
11
LGEC 2025: 'लाडकी बहीण' योजनेमुळे महाराष्ट्रातील अर्थव्यवस्थेला चालनाच मिळाली; सुनील तटकरेंनी समजावलं 'गणित'
12
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानला जवळ केले! पण अमेरिकी कंपन्यांसाठी धोक्याची घंटा ठरणार
13
भारताच्या मुख्य निवडणूक आयुक्तांना संविधानाचं 'सुरक्षा कवच'; पदावरून हटवणं इतकं सोपं नाही, कारण...
14
Asia Cup 2025 : आता बुमराहला विश्रांतीच घेऊ द्या! आशिया कप स्पर्धेआधी असं का म्हणाले गावसकर?
15
संतापजनक! 23 वर्षीय तरुणीवर अनेक वेळा बलात्कार, सराफा व्यावसायिकाने व्हिडीओही बनवले
16
Mumbai Rain : हवामान विभागाकडून मुंबईला अतिसतर्कतेचा इशारा; मंगळवारी शाळांना सुट्टी जाहीर
17
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली महत्त्वाची बैठक; ७ केंद्रीय मंत्री राहणार उपस्थित
18
ज्याने ओळखले त्याला १०० तोफांची सलामी! हर्ष गोएंकांनी खाल्लेल्या टोस्टचा तुकडा शेअर केला...
19
अ‍ॅप्पलने मोठी डील केली...! २.७ लाख स्के. फुटांचे ऑफिस भाडेतत्वावर घेतले, १०१८ कोटी मोजणार... 
20
Amreen Kaur Vikramaditya Singh: कोण आहेत अमरीन कौर ज्यांच्यासोबत मंत्री विक्रमादित्य सिंह करणार लग्न?

"घरी खायला मिळत नाही, मुंबईत यायचं आणि मुंबईशी नमकहरामी करायची", उद्धव ठाकरेंचा कंगनावर हल्लाबोल

By ravalnath.patil | Updated: October 25, 2020 21:00 IST

Uddhav Thackeray’s speech at Dussehra melava : दसऱ्या मेळाव्यात उद्धव ठाकरे यांनी आपल्या संपूर्ण भाषणात उद्धव ठाकरे यांनी भाजपाला टार्गेट केले. तसेच, कंगना राणौतवरही त्यांनी जोरदार टीका केली.

मुंबई :  शिवसेना पक्षप्रमुख, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या दसऱ्या मेळाव्यात जनतेशी ऑनलाईन संवाद साधला. राज्यात सत्ता आल्यानंतरचा आणि उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपद स्वीकारल्यानंतर पहिल्याच दसरा मेळाव्यात जनतेशी संवाद साधला. यावेळी मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीरशी करण्याऱ्या अभिनेत्री कंगना राणौतचा चांगला समाचार घेतला. घरी खायला मिळत नाही म्हणून मुंबईत यायचं आणि मुंबईशी नमकहरामी करायची, अशा शब्दांत उद्धव ठाकरेंनी कंगनावर निशाणा साधला.

दसऱ्या मेळाव्यात उद्धव ठाकरे यांनी आपल्या संपूर्ण भाषणात उद्धव ठाकरे यांनी भाजपाला टार्गेट केले. तसेच, कंगना राणौतवरही त्यांनी जोरदार टीका केली. मुंबईला पाकव्याप्त काश्मीर म्हणणे हे पंतप्रधान मोदींचा अपमान आहे, असेही उद्धव ठाकरे म्हणाले. तसेच, घरी खायला मिळत नाही म्हणून मुंबईत यायचं आणि मुंबईशी नमकहरामी करायची. अनधिकृत बांधकाम मुंबईत करायची. हिंमत असेल तर पाकव्याप्त सोडा काश्मीरमध्ये अधिकृत बांधून दाखवा. मुंबई हा पाकव्याप्त काश्मीर आहे म्हणणारा रावण आला आहे, असे उद्धव ठाकरे कंगनाला उद्देशून म्हणाले.

याचबरोबर, मला माझ्या पोलीस दलाबद्दल अभिमान आहे. छाताडावर गोळ्या झेलून अतिरेक्यांना पकडणारे माझे पोलीस, मला त्यांचा प्रचंड अभिमान आहे, असे सांगत उद्धव ठाकरे यांनी सांगितले. याशिवाय, सुशांतसिंह राजपूत याच्या आत्महत्येप्रकरणी महाराष्ट्रावर, शिवसेनेवर, ठाकरे कुटुंबीयांवर जे आरोप केले ते महाराष्ट्राला बदनाम करणारं आहे. शेण खाऊन त्यांनी आमच्यावर गोमुत्राच्या गुळण्या केल्या ते सगळ्या जगाने पाहिले असेही ते म्हणाले.

  काय म्हणाले उद्धव ठाकरे?- हिंमत असेल तर सरकार पाडून दाखवा.- वाटेला जात तर मुंगळा कसा डसतो, ते दाखवू. - वाघाची अवलाद आहे, डिवचाल तर पस्तवाल.- महाराष्टाच्या हिताच्या आड येणाऱ्यांच्या छाताडावर गुढी पाडवा साजरा करेन.- मला संयमचे महत्त्व कळतं.- मी आज मुख्यमंत्रीपदाचा मास्क काढून टाकलाय. - वाघाला डिवचण्याचा प्रयत्न केला तर फटका मारणारचं.- घंटा बडवा थाळ्या बडवा हे तुमचं हिंदुत्व, आमचं हिंदुत्व असलं नाही, हिंदुत्व हे आमचं राष्ट्रीयत्व.- बाबरी वेळी शेपट्या घालणारे हिंदुत्त्वावर प्रश्न विचारतायेत.- इथे गाय म्हणजे माता, पलिकडे जाऊन खाता,  गोव्यात गोवंश बंदी का नाही- सरसंघचालकांकडून हिंदुत्व शिकून घ्या, भाजपाला टोला- राजकारण म्हणजे शस्त्रूमधील युद्ध नव्हे, हे सरसंघचालकाकडून शिकावे.- गोव्यात गोवंश हत्येला बंदी का नाही? उद्धव ठाकरेंचा भाजपाला सवाल- देश संकटात आहे आणि हे राजकरण करत आहे.- कोरोना आहे, संकटं आहेत, जीएसटी नाही, पैसे येणार कुठून? - आमचा जीएसटीचा निधी केंद्र सरकार का देत नाही?- जीएसटी सदोष असेल तर मोदींनी मागे घ्यावी .- सर्व मुख्यमंत्र्यांनी जीएसटी रद्द करण्याची मागणी करावी.- जीएसटी फेस गेली असेल तर पंतप्रधानांनी माफी मागावी.. -संघमुक्त भारत म्हणणारे नितीश कुमार चालतात- दानवेंचा बात दिल्लीत असेल माझा बाप भाडोत्री नाही.- सेक्युलरपणाची लस कुणी कुणाला?- दानवेंचा बात दिल्लीत असेल माझा बाप भाडोत्री नाही.- घरी खायला मिळत नाही म्हणून मुंबईत यायचं.- बिहारमध्ये मोफत लस, मग आम्ही काय बांगलादेशचे?- महाराष्ट्र पुढं जातोय म्हणून बदनामी करायची.- मला माझ्या पोलीस दलाबद्दल अभिमान आहे .- छाताडावर गोळ्या झेलून अतिरेक्यांना पकडणारे माझे पोलीस, मला त्यांचा प्रचंड अभिमान.- मुंबई हा पाकव्याप्त काश्मीर आहे म्हणणारा रावण आला आहे .- घरी खायला मिळत नाही म्हणून मुंबईत यायचं आणि मुंबईशी नमकहरामी करायची, उद्धव ठाकरेंचा कंगनावर प्रहार- आमच्या अंगणात तुळशीची वृंदावने आहेत, गांजाची वृंदावने नाहीत.- आमच्या अंगावरती येत आहात,महाराष्ट्र द्वेष पाहिल्यानंतर मी महाराष्ट्राच्या जनतेला आवाहन करतो, सावध राहा .- आदित्य, ठाकरे कुटुंबावर चिखलफेक झाली हे भयंकर होतं. बिहारच्या सुपुत्रार चिखलफेक करणारे महाराष्ट्राच्या सुपुत्रावर चिखलफेक करतायेत.- तुम्ही रातोरात झाडांची कत्तल करत होता, आम्ही ८०८ एकराचं जंगल वाचवलं, एक रुपया खर्च न करता मेट्रो कारशेड उभारतोय- बेडूक आणि त्याची पिल्लं वाघ पाहून ओरडत सुटलेत; उद्धव ठाकरेंचा राणे कुटुंबीयांवर प्रहार - केवळ पाडापाडी करण्यात भाजपा रस आहे, ही अराजकता आहे- विरोधक म्हणजे अहंकारी राजा आणि कळसुत्री बाहुल्या आहेत - महाराष्ट्र आता कळसुत्री बाहुल्यांचा खेळ होणार नाही.

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेKangana Ranautकंगना राणौतDasaraदसराMumbaiमुंबईShiv SenaशिवसेनाBJPभाजपा