शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
5
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
6
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
7
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
8
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
9
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
10
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
11
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
12
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
13
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
14
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
15
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
18
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
19
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
20
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
Daily Top 2Weekly Top 5

तुमच्यासाठी धोका पत्करुन शस्त्रक्रिया केलीय, महाराष्ट्र पिंजून काढणार; उद्धव ठाकरेंची शिवसैनिकांना साद

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 30, 2022 14:35 IST

तुमच्यासोबत फिरण्यासाठी धोका पत्करुन मी शस्त्रक्रिया केली. आता मी महाराष्ट्र पिंजून काढणार आहे. शिवसेना इतरांपेक्षा वेगळी आहे हे दाखवण्यासाठी शिवसंपर्क अभियान आहे.

मुंबई-

तुमच्यासोबत फिरण्यासाठी धोका पत्करुन मी शस्त्रक्रिया केली. आता मी महाराष्ट्र पिंजून काढणार आहे. शिवसेना इतरांपेक्षा वेगळी आहे हे दाखवण्यासाठी शिवसंपर्क अभियान आहे. तुम्ही संघटनेवर दोर द्या. बाकीचं मी बघून घेतो, असं आवाहन राज्याचे मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांना केलं आहे. उद्धव ठाकरे यांनी आज शिवसंपर्क अभियानाच्या दुसऱ्या टप्प्याच्या निमित्ताने कोकण, पश्चिम महाराष्ट्र व उत्तर महाराष्ट्रातील शिवसेना, जिल्हा संपर्क प्रमुखांना मार्गदर्शन केलं. यावेळी उद्धव ठाकरे यांनी राज्यात शिवसेना मजबूत करण्याच्या सूचना कार्यकर्त्यांना दिल्या. 

"शिवसेना अंगार आहे त्यामुळे भंगार आपल्याकडे बघणार नाही. शिवसेना इतरांपेक्षा वेगळी आहे हे दाखवण्यासाठी शिवसंपर्क अभियान आहे. गावाची जनतेची कामं घेऊन या. लोकांसाठी कामं करा आणि संघटनेवर जोर द्या. माझ्या दौऱ्याचा दुसरा टप्पा लवकरच सुरू होईल. तुम्हा सगळ्यांना शुभेच्छा देतो", असं उद्धव ठाकरे म्हणाले. 

"गट प्रमुख, शाखाप्रमुख आदी पदाधिकाऱ्यांच्या याद्या मला हव्या आहेत. जन्मापासूनच शिवसेनेकडे नवीन तरुण रक्त आहे. गावागावातून शिवसैनिकांकडे सातत्याने लक्ष द्या. शिवसेना आपल्या वाढवायची आहे. गावागावातील जनतेला आम्ही तुमच्यासोबत आहोत हे त्याला समजू द्या", अशा सूचना उद्धव ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांना केल्या. 

शिवसेनेला हिंदूद्रोही ठरविण्याचा प्रयत्नपश्चिम बंगाल, केरळ सारखे आपल्याला हिंदूद्रोही ठरवण्याचा प्रयत्न सध्या सुरू आहे. ही त्यांची पद्धत आहे. बंगालचं मोठं कर्तृत्व आहे. यावेळी ममता दीदींनी गेल्यावेळेपेक्षा अधिक जागा मिळवल्या. आपण नेहमी म्हणतो महाराष्ट्र दिशा दाखवतो. आता महाराष्ट्राने पुन्हा एकदा दिशा दाखवण्याची वेळ आली आहे. महाराष्ट्रात मराठी आणि अमराठी वाद निर्माण करणं ही भाजपाची चाल आहे, असं उद्धव ठाकरे म्हणाले. 

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेShiv SenaशिवसेनाBJPभाजपा