शहरं
Join us  
Trending Stories
1
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
2
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
3
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
4
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
5
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
6
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
7
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
8
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
9
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
10
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
11
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
12
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
13
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
14
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
15
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
16
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
17
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
18
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
19
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
20
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?

वाघांच्या नसबंदीस मुख्यमंत्र्यांचा नकार

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2020 06:05 IST

स्थलांतरावर विचार करण्यासाठी अभ्यासगट

मुंबई : चंद्रपूर जिल्ह्यात वाघांची वाढती संख्या लक्षात घेऊन वाघांच्या नसबंदीसह चार प्रस्ताव वन विभागाने शुक्रवारी मुख्यमंत्र्यांसमोर ठेवले पण मुख्यमंत्र्यांनी वाघांची नसबंदी कोणत्याही परिस्थितीत केली जाणार नाही, असे स्पष्टपणे सांगितले. वाघांचे स्थलांतर राज्यात अन्यत्र वा अन्य राज्यांमध्ये करण्यासंदर्भात विचार करण्यासाठी तज्ज्ञ व अधिकाऱ्यांचा अभ्यासगट नेमण्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या वन्यजीव मंडळाच्या बैठकीत घेण्यात आला.

मुख्यमंत्री हे या मंडळाचे अध्यक्ष आहेत. ताडोबाच्या जंगलात आज १६० वाघ आहेत. अनेकदा मनुष्य-वन्यजीव असा संघर्ष घडतो. वाघांची ताडोबातील संख्या कमी करण्यासाठी त्यांच्यापैकी काहींचे स्थलांतर करावे, स्वतंत्र व्याघ्र सफारी तयार करावी, गोरेवाडा; नागपूर येथील प्राणी संग्रहालयात त्यांची रवानगी करावी किंवा काही वाघांची नसबंदी करावी, असे प्रस्ताव वनविभागाकडून आजच्या बैठकीत देण्यात आला होता. मात्र, नसबंदी हा उपायच असू शकत नाही, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्टपणे सांगितल्याची माहिती वनमंत्री संजय राठोड यांनी लोकमतला दिली. राठोड हे वन्यजीव मंडळाचे उपाध्यक्ष आहेत.या बैठकीस संजय राठोड, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, राज्यमंत्री दत्तात्रय भरणे, आमदार धीरज देशमुख,वन विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव यांच्यासह राज्य वन्यजीव मंडळाचे सदस्य, वन विभागाचे अधिकारी आणि इतर मान्यवर उपस्थित होते.बैठकीतील महत्त्वाचे निर्णयच्वनविभागाचे स्वतंत्र पशू वैद्यकीय अधिकारी नेमणार.च्११ वनवृत्तांमध्ये ११ वन्यजीव उपचार केंद्रांची उभारणी करणारपर्यावरणाची किंमत मोजून प्रकल्प राबविणार नाहीच्पर्यावरणाची किंमत मोजून, जंगलाचे नुकसान करून प्रकल्प राबविण्याचे कोणेतेही सोपे मार्ग निवडण्यात येऊ नयेत म्हणूनच अकोला-खांडवा मिटर गेज रेल्वेलाईनचे ब्रॉडगेजमध्ये परिवर्तन करण्याच प्रस्ताव आला तेव्हा मेळघाटमधून जाणाºया या प्रकल्पासाठी पर्यायी मार्ग सुचवा असे राज्याचे मत केंदाला कळविण्यात आले, असे मुख्यमंत्री यावेळी म्हणाले. मुख्यमंत्र्यांच्या या भूमिकेबद्दल आजच्या बैठकीत त्यांच्या अभिनंदनाचा ठराव मंजूर करण्यात आला.च्याचपद्धतीने नागपूर-नागभीड रेल्वेमागार्चे ब्रॉडगेज मध्ये रुपांतर करतांना तो किती जंगलाला प्रभावित करतो, तिथे एलिव्हेटेड ट्रेन करणे शक्य आहे का, याचा विचार करण्याची आवश्यकताही त्यांनी व्यक्त केली.सफेद चिप्पी कांदळवन वृक्ष घोषितबैठकीत सफेद चिप्पी या कांदळवन वृक्षाला महाराष्ट्र राज्य कांदळवन वृक्ष घोषित करण्यास मान्यता देण्यात आली. असा वृक्ष घोषित करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य ठरले आहे. आंग्रीय पठार नियुक्त क्षेत्र मेरिटाईम झोन्स अ‍ॅक्ट अंतर्गत आंग्रीया पठाराला नियुक्त क्षेत्र म्हणून अधिसुचित करण्यासंदर्भात केंद्र सरकारकडे शिफारस करण्यास मान्यता. मोगरकासा, महेंद्रा, चंदगड पटणे कन्झर्व्हेशन रिझर्व्ह एरिया म्हणून घोषित करण्यासाठी आणणार प्रस्ताव. 

टॅग्स :MumbaiमुंबईMaharashtraमहाराष्ट्रTigerवाघ