शहरं
Join us  
Trending Stories
1
घोटाळ्यात उपघोटाळा; ९ हजारांवर सरकारी महिला कर्मचाऱ्यांनी घेतला ‘लाडकी बहीण’ योजनेचा लाभ
2
पहलगाम मास्टरमाइंडसह तिघांचा खात्मा; ‘ऑपरेशन महादेव’ने दहशतवाद्यांची कोंडी, ‘असा’ लागला छडा
3
दहशतवाद संपवण्यास कोणत्याही थराला जाऊ शकतो ‘नवा भारत’; संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचा इशारा
4
“केंद्र सरकार कोणापुढे झुकले हे स्पष्ट झाले पाहिजे, पीओके परत कधी घेणार?”: गौरव गोगोई
5
नागपूरची १९ वर्षीय दिव्या देशमुख दिग्गज कोनेरू हम्पीला पराभूत करत झाली विश्वविजेती
6
दिल्लीत सांस्कृतिक भवन होणार; आराखडा सादर, डॉ. विजय दर्डा यांच्या प्रयत्नांना मोठे यश
7
निशिकांत दुबेंना जाब विचारणाऱ्यांचे राज ठाकरेंनी मानले आभार; काँग्रेस खासदारांचे केले कौतुक
8
५ वर्षांत २,०९४ विमाने बिघाडली, प्रवाशांना टेन्शन; १८३ तांत्रिक बिघाड, सरकार काय करतेय?
9
नाव ‘डॉग बाबू’, वडिलांचे नाव ‘कुत्ता बाबू’, आईचे नाव ‘कुतिया देवी’; बिहार प्रशासनाचे देशभर वाभाडे
10
संजय राऊत मानहानी प्रकरण: नितेश राणेंविरोधातील अजामीनपात्र वॉरंट रद्द; कोर्टासमोर हजर होणार
11
नालेसफाईतील घोटाळेबाजांना १५ कोटींचा दंड; ‘लोकमत’च्या स्टिंग ऑपरेशननंतर कारवाईला आणखी वेग
12
काय गडबड आहे? विद्यार्थी जीवन का संपवत आहेत? न्यायालयाकडून प्रश्न; म्हटले, वेगाने तपास करा
13
Mumbai: तोंडाला रुमाल बांधून आला अन् धाड, धाड; धारावीत भर बाजारात महिलेवर गोळीबार!
14
हिंजवडीत इमारतीवरून उडी मारून आयटी अभियंत्याची आत्महत्या, चिठ्ठीत लिहिले...
15
Badlapur: बदलापुरात रासायनिक कंपनीत आग!
16
Russia Ukraine War: 'रशियाकडे युद्ध थांबवण्याची शेवटची संधी' डोनाल्ड ट्रम्प यांचा पुतिन यांना इशारा!
17
मनसे कार्यकर्त्यांकडून कोचिंग सेंटरच्या संचालकाला मारहाण, कल्याण येथील व्हिडीओ व्हायरल
18
Sangli: नागपंचमीनिमित्त सांगलीत भाविकांना जिवंत नागांचे दर्शन घडणार, खेळावर बंदी कायम!
19
महापालिका निवडणुकीत आघाडी असणार की नाही, त्वरीत सांगा! पुण्यातून शरद पवार गटाची जाहीर मागणी
20
तब्बल ३८ तास बंद राहिला टोलनाका, तरीही २४ हजार लोकांनी प्रामाणिकपणे भरला टोल     

पंकजा मुंडेंना थेट मुख्यमंत्रिपदाची ऑफर; BRS पक्ष राज्यात मोठा भूकंप घडवणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 23, 2023 18:25 IST

शेतकऱ्यांचे प्रश्न, विजेचा प्रश्न, पाण्याची समस्या घेऊन बीआरएस राज्यात काम करते असं पक्षाचे समन्वयक बाळासाहेब सानप म्हणाले.

मुंबई - राज्याच्या राजकारणात भारत राष्ट्र समितीने शिरकाव केला असून प्रमुख पक्षातील अनेक आजीमाजी नेते सध्या बीआरएसमध्ये प्रवेश करत आहेत. तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी त्यांचा भारत राष्ट्र समिती पक्ष राष्ट्रीय राजकारणात आणला असून विविध राज्यांत तो पसरवण्यासाठी प्रयत्न सुरू झाले आहेत. महाराष्ट्रातही अब की बार, किसान सरकार असा नारा देत बीआरएसने राज्यातील शेतकऱ्यांना साद घातली आहे. त्यात बीआरएस पक्षाने आता भाजपाच्या नेत्या पंकजा मुंडे यांना थेट मुख्यमंत्रिपदाची ऑफर दिली आहे. 

बीआरएस पक्षाचे समन्वयक बाळासाहेब सानप म्हणाले की, बीआरएसमध्ये नाराज नाही तर अनेक नवीन चेहरे रोज सहभागी होतात, जे आमदार २-३ हजारांनी पडलेत तेदेखील पक्षाच्या संपर्कात आहेत. पंकजा मुंडे या बीआरएस पक्षात आल्या तर आम्ही त्यांचे स्वागत करू. या महाराष्ट्रात एक सक्षम महिला या नेत्याने जर भारत राष्ट्र समितीत प्रवेश केला तर महाराष्ट्र त्यांना डोक्यावर घेतल्याशिवाय राहणार नाही असं त्यांनी सांगितले. 

त्याचसोबत पंकजा मुंडे बीआरएसमध्ये आल्यास मुख्यमंत्रिपदाची त्यांची इच्छा पूर्ण होईल का असा प्रश्न पत्रकारांनी सानप यांना विचारला असता त्यांनी थेट उत्तर दिले. नक्कीच, देशाचे नेते आणि तेलंगणाचे मुख्यमंत्री केसीआर यांच्यासोबत या विषयांवर चर्चा करू, १०० टक्के मला विश्वास आहे. ते कोणत्याही जातीचे समीकरण न करता, जो सक्षम नेता आहे त्याला ताकद दिल्याशिवाय राहत नाहीत. पंकजाताई सक्षम आहेत, १०० टक्के त्यांना न्याय मिळेल असा विश्वासही बीआरएसचे समन्वयक बाळासाहेब सानप यांनी व्यक्त केला. 

दरम्यान, या महाराष्ट्रातील राजकीय परिस्थिती बघून भारत राष्ट्र समिती ताकदीने महाराष्ट्रात उतरली आहे. शेतकऱ्यांचे प्रश्न, विजेचा प्रश्न, पाण्याची समस्या घेऊन बीआरएस राज्यात काम करते. त्यासाठी विठ्ठलाचे दर्शन घेण्यासाठी तेलंगणाचे मुख्यमंत्री, सर्व मंत्रिमंडळ, आमदार, खासदार उपस्थित राहतील. या विठ्ठलाचे दर्शन घेऊन राज्यातील जनतेला न्याय मिळाला पाहिजे. शेतकऱ्यांचे प्रश्न सुटले पाहिजे. त्यासाठी राज्यात बीआरएसची सत्ता आली पाहिजे. म्हणून राज्यातील २८८ विधानसभा या मतदारसंघात पक्ष म्हणून लढणार आहे अशी माहिती बाळासाहेब सानप यांनी दिली. 

टॅग्स :Pankaja Mundeपंकजा मुंडेBRS-Bharat Rashtra Samitiभारत राष्ट्र समितीBJPभाजपाK Chandrashekar Raoके चंद्रशेखर राव