शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
3
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
4
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
5
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
6
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
7
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
8
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
9
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
10
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
11
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
12
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
13
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
14
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
15
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
16
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
17
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
18
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
19
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
20
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती

...तेव्हा बाळासाहेबांना दु:ख झाले असेल: एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 23, 2022 12:35 IST

निवडणूक आयोगाकडे दोन्ही गट त्यांची भूमिका मांडेल. विधानसभेत दोन तृतीयांश बहुमत आमच्याकडे आहे. शिवसेना आम्हीच आहोत. लोकसभेतही दोन तृतीयांश खासदार आमच्यासोबत आहेत असं मुख्यमंत्री म्हणाले.

मुंबई - २०१९ ची निवडणूक महायुती म्हणून आम्ही लढवली. बाळासाहेब ठाकरे, पंतप्रधान नरेंद्र मोदींचे बॅनरवर फोटो होतो. जनतेनेही या युतीला कौल दिला. त्यानंतर दुर्दैवाने भाजपाला सोडून काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली. तेव्हा खऱ्या अर्थाने बाळासाहेबांना दु:ख झाले असेल. ज्यांना बाळासाहेबांनी आयुष्यभर जवळ केले नाही त्यांच्यासोबत शिवसेना गेली असा टोला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंना लगावला आहे. 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, आम्ही जी भूमिका घेतली ती बाळासाहेबांना आवडणारी आणि त्यांच्या विचारांची भूमिका घेतली. युतीचं सरकार यापूर्वी गठीत झाले होते त्याचे शिल्पकार बाळासाहेब होते. महायुती म्हणून निवडणूक लढवली आणि जनमताने कौल दिल्यानंतर २०१९ मध्ये दुर्दैवाने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली. ज्या बाळासाहेबांनी काँग्रेस-राष्ट्रवादीला जवळ केले नाही. मात्र महाविकास आघाडी जेव्हा बनवली तेव्हाच बाळासाहेबांना दु:खं झाले असेल. आमदारांचे खच्चीकरण होत होते, शिवसैनिकांवर अन्याय होत होता म्हणून शिवसैनिकांवर अन्याय दूर करण्यासाठी आम्ही हा लढा उभा केला. बाळासाहेबांना खरा आनंद वाटत असेल शिवसेना वाचवण्यासाठी एकनाथ शिंदे आणि आमदारांनी पुढाकार घेतला असं त्यांनी सांगितले. 

तसेच निवडणूक आयोगाकडे दोन्ही गट त्यांची भूमिका मांडेल. विधानसभेत दोन तृतीयांश बहुमत आमच्याकडे आहे. शिवसेना आम्हीच आहोत. लोकसभेतही दोन तृतीयांश खासदार आमच्यासोबत आहेत. शिवसेना म्हणून आम्हाला मान्यता आहे. ही शिवसेना बाळासाहेबांच्या विचारांची आहे. विधिमंडळात आम्हाला मान्यता मिळाली आहे. त्यामुळे निवडणूक आयोगासमोर आम्ही आमची भूमिका मांडू असं मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले. 

मंत्रिमंडळ विस्तार लवकरचजी कामे मागच्या मंत्रिमंडळाने घाईगडबडीने निर्णय घेतले, जीआर काढले त्याला स्थगिती दिली आहे. विकासकामांना स्थगिती देणार नाही. ज्याप्रकारे निर्णय घेतले त्याला स्थगिती दिली आहे. काल आम्ही दिल्लीला गेलो होतो, पंतप्रधानांनी ठेवलेल्या स्नेह भोजनला आम्ही उपस्थित होतो. सर्वच वरिष्ठ नेत्यांची भेट झाली. लवकरच मंत्रिमंडळ विस्तार केला जाईल असं शिंदेंनी सांगितले. 

मला सुरक्षा देण्याची शिफारस गृहमंत्रालयाची होती मी गडचिरोलीत पालकमंत्री म्हणून काम करत होतो, पोलिसांनी नक्षलांविरोधात मोहिम आखली होती. अनेक विकासकामे उभी केली. त्याला नक्षलांनी विरोध केला. परंतु पोलिसांनी त्यांना न जुमानता नक्षलविरोधी मोहिम तीव्र केली. त्यात २७ नक्षलींचा खात्मा केला. तेव्हा मला मारण्याच्या धमक्या देण्यात आल्या होत्या. गृहविभागाने झेड प्लस सुरक्षा देण्याची शिफारस केली होती. त्याबाबत शंभुराज देसाई यांनी स्पष्टीकरण दिले आहे अशी माहिती एकनाथ शिंदेंनी दिली. 

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेUddhav Thackerayउद्धव ठाकरेBalasaheb Thackerayबाळासाहेब ठाकरेShiv Senaशिवसेना