शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

Eknath Shinde : "बाळासाहेबांच्या विचारांशी प्रतारणा नाहीच..."; गुरुपौर्णिमेला एकनाथ शिंदेंचं खास ट्विट

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 13, 2022 09:04 IST

Eknath Shinde : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून गुरुपौर्णिमेनिमित्त एक ट्विट केलं आहे.

मुंबई - आषाढी एकादशीपासून सुरू झालेल्या चातुर्मासातील पहिला महत्त्वाचा सण म्हणजे गुरुपौर्णिमा. हिंदू धर्मात गुरुपौर्णिमेच्या सणाला विशेष महत्त्व आहे. हिंदू धर्मात गुरूला देवा इतकेच महत्त्वाचे स्थान देण्यात आले आहे. आषाढ महिन्यातील पौर्णिमेला गुरुपौर्णिमा हा सण साजरा केला जातो. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून गुरुपौर्णिमेनिमित्त एक ट्विट केलं आहे. "बाळासाहेबांच्या विचारांशी प्रतारणा नाहीच" असं म्हटलं आहे. 

"बाळासाहेबांच्या विचारांशी प्रतारणा नाहीच. विझणार कधीच अंगार नाही, हिंदुत्वाशिवाय विचार नाही.... गुरुपौर्णिमेनिमित्त विनम्र अभिवादन..." असं एकनाथ शिंदे यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे. यासोबतच त्यांनी बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे यांचा एक फोटो देखील शेअर केला आहे. मी एक सामान्य शिवसैनिक आहे, मुख्यमंत्रिपद माझ्या डोक्यात कधीही जाणार नाही. आम्ही कोणाच्या वाटेला जात नाही, पण कोणी वाटेला आले तर सोडतही नाही, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंगळवारी ठणकावून सांगितले.

हिंगोलीचे शिवसेना आमदार संतोष बांगर यांनी मंगळवारी सह्याद्री अतिथीगृहासमोर जोरदार शक्तिप्रदर्शन केले. अनेक गाड्या भरून शिवसैनिक त्यासाठी आले होते. त्यांच्यासमोर बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले की, मुख्यमंत्री झालो असलो तरी मी तुमच्यातलाच एक कार्यकर्ता आहे. तुमच्या कुटुंबातलाच एक माणूस सहाव्या मजल्यावर बसला आहे असे समजा.शिवसेनेचे आमदार संतोष बांगर हे अगदी विधानसभेचे विशेष अधिवेशन सुरू असताना ऐनवेळी शिंदे गटात सहभागी झाले होते. 

बांगर यांना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी जिल्हाप्रमुखपदावरून हटविले होते. मात्र, बांगर हेच जिल्हाप्रमुखपदावर कायम असतील, असे शिंदे यांनी सांगितले. आधीच्या काळात शिवसैनिकांचे खच्चीकरण झाले, तडीपाऱ्या झाल्या. मात्र मी मुख्यमंत्री असताना एकाही शिवसैनिकावर अन्याय होऊ देणार नाही. पुढच्या अडीच वर्षांत एकाही शिवसैनिकाचा बाल बांका करण्याची कोणाची हिंमत होणार नाही, असेही शिंदे यावेळी म्हणाले.

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेShiv SenaशिवसेनाBalasaheb Thackerayबाळासाहेब ठाकरेGuru Purnimaगुरु पौर्णिमा