शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
5
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
6
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
7
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
8
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
9
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
10
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
11
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
12
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
13
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
14
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
15
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
16
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
17
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
18
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
19
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
20
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
Daily Top 2Weekly Top 5

...पण नियतीच्या मनात वेगळेच होते, तिच्या पुढे कोणाचे चालणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 20, 2023 06:03 IST

उद्धव ठाकरेंचे नाव न घेता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा हल्लाबोल

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : महाविकास आघाडी सरकारच्या काळात मुंबईचा श्वास कोंडला होता, तो मोकळा करत आम्ही विकासकामांना गती दिली आहे. विकासाला मानवी चेहरा देत आहोत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे जिव्हाळ्याचे नाते होते. हिंदुत्व आणि हिंदुत्वाचा अभिमान हा त्यांच्या विचारांचा समान धागा होता. फडणवीस मुख्यमंत्री असताना मोदी यांच्या हस्ते ज्या कामांचे भूमिपूजन झाले, त्यांचे उद्घाटन त्यांच्या हस्ते होऊ नये, असे काही लोकांना वाटत असते. पण नियतीच्या मनात वेगळेच होते. नियतीसमोर कोणाचेही चालत नाही. जनतेची अपेक्षा आज पूर्ण होत आहेत. गेल्या वर्षाच्या शेवटी समृद्धी महामार्गाचे उद्घाटन मोदी यांच्या हस्ते झाले, आज राजधानीतील कामांचा शुभारंभ होत आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे नाव न घेता जोरदार हल्लाबोल केला. 

वांद्रे कुर्ला संकुलातील मैदानावर गुरुवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत झालेल्या जाहीर सभेत मुख्यमंत्री शिंदे यांनी विरोधकांवर टीकेची तोफ डागली. ते पुढे म्हणाले की, आमच्या सरकारने ज्या गतीने सहा महिन्यांत कामे केली आहेत, त्यामुळे आता उरलेल्या दोन वर्षांत काय होईल, याचा त्रास काही जणांना होत आहे. त्यांना पोटदुखी, मळमळ होत आहे, त्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. त्यांना टीका करू द्या, त्यांच्या टीकेला आपण कामाने उत्तर देऊ. टीकेपेक्षा दहापट काम आपण करू.

डबल इंजिनला ट्रिपल इंजिन

केंद्र व राज्यात आपले सरकार आहे. मुंबई महापालिकेतही सत्ता मिळवून मुंबईसह राज्याच्या विकासाचे सध्याचे डबल इंजिन ‘ट्रिपल इंजिन’मध्ये रुपांतरित करणारच, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भक्कम आशीर्वादाने मुंबईसह राज्याचा चेहरामोहरा बदलणार, असा निर्धार मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी व्यक्त केला. 

तिकडे ईडीची चौकशी इकडे चहलांचे कौतुक

मुंबई महापालिका आयुक्त इक्बालसिंह चहल यांची मुख्यमंत्री शिंदे यांनी प्रशंसा केली. जी २० परिषदेच्या निमित्ताने मुंबईभर वातावरण तयार करणे तसचे मुंबई शहर त्यांनी चमकविले, या शब्दांत त्यांनी कौतुक केले.

काळेपांढरे करणाऱ्यांची दुकाने बंद होणार

मुंबईत मेट्रोचे तीनशे किलोमीटरचे जाळे तयार झाल्यानंतर तीस ते चाळीस लाख वाहनांची वाहतूक कमी होईल. ४०० किमीच्या सिमेंट रस्ते पहिल्या टप्प्यात तर ५०० किमीचे रस्ते दुसऱ्या टप्प्यात होतील व मुंबई खड्डेमुक्त होईल. पण या योजनेतही काही लोक खोडा घालत आहेत. डांबरी रस्त्यांच्या दुरुस्तीत वारंवार होणारा कोट्यवधींचा खर्च वाचेल, खड्डयांमुळे निष्पाप जीव जाणेही वाचेल, डांबरीकरणाच्या नावाखाली आपले काळेपांढरे करणाऱ्यांची दुकाने बंद होणार आहेत, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुनावले.

तीन वर्षांत मुंबईचा चेहरामोहरा बदलणार

मुंबईत पुनर्विकासाचे प्रकल्प राबवून मुंबई बाहेर गेलेल्या मुंबईकरांना परत आणण्याचाच निर्धार व्यक्त करून शिंदे म्हणाले की, मोदी यांच्या नेतृत्वात येत्या तीन वर्षांत मुंबई, महाराष्ट्राचा चेहरामोहरा बदलण्याचा आमचा संकल्प आहे. विकासाला विरोध करणाऱ्यांना मुंबईकर ओळखतात. त्यांचा मोदी आणि आमच्या सरकारवर पूर्ण विश्वास आहे, असे नमूद करताना गेल्या सहा महिन्यात आपल्या सरकारने घेतलेल्या निर्णयांची माहितीही शिंदे यांनी यावेळी दिली.

आम्ही त्यांचेच लोक आहोत, आणि मोदी खळाळून हसले

दावोसच्या गुंतवणूक परिषदेत जाऊन आलेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पंतप्रधान मोदी हे जगभर किती लोकप्रिय आहेत याचा स्वानुभव सांगितला. लक्झेमबर्गचे पंतप्रधान मला भेटले, माझ्यासोबत त्यांनी फोटो काढला. ‘मी मोदींचा भक्त आहे, आपला फोटो त्यांना दाखवा’ असे ते म्हणाले. जर्मनी, सौदी अरेबियातील नेते भेटले. मला विचारले, आपण मोदींसोबतच आहात ना? मी म्हणालो, आम्ही त्यांचेच लोक आहोत. जे भेटले ते सगळे मोदींबाबतच मला विचारत होते. मोदीजींचा करिष्मा मी बघितला, असा अनुभव शिंदे यांनी सांगितला तेव्हा जनसमुदायातून ‘मोदी, मोदी’ असा जल्लोष झाला. 

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेUddhav Thackerayउद्धव ठाकरेMaharashtraमहाराष्ट्रShiv Senaशिवसेना