शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

“मोदी को हराना मुश्कीलही नही, नामुमकीन है”; CM एकनाथ शिंदेंनी व्यक्त केला विश्वास

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 3, 2024 17:16 IST

CM Eknath Shinde News: देशाला वाचवत लोकशाहीला पुढे नेण्यासाठी, विकासासाठी पंतप्रधान मोदी काम करत आहेत, तर इंडिया आघाडी देश बुडवायला निघालेली आहे, अशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे.

CM Eknath Shinde News: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शिवसेना, भाजपासह महायुतीतील उमेदवाराच्या प्रचारार्थ रॅली, सभा, मेळावे घेताना दिसत आहेत. तसेच उमेदवारी अर्ज भरतानाही उपस्थित राहत असल्याचे पाहायला मिळत आहे. यावेळी कार्यकर्त्यांना संबोधित करताना राज्य सरकारने केलेली कामे सांगताना, नरेंद्र मोदी यांना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी मतदान करण्याचे आवाहन करत आहेत. यातच विरोधकांवर सडकून टीका करत आहेत. मोदी को हराना मुश्कीलही नही, नामुमकीन है, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे. 

तुम्ही मागच्या उमेदवाराला मताधिक्य देण्याचे काम काम केले. त्याच्यासाठी मेहनत घेतली. खरे तर त्या उमेदवाराचे काम करायला कार्यकर्ते तयार नव्हते. त्यामुळे मीच उमेदवार असे समजून मतदान करा, असे मला सर्वांना सांगावे लागले. मात्र, या निवडणुकीत मागचे सर्व विक्रम मोडीत काढा. आपण उमेदवार या भावनेने काम करून विरोधकांच्या चारही मुंड्या चित करा परत, विरोधी पक्षाने ठाण्याचे नाव घेत कामा नये, असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. 

देशात संविधान दिवस साजरा करण्याचे काम नरेंद्र मोदी यांनी केले

घरात बसून किंवा फेसबुक लाईव्ह करून काम करता येत नाही. त्यासाठी जमिनीवर उतरुन काम करावे लागते. गेल्या दोन वर्षांपासून मी जमिनीवर उतरुन काम करतोय. याआधीही मीच काम करत होतो पण, त्याचे श्रेय दुसरे घेत होते, असे सांगत ठाकरे गटावर हल्लाबोल केला. तसेच बाबासाहेबांचे संविधान बदलणार असे विरोधकांकडून बोलले जात असून ते चुकीचे आहे. संविधान बदललेले जाणार नाही. देशात संविधान दिवस साजरा करण्याचे काम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले, असे मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले.

दरम्यान, एकीकडे देशाला वाचवण्यासाठी लोकशाहीला पुढे नेण्यासाठी तसेच विकास करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आहेत. दुसरीकडे देश बुडवायला निघालेली इंडिया आघाडी आहे. देशभक्त त्यांना थारा देणार नाहीत. त्यामुळेच मोदी को हराना मुश्कीलही नही, नामुमकीन है, असे एकनाथ शिंदे म्हणाले. 

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेthane-pcठाणेmaharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४Mahayutiमहायुती