शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

खड्डे त्वरित भरा मुख्यमंत्र्यांचे आदेश; मुंबई, ठाण्यातील खराब रस्त्यांचा आढावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 7, 2022 06:40 IST

मुंबई तसेच ठाणे परिसरात पावसाचा जोर कायम असून, संभाव्य आपत्तीच्या पार्श्वभूमीवर बुधवारी ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयात मुख्यमंत्र्यांनी ही बैठक घेतली.

ठाणे : घोडबंदर रोडवरील काजूपाडा या ठिकाणी खड्ड्यांमुळे पहिला बळी गेल्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सरकारी यंत्रणा आणि पालिका अधिकाऱ्यांची बुधवारी चांगलीच कानउघाडणी केली. संभाव्य आपत्तीला तोंड देण्याकरिता सतर्क राहण्याचा सूचना देण्याबरोबरच त्वरित खड्डे भरण्याचे आदेश त्यांनी अधिकाऱ्यांना दिले. अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष फिल्डवर काम केल्यास परिस्थितीवर नियंत्रण मिळविता येईल, असा टोलाही त्यांनी अधिकाऱ्यांना लगावला.  

मुंबई तसेच ठाणे परिसरात पावसाचा जोर कायम असून, संभाव्य आपत्तीच्या पार्श्वभूमीवर बुधवारी ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयात मुख्यमंत्र्यांनी ही बैठक घेतली. यावेळी त्यांनी ठाणे जिल्हा आपत्कालीन व्यवस्थापनाबाबत आढावा घेतला. यावेळी राज्याचे मुख्य सचिव मनूकुमार श्रीवास्तव, ठाणे जिल्हा आणि शहराशी निगडित विविध यंत्रणांचे, विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. याप्रसंगी मुख्यमंत्र्यांनी रेल्वे बरोबर समन्वय ठेवण्यास सांगितले. तिन्ही धरणांच्या क्षेत्रातील परिस्थितीवर लक्ष ठेवा. धरणांमधून पाणी सोडण्यात येणार असेल तर गेट उघडण्याबाबत तसेच बंद करण्याबाबत पूर्वकल्पना द्या, धरणावरील सर्व यंत्रणांना सतर्क राहण्याच्या सूचना द्या, ज्या गावांचे स्थलांतर रखडले आहे ते तातडीने करा. विशेषतः सावळसे गावाला जागा दिली आहे. या गावाबाबत सर्व यंत्रणांनी तातडीने कार्यवाही करावी, अशी सूचना केली.

कोल्ड मिक्स पद्धतीने खड्डे भरा   खड्ड्यांमुळे अपघात होऊन कुणी जखमी होऊ नये, याची प्रामुख्याने दक्षता घ्या. त्यातच खड्डे कोल्ड मिक्स पद्धतीने भरण्याबरोबर रस्ते दुरुस्ती करणाऱ्या यंत्रणांनी याबाबत विशेष काळजी घ्यावी, अशा सूचनाही त्यांनी दिल्या. 

पुराच्या ठिकाणी जीवितहानी टाळा पूर परिस्थितीवर डोळ्यात तेल घालून लक्ष ठेवा आणि पूर येणाऱ्या भागात जीवितहानी होऊ नये याची दक्षता घ्या. त्याचबरोबर लोकांना सुरक्षित स्थळी हलविण्याची तयारी ठेवा. तसेच दरड कोसळण्याची शक्यता असलेल्या भागातील लोकांनाही सुरक्षित स्थळी हलवा. त्यांची राहण्याची, जेवणाची व्यवस्था करा, असे शिंदे म्हणाले.  

नोडल ऑफिसरची नियुक्ती करारेल्वेच्या यंत्रणेला सतर्क राहण्याच्या सूचना देताना, मुंबई महापालिकेशी समन्वय राखा, पाणी साचून रेल्वे सेवा विस्कळित झाल्यास प्रवाशांना त्रास होऊ नये, याची काळजी घ्या. यासाठी एक समन्वयक अधिकारी (नोडल ऑफिसर) नियुक्त करावा. प्रवाशांच्या सुविधेसाठी बेस्ट, एसटी बस किंवा स्थानिक परिवहन सेवा यांची मदत घ्या, अशा सूचना दिल्या. लोकांना वेळच्या वेळी माहिती देण्याची व्यवस्था करा. संपर्क आणि समन्वयासाठी अधिकारी नियुक्त करा, असे निर्देश दिले. पालघर जिल्ह्यातील परिस्थितीचाही मुख्यमंत्र्यांनी बैठकीत आढावा घेत तेथील अतिवृष्टीची माहिती घेतली. 

महावितरणालाही सज्ज राहण्याचा सूचनापावसाळ्यात वीजपुरवठा अखंडित, सुरळीत राहण्यासाठी सज्ज राहा. लोकांनी फोन केल्यास त्यांना प्रतिसाद मिळेल याची काळजी घ्या. त्यांची तक्रार नोंदवून घेण्याची व्यवस्था करा. तक्रारीवर कार्यवाही करण्यासाठी क्षेत्रीय कर्मचारी, यंत्रणांना आवश्यक सुविधा, उपकरणे तातडीने पुरविण्यात याव्यात, असे शिंदे म्हणाले.

आपत्तीच्या वेळी प्रत्येकाने आपापले काम चोखपणे पार पाडल्यास लोकांचा रोष ओढवणार नाही. लोकप्रतिनिधी, प्रशासनाने धावल्यास चांगली कामे होतील. मी स्वतः राज्यातील जनतेचा लोकसेवक म्हणून काम करतो. आपत्कालीन परिस्थितीत लोकांना तातडीने दिलासा मिळाला पाहिजे. पावसाने पिकांचे नुकसान झाल्यास तातडीने पंचनामे करावे. मृतांच्या नातेवाइकांना देण्यात येणारी मदत तातडीने पोहोचवावी; तरच शासन आपल्या दारात आले, अशी भावना लोकांमध्ये निर्माण होईल.- एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री, महाराष्ट्र

 

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेPotholeखड्डे