शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

विश्वासदर्शक ठराव जिंकल्यानंतर, एकनाथ शिंदेंनी जनतेला दिलासा देण्यासाठी केल्या 3 खास घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 4, 2022 18:18 IST

सर्वांचे आभार मानताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जबरदस्त फटकेबाजी केली. तसेच, अन्यायाविरुद्ध बंड करणे, ही बाळासाहेबांचीच शिकवण असल्याचेही ते म्हणाले. तसेच, यावेळी त्यांनी राज्यातील जनतेला दिलासा देणाऱ्या तीन खास घोषणाही केल्या.

एकनाथ शिंदे सरकारने आज (सोमवारी) विधानसभेत विश्वासदर्शक ठराव जिंकला. या बहुमत चाचणीत भाजप- शिवसेना शिंदे गटाला 164 मते मिळाली तर महाविकास आघाडीला 99 मते मिळाली. यावेळी, सपा आणि एमआयएमचे आमदार तटस्थ राहिले. यानंतर, सर्वांचे आभार मानताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जबरदस्त फटकेबाजी केली. तसेच, अन्यायाविरुद्ध बंड करणे, ही बाळासाहेबांचीच शिकवण असल्याचेही ते म्हणाले. तसेच, यावेळी त्यांनी राज्यातील जनतेला दिलासा देणाऱ्या तीन खास घोषणाही केल्या.

एकनाथ शिंदे यांनी केलेल्या 3 मोठ्या घोषणा -हिरकणी गावाचा विकास - हिरकणी गावा संदर्भात, मुख्य प्रतोद भरत गोगावले यांनी केलेल्या मागणीवर, रायगड किल्ला ही आमची अस्मिता आहे आणि ज्या हिरकणीने इतिहास घडविला, तो हिरकणी गाव वाचविण्यासाठी शासनाच्या माध्यमाने आपण  21 कोटी रुपयांच्या निधीची घोषणा करतो, असे मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे.

इंधनावरील कर कमी करणार -जागतिक बाजारपेठेत तेलाच्या किमती वाढल्यानंतर, पंतप्रधानांनी इंधनावरील केंद्रीय कर कमी केला होता. मात्र,  इतर काही राज्यांनीही व्हॅट कमी केला होता. पण, महाराष्ट्राने पाच पैसेही कमी केले नव्हते. महाविकास आघाडी सरकारनं पाच पैसेही कमी केले नव्हते. मात्र, आता आमचे हे नवे युतीचे सरकार जनतेला दिलासा देण्यासाठी व्हॅट कमी करण्याबाबत लवकरच निर्णय घेण्यात घेईल, अशी घोषणाही मुख्यमंत्री शिंदे यांनी केली.

आत्महत्यामुक्त महाराष्ट्र करण्याची घोषणा - शिंदे म्हणाले, या राज्यात सगळ्यात महत्वाचा घटक म्हणजे बळीराजा. त्यांच्या बांधावर जाऊन सर्वच लोकं विचारपूस करत असतात. त्याच्या जीवनात सुखाचे, संमृद्धीचे आनंदाचे दिवस यावेत. यासाठी राज्य सरकार एवढे करेल, की शेतकरी आत्महत्यामुक्त महाराष्ट्र आम्हाला करायचा आहे. यासाठी विरोधी पक्षाचे सर्वांचेच योगदान आम्हाला लागेल. आपण दोघेही मिळून यासाठी काम करूयात, असे शिंदे म्हणाले.

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेPetrolपेट्रोलBJPभाजपाvidhan sabhaविधानसभा