शहरं
Join us  
Trending Stories
1
जिथं मोदी जातील तिथं मविआ जिंकेल, संजय राऊतांचा दावा; भाजपावरही साधला निशाणा
2
कोस्टल रोड आणि सी-लिंकला जोडणारा दुसरा महाकाय गर्डर यशस्वीरित्या बसवला! 
3
"काँग्रेसला देशात इस्लामिक स्टेट बनवायचाय; राहुल-सोनिया गांधी देश सोडून पळून जाणार"
4
सचिन तेंडुलकर यांच्याकडे अंगरक्षक असलेल्या सीआरपीएफ जवानाची गोळी झाडून आत्महत्या
5
उद्धव ठाकरेंनी दोनदा फसवण्याचा प्रयत्न केला; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा दावा
6
मोदींच्या सभेपूर्वी ठाकरे गटाचे पाच कार्यकर्ते पोलिसांच्या ताब्यात; अज्ञात स्थळी नजरकैदेत
7
Gautam Adani साठी 'अच्छे दिन', शेअर्सवर गुतवणूकदार तुटून पडले; बनला कमाईचा विक्रम
8
धक्कादायक! आंध्र प्रदेशात भीषण अपघात, महामार्गावर बस-ट्रकची धडक, सहा जणांचा होरपळून मृत्यू
9
उमेदवार भाजपचा! सभेनंतर शिंदे गट- ठाकरे गट भिडले; वाकोल्यात 'गद्दार'वरून तणाव
10
Mobile Tariff Hike : निवडणुकांनंतर वाढणार Mobile चं बिल, पाहा किती होईल Jio, Airtel आणि Vi रिचार्ज? 
11
इन्स्टाग्राम रील्सच्या मदतीने ५५ लाखांची चोरी उघड; मुंबई पोलिसांनी रायगडमधून दोन तरुणींना केली अटक
12
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची तेजीसह सुरुवात; सिप्लाच्या शेअरमध्ये बंपर तेजी, HDFC आपटला
13
"त्या पेट्रोल पंपावर शाळेच्या मुलांनी भरलेली व्हॅन असती तर?", घाटकोपर दुर्घटनेवरून शशांक संतापला
14
"घे बोकांडी, कर दहिहंडी म्हणणाऱ्या याच..."; मनसे नेते प्रकाश महाजनांचा सुषमा अंधारेंवर पलटवार
15
'बजरंगी भाईजान'ची मुन्नी झाली १०वी पास! टक्के किती मिळाले माहित्येय?
16
Post Office मध्ये ₹२०००, ₹३००० आणि ₹५००० ची RD करायची आहे? पाहा मॅच्युरिटीवर किती पैसे मिळतील?
17
अरविंद केजरीवाल पहिल्यांदाच करणार काँग्रेसचा प्रचार; आज दिल्लीत घेणार जाहीर सभा
18
Baba Ramdev Patanjali Foods : बाबा रामदेव यांच्या कंपनीला मोठा झटका, मार्च तिमाहीत २२ टक्क्यांनी घसरला नफा 
19
बीसीसीआय सेहवाग, गंभीरला डावलणार? मुख्य प्रशिक्षक पदासाठी व्हीव्हीएस लक्ष्मण देखील इच्छुक
20
आजचे राशीभविष्य १५ मे २०२४; आजची सकाळ फलदायी, अनेक राशींची परिस्थिती दुपारनंतर बदलणार

मुख्यमंत्री शिंदेंविरोधात बोलाल तर चुन चुन के, गिन गिन के मारेंगे; आमदाराचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Published: September 04, 2022 11:48 AM

शिवसेनेच्या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा सत्कार समारंभ कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभागृहात ठेवला होता. त्यावेळी त्या कार्यक्रमात अचानकपणे शिंदे गटाचे कार्यकर्ते नारेबाजी करत बंदिस्त सभागृहात घुसले.

बुलढाणा - शिवसेनेतील बंडखोरीनंतर पक्षात एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे असे दोन गट पाहायला मिळत आहे. खरी शिवसेना आमचीच असा दावा दोन्ही गटाकडून करण्यात येत आहे. त्यात आता शिंदे-ठाकरे गट एकमेकांना भिडत असल्याचं चित्रही समोर आले आहे. बुलढाण्यात शिंदे-ठाकरे गटाचे समर्थक आमनेसामने आले आणि एकच राडा झाला. या घटनेनंतर शिंदे गटाच्या आमदाराने ठाकरे गटाला इशारा दिला आहे. 

शिंदे गटातील आमदार संजय गायकवाड म्हणाले की, ठाकरे गटातील लोक पातळी सोडून टीका करत आहेत. आता तर राडा कमी झाला. पोलिसांनी थांबवलं. आमचे कार्यकर्ते खूप जमा होते. आम्हाला चिथावणीखोर भाषा वापरता परंतु त्यांना संजय गायकवाड आणि त्यांचे कार्यकर्ते माहिती नाही. यानंतर जर अशाप्रकारे विधाने केली तर चुन चुन के, गिन गिन के मारेंगे असा इशारा त्यांनी दिला आहे. 

नेमके काय घडले?शिवसेनेच्या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा सत्कार समारंभ कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभागृहात ठेवला होता. त्यावेळी त्या कार्यक्रमात अचानकपणे शिंदे गटाचे कार्यकर्ते नारेबाजी करत बंदिस्त सभागृहात घुसले. तेथील खुर्च्यांची तोडफोड करत ठाकरे गटाच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांना धक्काबुक्की करत संजय हाडे, गाडेकर यांना मारहाण केल्याचा आरोप आहे.

हल्ले केले तरी आम्ही थांबणार नाही, बुलढाणा हे बिहार नाहीअशा पद्धतीचे हल्ले केले तरी आम्ही थांबणार नाही. बुलढाणा हे बिहार नाही. शिवसेनचे काम सातत्यपूर्ण काम करत आहे. आम्ही कार्यरत राहू. पोलिसांनीही योग्य कार्यवाही न केल्यास संपूर्ण जि्ल्ह्यात याचा उद्रेक उमटेल, असे जिल्हा शिवसेना प्रमुख जालिंधर बुधवत म्हणाले. आम्ही पोलिस प्रशासनाची वाट पहाणार आहोत. हल्ले करणाऱ्यांची नावेही पोलिसांना देण्यात येणाऱ्या रिपोर्टममध्ये देण्यात येणार असल्याचे बुधवत यांनी सांगितले. 

शिंदे गटातील आमदारांची चिथावणीखोर विधानेअलीकडेच शिंदे गटातील मागठणेचे आमदार प्रकाश सुर्वे यांनीही धमकी देणारं विधान केले होते. सुर्वे यांनी एका कार्यक्रमात भाषण करताना म्हटलं की, कुणी आपल्याला काही बोललं तर ठोकून काढा, कापून काढा, हात नाही तोडता आला तर तंगडी तोडा, दुसऱ्या दिवशी मी टेबल जामीन करून देतो. कोथळा काढल्याशिवाय सोडणार नाही, अशा चिथावणीखोर वाक्यांचा उल्लेख होता. त्यानंतर विरोधकांनी यावरून सत्ताधारी पक्षावर टीकास्त्र सोडलं होते. 

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेEknath Shindeएकनाथ शिंदेShiv Senaशिवसेना