शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

"लखनऊमध्ये त्यांची २०० एकर जागा, पण मी फक्त..."; मुख्यमंत्री शिंदेंचा उद्धव ठाकरेंना गंभीर इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 1, 2024 10:17 IST

महायुती सरकारला दोन वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाकरे गटावर जोरदार निशाणा साधला आहे.

CM Eknath Shinde : राज्यातील मुख्यमंत्री  एकनाथ शिंदे यांच्या महायुती सरकारला रविवारी दोन वर्ष पूर्ण झाली. दोन वर्षापूर्वी शिवसेनेत फूट पडल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भाजपसोबत जात राज्यात सत्ता स्थापन केली होती.महायुती सरकारला दोन वर्ष पूर्ण झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एक फेसबुक पोस्ट लिहीली आहे.  बाळासाहेब ठाकरेंचा विचार राज्याच्या विकासाचा ध्यास यावर दोन वर्षं पूर्ण झाल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. तसेच एका मुलाखतीमध्ये बोलताना त्यांनी कमी काळाता महायुती सरकारने खूप काम केल्याचे मुख्यमंत्री शिंदे म्हणाले. यासोबत त्यांनी उद्धव ठाकरेंवरही जोरदार निशाणा साधला.

"प्रत्यक्षात कमी काळाता महायुती सरकारने खूप काम केले. महाविकास आघाडीने बंद केलेली कामे मग ती मेट्रोची असो वा रस्त्याची. ती सर्व कामे आम्ही पुन्हा सुरू केली आहेत. जनतेची इच्छा आहे की आम्ही सत्तेत यावे कारण आम्ही सर्वसामान्यांचे सरकार आहोत. सरकारला २ वर्षे पूर्ण झाली आहेत आणि आम्ही खूप काम केले आहे," असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. यासोबत त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विकासकामांचे कौतुक केले आणि या वाटचालीत महाराष्ट्र त्यांच्या पाठीशी उभा राहील, असेही एकनाथ शिंदे म्हणाले.

एएनआयला दिलेल्या मुलाखतीमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंवरही प्रहार केला. "शिवसेना ठाकरे गटाकडे जे साडेचार टक्के मतं राहिले आहेत. लोकसभेला ठाकरे गटाच्या काही जागा कोणामुळे निवडून आल्या हे सर्वांना माहिती आहे. काँग्रेसची व्होट बँक त्यांच्याकडे आली. मात्र, काँग्रेसची व्होट बँक तात्पुरती आहे. ही तात्पुरती आलेली सूज आहे. पण सूज जास्त काळ राहत नाही," अशी बोचरी टीका मुख्यमंत्री शिंदेंनी केली.

योग्य वेळी सगळं बोलणार - मु्ख्यमंत्री शिंदे

"ठाकरे गटाची जागा फक्त आरोप करणाऱ्यांमध्ये आहे. माझ्याकडे त्यांच्याविषयी भरपूर माहिती आहे. लखनऊमध्ये त्यांची २०० एकर जागा आहे. आणखी कुठे काय काय आहे याची सर्व माहिती माझ्याकडे आहे. पण मी आरोपाला फक्त आरोपाने उत्तर देत नाही. यावर योग्य वेळी मी सर्व बोलणार आहे," असा इशारा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिला.

"ज्यांचं आयुष्य फक्त खोके जमा करण्यात गेलं. उठता, बसता त्यांना खोक्याशिवाय काहीही समजलं नाही याचा साक्षीदार मी आहे. राज ठाकरे एकदा म्हणाले होते की, त्यांना खोके नाही कंटेनर पाहिजे. खोके ठेवायला कंटेनर लागतो ना? त्यांनी आयुष्यभर फक्त खोके जमा करण्याचं काम केलं आहे," असेही मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.

टॅग्स :MahayutiमहायुतीEknath Shindeएकनाथ शिंदेUddhav Thackerayउद्धव ठाकरेShiv Senaशिवसेना