शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल; "बाळासाहेबांच्या विचारांशी ज्यांनी बेईमानी केली..."  

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 25, 2022 16:39 IST

होय मी कंत्राटी मुख्यमंत्री, महाराष्ट्राच्या विकासाचं कंत्राट घेतलंय, हे राज्य अधिक समृद्ध करण्याचं कंत्राट घेतलंय असा टोला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना नेत्यांना लगावला.

मुंबई - तुमचे लोक असताना आमचे लोक होते का? आमचे लोक घोषणा देत असताना तुमचे लोक पुढे गेले. मिटकरी आला आणि कळ काढायला लागला. रोज गद्दार गद्दार, आम्ही बाळासाहेबांच्या विचारांशी गद्दारी केली नाही. बाळासाहेब म्हणायचे, काँग्रेस-राष्ट्रवादीचा आपला शत्रू, त्यांना जवळ करण्यापेक्षा मी माझं दुकान बंद करेन. आम्ही भाजपा-शिवसेना युती म्हणून निवडणूक लढवली. बहुमत मिळालं त्यानंतर अनैसर्गिक आघाडी केली. बाळासाहेबांच्या विचारांशी बेईमानी कुणी केली? असा सवाल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना विचारला. 

एकनाथ शिंदे म्हणाले की, सिल्लोडच्या सभेत लोकांची दुतर्फा गर्दी झाली होती. सगळीकडे लोक बाहेर पडले होते. आम्ही गद्दार असतो तर लोकांनी आमच्याकडे पाठ फिरवली असती. आम्ही घेतलेली भूमिका ही लोकांना पटली आहे. बाळासाहेबांच्या विचारांशी ज्यांनी बेईमानी केली त्यांच्याशी फारकत घेतली. आम्हाला भाडोत्री फौजफाट्याची आवश्यकता नाही असं त्यांनी म्हटलं.  

होय, मी कंत्राटी मुख्यमंत्री...माझा उल्लेख कंत्राटी मुख्यमंत्री म्हणून केला. राज्याचा कुणीही मुख्यमंत्री असू द्या. नारायण राणेंनी मुख्यमंत्र्यांबद्दल बोलले तेव्हा केंद्रीय मंत्री असताना त्यांना जेलमध्ये टाकून दिले. मुख्यमंत्र्याविरोधात अपशब्द वापरले. या देशाच्या लोकशाहीत घटनेप्रमाणे आम्ही इथं बसलोय. बहुमत सिद्ध करून बसलोय. आम्ही घटनेविरोधात कृत्य करणार नाही. जे अध्यक्ष आहेत त्यांना घटनेचा अभ्यास आहे. वैचारिक पातळी घसरली आहे. होय मी कंत्राटी मुख्यमंत्री, महाराष्ट्राच्या विकासाचं कंत्राट घेतलंय, हे राज्य अधिक समृद्ध करण्याचं कंत्राट घेतलंय. गोरगरिब जनतेचे अश्रू दूर करण्याचं कंत्राट घेतलंय. बाळासाहेबांच्या हिंदुत्वाचे विचार पुढे घेऊन जाण्याचं कंत्राट घेतलंय. बहुजनांच्या हितासाठी कंत्राट घेतलंय. असंगाशी विसंगती करण्यापेक्षा कंत्राटी मुख्यमंत्री कधीही बरा असंही मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी म्हटलं. 

केवळ वैचारिक दिवाळखोरीकेवळ वैचारिक दिवाळखोरीतून हिणवणे हेच उद्योग सुरू आहे. प्रत्येकाने मर्यादा सांभाळली पाहिजे. आम्ही आमच्या कामातून उत्तर देऊ. माझ्याकडे पण टँलेट आहे. माझ्या कलागुणांना कधी व्यासपीठ उपलब्ध करून दिले नाही. तुम्ही गपचुप जायचे. कानात सांगायचे. एकदा बोलणं झालं की संपलं मग. आणखी पुढेही शिल्लक ठेवायचं आहे. आम्हाला येऊन दीडच महिने झाले. पेट्रोल डिझेलचे दर कमी केले. १४ लाख शेतकऱ्यांना ६ हजार कोटींचे वाटप येत्या सप्टेंबरपासून सुरू होतंय अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.  

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेUddhav Thackerayउद्धव ठाकरेShiv Senaशिवसेना