बुलढाणा: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज बुलढाण्यातील जिजामातांच्या जन्मस्थानाचं दर्शन घेतलं. यावेळी मुख्यमंत्र्यांनी जिजाऊंचं पूजन केलं आणि त्यांच्यासमोर नतमस्तक झाले. मातृतीर्थ सिंदखेड राजा विकास आराखड्याला निधी कमी पडू देणार नाही, अशी ग्वाही यावेळी मुख्यमंत्र्यांनी दिली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या मातोश्री जिजाऊ यांचं जन्मस्थान असलेल्या सिंदखेडमध्ये आहे. जिजामाता यांच्या जन्मस्थळाचं आज मुख्यमंत्र्यांनी दर्शन दिलं. 'हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासारखे एक महान राजे ज्यांनी आपल्याला दिले, त्या माऊलीपुढे नतमस्तक होताना एक वेगळीच उर्जा प्राप्त होते,' असं मुख्यमंत्र्यांनी ट्विटमध्ये म्हटलं. 'जिजाऊंच्या पुतळ्याला हारार्पण केले आणि महाराष्ट्रातील तमाम नागरिकांच्या वतीने विनम्र अभिवादन केले. समाजातील तळागाळातील अंतिम माणसाच्या कल्याणाचा जो मार्ग शिवछत्रपतींनी दाखवला, त्याच मार्गावर आपले सरकार काम करीत आहे,' असेदेखील मुख्यमंत्र्यांनी ट्विटमध्ये म्हटलं.
जय जिजाऊ... शिवरायांच्या माऊलीपुढे मुख्यमंत्री नतमस्तक
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 14, 2019 17:42 IST