शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

'मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांची माफी मागावी', विधानसभेच्या कामकाजावर विरोधकांचा दिवसभरासाठी बहिष्कार

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 1, 2025 13:58 IST

Monsoon Session Maharashtra: 'शेतकऱ्यांचा अपमान सत्ताधाऱ्यांनी केल्याचाही विरोधकांचा आरोप

Monsoon Session Maharashtra: गेल्या दोन-चार महिन्यात महाराष्ट्रात विविध मुद्दे गाजले. अनेक मुद्द्यांवरून महाविकास आघाडीने महायुती सरकारले घेरले. त्यामुळे सोमवारपासून सुरु झालेल्या पावसाळी अधिवेशनाकडे महाराष्ट्रातील जनतेचे लक्ष लागले होते. अपेक्षेप्रमाणे पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्याच दिवशी शेतकऱ्यांच्या प्रश्नावर विरोधक प्रचंड आक्रमक झाल्याचे दिसले. कृषिमंत्री शेतकऱ्यांविरोधात विधाने करतात, भाजपाचे माजी मंत्री आणि आमदार बबनराव लोणीकर यांनी देखील शेतकऱ्यांच्या विरोधात आक्षेपार्ह विधान केले अशा मुद्द्यांवरून विरोधकांनी विधानसभेत जोरदार आक्षेप घेतला. तसेच, विधानसभेच्या दिवसभराच्या कामकाजावरही बहिष्कार घातला.

नाना पटोलेंचे निलंबन

शेतकऱ्यांचा वारंवार अपमान सत्ताधारी करत आहेत, अशा सरकारचे प्रमुख म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांची माफी मागावी, अशी मागणी महाविकास आघाडीच्या आमदारांनी केली. शेतकऱ्यांच्या विषयावर काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार, नाना पटोलेविधानसभा अध्यक्षांच्या स्थानाजवळ गेले. या गोंधळामुळे विधानसभेचे कामकाज पाच मिनिटांसाठी तहकूब करण्यात आले. कामकाज पुन्हा सुरू झाल्यावर 'मुख्यमंत्री माफी मागा' अशी पुन्हा घोषणाबाजी सुरू झाली. त्यावेळी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी नाना पटोले यांच्यावर एक दिवसाच्या निलंबनाची कारवाई केली.

"शेतकऱ्यांविरोधात विधान करणाऱ्यांचे सरकारकडून समर्थन?"

राज्यात आज शक्तिपीठ महामार्गाविरोधात शेतकऱ्यांचे आंदोलन चालू आहे. बारा जिल्ह्यातील शेतकरी या महामार्गाला विरोध करत आहे, दुसरीकडे राज्याचे कृषिमंत्री शेतकऱ्यांविरोधात विधान करतात, सत्ताधारी आमदार बबनराव लोणीकर शेतकरी आमच्या पैशावर जगतात अशी उपकाराची भाषा करतात. लोणीकर यांच्यावर कारवाई होत नाही. यावरून अशी विधाने करणाऱ्यांचे सरकार समर्थन करत आहे का? असा सवाल काँग्रेस विधिमंडळाचे नेते विजय वडेट्टीवार यांनी उपस्थित केला.

"सभागृहात विरोधकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न"

शेतकऱ्यांच्या विषयावर विरोधकांना सभागृहात बोलू दिले जात नाही, निलंबन केले जाते. शेतकऱ्यांच्या विषयावर आंदोलन करू, तुरुंगात टाकले तरी चालेल पण शेतकऱ्यांसाठी आम्ही लढत राहू, अशी आक्रमक भूमिका विजय वडेट्टीवार यांनी घेतली. महाविकास आघाडीच्या नेत्यांना सभागृहात बोलूच दिले जात नाही, उलट शेतकऱ्यांच्या प्रश्नावर बोलल्यावर कारवाई करण्यात येते, असा आरोप विरोधकांनी केला. यावर महाविकास आघाडीच्या आमदारांनी विधानसभेच्या कामकाजावर बहिष्कार टाकला. विरोधकांनी पूर्ण दिवसाच्या कामकाजावर बहिष्कार टाकत सभात्याग केला.

टॅग्स :vidhan sabhaविधानसभाMaharashtraमहाराष्ट्रNana Patoleनाना पटोलेVijay Vadettiwarविजय वडेट्टीवारDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस