शहरं
Join us  
Trending Stories
1
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
2
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
3
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
4
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
5
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
6
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
7
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
8
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
9
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
10
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
11
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
12
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
13
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
14
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
15
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
16
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
17
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
18
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
19
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
20
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
Daily Top 2Weekly Top 5

कर्जमाफीसाठी नेमके कोणते शेतकरी पात्र?; CM देवेंद्र फडणवीस यांनी केले स्पष्ट, म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2026 14:35 IST

CM Devendra Fadnavis PC News: शेतकरी कर्जमाफीची घोषणा केलेली आहे. काही लोक वेगवेगळ्या गोष्टी पसरवण्याचा प्रयत्न करत आहेत, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.

CM Devendra Fadnavis PC News: महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पात महाराष्ट्राला भरभरून मिळाले आहे. महाराष्ट्राला भरभरून मिळेल, तेव्हा विदर्भ कसा मागे राहील? अनेक गोष्टी असतील, पण विदर्भासाठी सगळ्या मोठा गेमचेंजर प्रकल्प हा वैनगंगा, नळगंगा इरिगेशन प्रकल्प आहे. आजपर्यंतच्या इतिहासातील हा सगळ्यात मोठा नदीजोड प्रकल्प आहे. त्याला प्रशासकीय मान्यता देऊन अर्थसंकल्पात घोषणा केलेली आहे. त्यामुळे विदर्भाचे चित्र पूर्ण बदलेल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. ते पत्रकारांशी बोलत होते.

अर्थसंकल्प सादर करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाकांक्षी अशा कर्जमाफीची घोषणा केली आहे. ज्या शेतकऱ्यांचे पीक कर्ज ३० सप्टेंबर २०२५ रोजी थकीत होते, अशा पात्र शेतकऱ्यांचे २ लाख रुपयांपर्यंतचे कर्ज पूर्णपणे माफ करण्यात येणार आहे. जे शेतकरी आपल्या कर्जाचे हप्ते वेळेवर आणि नियमितपणे भरत आहेत, अशा प्रामाणिक कर्जदार शेतकऱ्यांना प्रोत्साहन म्हणून ५०,००० रुपयांचे अनुदान देण्यात येणार आहे. सरकारने केलेल्या शेतकरी कर्जमाफीवरून विरोधक टीका करत आहेत. या टीकेला मुख्यमंत्री फडणवीस यांनी उत्तर दिले.

काही लोकांचा वेगवेगळ्या गोष्टी पसरवायचा प्रयत्न

शेतकरी कर्जमाफीची घोषणा केलेली आहे. त्यामुळे त्याबाबत कोणाच्याही मनात संभ्रम नाही. काही लोक वेगवेगळ्या गोष्टी पसरवण्याचा प्रयत्न करत आहेत. कोणी म्हणतेय की, राष्ट्रीयकृत बँकांची होणार नाही, कुणी म्हणतेय की, जिल्हा बँकेची होणार नाही, कोणी म्हणतेय अमूक एका सोसायटीची होणार नाही, कोणी म्हणतेय त्याची होणार नाही. परंतु, आम्ही २ लाखांपर्यंत कोणतीही बँक असो, ज्यांना पीक कर्ज देण्याचा अधिकार आहे, अशा कोणीही दिलेले पीककर्ज हे आम्ही माफ करणार आहोत.

माफी शेतकऱ्याला द्यायची आहे, बँकेला नाही 

आमचा प्रयत्न हा आहे की, माफी शेतकऱ्याला द्यायची आहे, बँकेला नाही. शेतकऱ्याला फायदा झाला पाहिजे, याकरिता, आमचे काम सुरू आहे. आम्ही यापूर्वीच सांगितले आहे की, ३० जूनच्या आधी आपण कर्जमाफी करणार आहोत. त्यामुळे अर्थसंकल्पात ती आली असल्यामुळे पुढील कार्यवाही सुरू होईल. कमिटी यावर काम करत आहे, कमिटी बाकी सगळ्या गोष्टी सांगेल. एवढेच सांगतो की, जुन्या कोणत्याही कर्जमाफीपेक्षा चांगली ही कर्जमाफी असेल, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी नमूद केले.

दरम्यान, माझी माध्यमांना विनंती आहे की, नागरिकांमध्ये विनाकारण भीतीचे वातावरण तयार करू नये. जी काही परिस्थित आहे, ती केंद्र सरकार हाताळत आहे, ती केंद्र सरकार सांगते आहे. विनाकारण वेगवेगळ्या बातम्या दाखवून, हे घडणार, ते घडणार असे सांगून, नागरिकांच्या मनात भीती आणि संभ्रम निर्माण करणे, हे देशाच्या आणि समाजाच्या हितात नाही. हेच केंद्र सरकारनेही स्पष्टपणे सांगितले आहे. 

English
हिंदी सारांश
Web Title : Who Qualifies for Loan Waiver? CM Fadnavis Clarifies Eligibility

Web Summary : CM Fadnavis clarified that farmers with overdue crop loans until September 30, 2025, are eligible for waivers up to ₹2 lakh. Regular payers will receive ₹50,000 incentives. He refuted claims about bank exclusions and emphasized the farmer-centric approach, assuring a better scheme than before.
टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसFarmerशेतकरीfarmingशेतीState Governmentराज्य सरकारBanking Sectorबँकिंग क्षेत्र