शहरं
Join us  
Trending Stories
1
स्टार फुटबॉलर लिओ मेस्सी पोहोचला 'वनतारा'मध्ये; केली महाआरती, वन्य प्राण्यांमध्येही रमला!
2
मेस्सीची 'वनतारा भेट'! महाआरती, शिवाभिषेक, बाप्पाचरणी नतमस्तक अन् वाघ-सिंहाशी धमाल (Photos)
3
IPL 2026 Auction: पृथ्वी शॉने लिलाव सुरू असताना केलेली मोठी चूक, नंतर करावं लागलं 'हे' काम
4
नागपुरात भाजपमध्ये उमेदवारीसाठी तोबा गर्दी, मुलाखतीच्या वेळापत्रकात करावा लागला बदल
5
VIDEO : अनसोल्ड परदेशी खेळाडूसाठी काव्या मारननं पर्समधून १३ कोटी काढले; संजीव गोएंका बघतच राहिले!
6
Aadhaar New Rules : आधार फेस ऑथेंटिकेशन म्हणजे काय? केंद्र सरकार नवीन नियम लागू करणार
7
पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दोन वेळा 'अनसोल्ड' राहिल्यावर शेवटी जुन्या मालकानेच दाखवला भरवसा
8
स्मृतिभ्रंशाने त्रस्त असलेल्या महिलेचा क्रिकेटपटू सलीम दुराणी यांची पत्नी असल्याचा दावा
9
"पंतप्रधान मोदींना दोन गोष्टींचा अत्यंत तिरस्कार, एक गांधींचे विचार अन् दुसरे...!"; राहुल गांधींचा हल्लाबोल
10
पतसंस्था अध्यक्षाला ग्राहक आयोगाने सुनावली दोन वर्षांच्या कारावास, दंडाची शिक्षा
11
विरार हत्याकांड प्रकरण: कुख्यात गुंड सुभाषसिंह ठाकूर याला ७ दिवसांची पोलीस कोठडी
12
मुंबईकर सरफराज खानला मोठा दिलासा! IPL च्या आगामी हंगामात पगारवाढीसह चेन्नईकडून उतरणार मैदानात
13
रोजगार क्षेत्रातून दिलासादायक बातमी; बेरोजगारी 9 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर
14
IPL Auction 2026 : काव्या मारन vs आकाश अंबानी यांच्यात जुगलबंदी; त्यात अनकॅप्ड खेळाडू झाला 'करोडपती'
15
धक्कादायक! विमानतळावर भुताटकी, प्रवाशांना त्रास देते एक रहस्यमय सावली, प्रवाशांचा दावा
16
IPL 2026 Auction: 'त्या' खेळाडूविषयी मनात आदरच..; आकाश अंबानींनी सांगितली पडद्यामागची गोष्ट
17
Harsimrat Kaur Badal : "सरकार गरिबांच्या पोटावर लाथा मारतंय...", मनरेगावरून हरसिमरत कौर यांचा जोरदार हल्लाबोल
18
पीएम मोदींना दोन गोष्टींची खूप चीड; 'जी राम जी' विधेयकावरुन राहुल गांधींची टीका
19
कोण आहे Prashant Veer? MS धोनीसोबत खेळण्याचं स्वप्न पाहणाऱ्या खेळाडूवर CSK नं लावली विक्रमी बोली
Daily Top 2Weekly Top 5

राज ठाकरेंचा विधानसभा निकालांवर संशय, CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2025 20:06 IST

CM Devendra Fadnavis First Reaction On Raj Thackeray Statement: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या निकालावर शंका व्यक्त करणाऱ्या राज ठाकरेंवर महायुतीतील नेते टीका करताना पाहायला मिळत आहेत.

CM Devendra Fadnavis First Reaction On Raj Thackeray Statement: वरळी येथे मनसेचा राज्यस्तरीय मेळावा पार पडला.  या मेळाव्यात बोलताना मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी २०२४ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीच्या निकालाबाबत काही आक्षेप नोंदवत संशय व्यक्त केला. विधानसभा निवडणुकीचे निकाल येऊन अनेक दिवस उलटले आहे. नंतर प्रथमच राज ठाकरे यांनी मेळाव्यात कार्यकर्ते, पदाधिकारी आणि नेत्यांसमोर जाहीरपणे भूमिका मांडली. राज ठाकरे यांनी केलेल्या मतप्रदर्शनावरून भाजपासह महायुतीतील नेते राज ठाकरेंवर टीका करत आहेत. यातच आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज ठाकरे यांच्या भूमिकावर पहिली प्रतिक्रिया दिली. 

विधानसभा निवडणूक निकाल लागल्यावर महाराष्ट्रभर सन्नाटा पसरला. लोकांनाच हा निर्णय कळला नाही, पचला नाही. माझ्याकडे संघ परिवाराशी संबंधित एक व्यक्ती आली होती, ते म्हणाले 'इतना सन्नाटा क्यो है भाई, कोई तो जिता होगा... कोणीतरी जिंकलं ना मग जल्लोष का नाही? काही काही गोष्टींवर विश्वासच बसू शकत नाही. भाजपाला १३२ जागा मिळाल्या, मागील वेळी १०५ मिळाल्या होत्या. २०१४ साली १२२ जागा होत्या. भाजपाचे समजू शकतो, पण अजित पवारांना ४२ जागा कुणाचा तरी विश्वास बसेल का? त्याशिवाय जे इतके वर्ष राजकारण करत आले, ज्यांच्या जीवावर हे लोक मोठे झाले त्या शरद पवारांना फक्त १० जागा मिळतात.  या सर्व न समजण्यासारख्या गोष्टी आहेत, असे राज ठाकरे यांनी म्हटले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिल्ली दौऱ्यावर आहेत. दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेथे प्रचारसभा, बैठका घेत आहेत.

पत्रकारांशी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना राज ठाकरे यांनी मांडलेल्या भूमिकेवर प्रश्न विचारण्यात आला. यावर बोलताना, राज ठाकरे यांच्याबद्दल आपण महाराष्ट्रात बोलू, असे सांगत एका वाक्यात उत्तर दिले. तसेच दिल्ली विधानसभेत परिवर्तन होणार आहे. दिल्लीची जनता भाजपासोबत जाणार आहे. दिल्लीतील परिवर्तन महिला करणार आहेत. आम आदमी पक्षाचे सरकार उलथवण्याचा निर्णय दिल्लीकरांनी घेतला आहे, असा विश्वास देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केला. 

दरम्यान, राज ठाकरे यांनी निवडणूक निकालाची दाखले देत चिरफाड केली. हा निकाल कसा लागला यावर संशय व्यक्त करत लोकसभेनंतर लगेचच तीन चार महिन्यात निकाल फिरतो कसा? असा सवाल राज ठाकरे यांनी केला. आपल्याला लोकांनी मतदान केले आहे. फक्त ते आपल्यापर्यंत आले नाही, असा दावा करत आता आगामी निवडणुकीच्या कामाला लागा, असे आदेश राज ठाकरे यांनी मनसैनिकांना दिले.

 

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसRaj Thackerayराज ठाकरेBJPभाजपाMaharashtra Navnirman Senaमहाराष्ट्र नवनिर्माण सेनाMNSमनसेmaharashtra assembly election 2024 resultमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024