शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
3
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
6
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
7
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
8
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
9
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
10
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
11
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
12
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
13
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
14
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
15
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
16
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
17
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
18
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
19
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
20
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
Daily Top 2Weekly Top 5

'राज्यात पूरस्थिती असताना मुख्यमंत्री प्रचारात व्यस्त'

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 5, 2019 06:33 IST

काँग्रेस नेते नाना पटोले यांचा आरोप

मुंबई : अतिवृष्टीमुळे राज्यातील विविध भागांत पूरस्थिती निर्माण झाली आहे. रस्ते व रहिवासी भागांत पाणी साचल्याने भीतीचे वातावरण आहे. अशा बिकट प्रसंगी राज्य आपत्ती निवारण प्राधिकरणाचे पदसिद्ध अध्यक्ष असलेले मुख्यमंत्री प्रचारयात्रेत व्यस्त आहेत.मुख्यमंत्र्यांनी तातडीने उपाययोजना करून जनतेला संकटातून न काढल्यास आम्ही मंत्रालयातील आपत्ती निवारण कक्षाचा ताबा घेऊ, असा इशारा प्रदेश काँग्रेस प्रचार समितीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी दिला आहे.पावसाच्या पार्श्वभूमीवर मुंबई येथे प्रदेश काँग्रेस, मुंबई काँग्रेस व काँग्रेस प्रचार समितीच्या नेत्यांची तातडीची बैठक घेतली. या वेळी बोलताना पटोले म्हणाले, मुख्यमंत्री राज्यभर प्रचार दौरे करत असल्याने संपूर्ण यंत्रणा मुख्यमंत्र्यांची बडदास्त ठेवण्यामध्ये व्यस्त आहे. राज्याच्या मुख्य सचिवांपासून विभाग व जिल्हा स्तरावरील अधिकारी कोणतीही पावले उचलताना दिसत नाहीत, अशी टीकाही त्यांनी त्यांना केली.काँग्रेस कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरून आपत्तीग्रस्तांना आवश्यक मदत व साहाय्य करावे, असे आवाहन या वेळी करण्यात आले. या बैठकीस माजी केंद्रीय मंत्री मिलिंद देवरा, मुंबई कार्याध्यक्ष एकनाथ गायकवाड, प्रदेश कार्याध्यक्ष मुजफ्फर हुसेन, कृपाशंकर सिंह, आमदार हरिभाऊ राठोड, मोहन जोशी, चरणजित सप्रा आदी नेते उपस्थित होते.‘एसडीआरएफ फंडातून मदत द्यावी’मुंबई शहर, उपनगर, ठाणे, पालघर, पनवेल, बदलापूर, नवी मुंबई, रायगड, पेण, नाशिक, सांगली, कोल्हापूर यांसह राज्याच्या विविध भागांत महापुराने प्रचंड थैमान घातले आहे. कित्येकांना जीव गमवावा लागत आहे. लोक जीव मुठीत घेऊन वावरत आहेत. जनावरांच्या जीवितहानीची तर गणतीच नाही. घरात पाणी घुसल्याने नागरिकांना इतरत्र आश्रय घ्यावा लागत आहे. अनेक भागांतील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. त्यामुळे राज्य सरकारने तातडीने नैसर्गिक आपत्ती जाहीर करून पूरग्रस्तांना ‘राष्ट्रीय आपदा व्यवस्थापन कायदा- २००५’नुसार एसडीआरएफ फंडातून मदत वितरित करावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे.

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसfloodपूरRainपाऊसNana Patoleनाना पटोले