शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेत महागाई वाढली, डोनाल्ड ट्रम्प यांनी टॅरिफवर घेतला यू-टर्न; भारताला मोठा फायदा होणार
2
लालू प्रसाद यादवांच्या मुलीचा खळबळजनक आरोप! रोहिणी म्हणाल्या "तेजस्वीने मला घरातून बाहेर..."
3
Rohini Aacharya: लालू प्रसाद यादवांच्या घरात ज्यांच्यामुळे सुरू झालं 'महाभारत', ते संजय यादव कोण?
4
एका वर्षात तिसरी वेळ! भारताच्या शेजारी देशात सापडली तब्बल १००० टन सोन्याची खाण, कोणता आहे देश?
5
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आज कराडात! सातारा जिल्ह्यामधील महाविकास आघाडी बाबत होणार निर्णय?
6
मुंबईत मोठी दुर्घटना! भायखळ्यातील बांधकाम सुरू असलेल्या इमारतीजवळ मातीचा ढिगारा कोसळला; २ मजुरांचा मृत्यू, ३ जखमी
7
दिल्ली ब्लास्ट प्रकरण : आता पठानकोटमधून आणखी एका डॉक्टरला अटक, अल-फलाह विद्यापीठात केली होती नोकरी
8
IPL 2026 : अय्यरसह मसल पॉवर रसेल OUT! मिनी लिलावासाठी शाहरुखच्या KKR च्या पर्समध्ये सर्वाधिक पैसा
9
इराण देशभरातील लोकांच्या मोबाईल फोनवर 'इमरजन्सी अलर्ट' का पाठवत आहे?
10
IPL 2026: प्रितीच्या पंजाबनं ग्लेन मॅक्सवेलला दाखवला ठेंगा! कोच रिकी पाँटिंगनं सांगितली आतली गोष्ट
11
जी मोटारसायकल चोरली, तिच्यावरच गेला जीव; मिरज रोडवर चोर ठार, कसा घडला अपघात?
12
Amravati Crime: छायाचा घरी येणाऱ्या विश्वंभरवर जडला जीव, पती प्रमोदची देवी दर्शनानंतर केली हत्या; लंघुशंकेसाठी थांबली अन्...
13
चुकूनही करू नका 'हे' काम, क्षणार्धात तुमचा मोबाईल फोन होऊ शकतो हॅक! गुगलने काय इशारा दिला?
14
नोकरी सोडून आयपीएस अधिकारी उतरले बिहार निवडणुकीच्या मैदानात; मराठमोळ्या लांडेंना किती मिळाली मते?
15
"रडायचं नाही लढायचं! बिहार निकालानं खचून जाऊ नका; मुंबई महापालिकेवर काँग्रेसचा झेंडा फडकवा"
16
मशिदीचा पत्ता, मोबाइल SIM, थायलंड टूर अन्...! डॉ. शाहीन संदर्भात मोठा खुलासा; डॉ परवेझला कशासाठी नेलं होतं कानपूरला?
17
दिल्ली स्फोटापूर्वी उमर घाबरला होता, नवीन सीसीटीव्हीमध्ये खुलासा, दोन्ही फोन कुठे लपवले?
18
Ravindra Jadeja : जड्डूनं केली विक्रमांची 'बरसात'! WTC मध्ये असा पराक्रम करणारा ठरला पहिला
19
Travel : नवीन वर्ष परदेशात सेलिब्रेट करायचा विचार करताय? 'या' देशांमध्ये होऊ शकते खिशाला परवडणारी ट्रीप!
20
'भाजपाला फायदा करून देण्याची सुपारी घेतलीय का?'; काँग्रेसच्या स्वबळाच्या निर्णयावर शरद पवार गट नाराज
Daily Top 2Weekly Top 5

ओला दुष्काळ समजून मदतीचे पॅकेज आठवड्यात, मुख्यमंत्र्यांची घोषणा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 1, 2025 09:55 IST

५ लाख नागरिकांना आरोग्य किट; ५ लाख विद्यार्थ्यांना शालेय किट, पूरग्रस्तांना गहू, तांदळासह जीवनावश्यक वस्तूही मोफत 

मुंबई : राज्यातील अतिवृष्टीग्रस्त व पूरग्रस्तांना येत्या आठ दिवसांत सर्वसमावेशक मदत जाहीर केली जाईल आणि मदतीची रक्कम दिवाळीच्या आत बँक खात्यात जमा करण्याचा प्रयत्न असेल, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी दिली. राज्य मंत्रिमंडळ बैठकीत अतिवृष्टीवर चर्चा झाल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी पत्रकारांना माहिती दिली. राज्यात सुमारे ६० लाख हेक्टरचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली. 

येत्या दोन-तीन दिवसांत नुकसानीची सगळ्या प्रकारची माहिती मिळणार आहे. त्यानंतर मदतीचे सर्वंकष धोरण ठरवू. ज्यावेळी दुष्काळ पडतो, त्यावेळी ज्या सवलती देण्यात येतात त्या सर्व सवलती लागू करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री

...तर जास्तीचा तांदूळअतिवृष्टीग्रस्त प्रत्येक कुटुंबाला १० किलो गहू, १० किलो तांदूळ, ५ लिटर केरोसीन, ३ किलो तूरडाळ मोफत देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. पिठाच्या गिरण्या बंद असतील तर तिथे १० किलो अतिरिक्त म्हणजे २० किलो तांदूळ दिला जाईल.

स्कूल बॅग, वह्याहीपाच लाख शालेय विद्यार्थ्यांना स्कूल बॅग, सहा वह्या, पुस्तके, कंपास आणि पाण्याची बाटली  देणार. त्यासाठी सीएसआर अंतर्गत मदत घेणार.

नुकसान भरपाईसाठी सर्वंकष धोरण आणणार  सर्व आकडेवारी आल्यानंतर केंद्राकडे मदतीचा प्रस्ताव पाठविण्यात येईल, केंद्र सरकार सर्वतोपरी मदत करणारच आहे पण केंद्राच्या मदतीसाठी न थांबता खरडून गेलेली जमीन, विहिरी, पडलेली घरे यासह सर्वप्रकारच्या नुकसान भरपाईसाठी सर्वंकष धोरण अमलात आणले जाईल, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.

‘ते’ २,२०० कोटी रुपये नेमके कधीचे?अतिवृष्टीग्रस्तांना २२०० कोटी रुपयांच्या मदतीचे वितरण सुरू झाल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी मराठवाड्यात अतिवृष्टीची पाहणी करायला गेले असतानाच स्पष्ट केले होते. हा निधी ऑगस्टपर्यंत झालेल्या अतिवृष्टीचा फटका बसलेल्यांसाठी आहे. 

बँकांकडून वसुली नाही : शेतकऱ्यांना बँकेच्या नोटीस यायचे प्रकरण एकाच जिल्ह्यात झाले आहे. त्या नोटीसही जुन्या आहेत. तिथे बँकांना स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत. बँकांना कुठेही वसुली करू देणार नाही, असेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केले. 

आरोग्य किट देणारप्राथमिक औषधे (ताप, सर्दी, खोकला आदींवर), टूथब्रश, टूथपेस्ट, तेल, त्वचारोगावरील औषधे असलेल्या पाच लाख किटचे वितरण करणार.

English
हिंदी सारांश
Web Title : Maharashtra CM Announces Aid Package for Flood Victims Within a Week

Web Summary : CM Fadnavis assured comprehensive aid for flood-affected people in a week, disbursing funds before Diwali. Approximately 60 lakh hectares suffered damage. The government will provide essential supplies, school kits, and healthcare kits. Banks are instructed to halt recovery efforts from farmers.
टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसfloodपूरMaharashtraमहाराष्ट्र