..तर भारताचा अग्रणी देशांमध्ये समावेश
By Admin | Updated: November 27, 2014 01:56 IST2014-11-27T01:56:24+5:302014-11-27T01:56:24+5:30
गुणवत्ताभिमुख शिक्षण प्रणालीत स्थित्यंतर घडवून आणण्याची मोठी शक्ती आहे. त्यानुरुप शैक्षणिक प्रणालीत बदल केल्यास जगातील अग्रणी देशांमध्ये भारताचा समावेश होऊ शकेल,

..तर भारताचा अग्रणी देशांमध्ये समावेश
वर्धा : गुणवत्ताभिमुख शिक्षण प्रणालीत स्थित्यंतर घडवून आणण्याची मोठी शक्ती आहे. त्यानुरुप शैक्षणिक प्रणालीत बदल केल्यास जगातील अग्रणी देशांमध्ये भारताचा समावेश होऊ शकेल, असा आशावाद राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी बुधवारी येथे व्यक्त केला.
वर्धा शिक्षा मंडळाच्या शताब्दी समारोहाचे प्रमुख पाहुणो म्हणून ते बोलत होते. राज्यपाल सी. विद्यासागर राव, मुख्यमंत्री देवंद्र फडणवीस, केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी, शिक्षा मंडळाचे अध्यक्ष राहुल बजाज, ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक नारायण जाजू, मधुर बजाज, न्यायमूर्ती चंद्रशेखर धर्माधिकारी, संजय भार्गव कार्यक्रमाला उपस्थित होते.
व्यक्तीचा सर्वागिण विकास आणि समानता आणण्याचे साधन म्हणून शिक्षणाचा उपयोग करण्याची गरज असल्याचे मत व्यक्त करताना राष्ट्रपती म्हणाले, स्वच्छ भारत आणि स्वच्छ विद्यालय ही उद्दिष्टे साध्य करण्यासाठी आणि स्वच्छ पर्यावरणासाठी महात्मा गांधींपासून प्रेरणा घ्यायला हवी.
देशातील नव्या शिक्षण संकल्पनेचा अर्थात नई तालीमचा उगम गांधीजींच्या अध्यक्षतेखाली शिक्षा मंडळामध्ये 1937 मध्ये झालेल्या पहिल्या शिक्षण
संमेलनात झाला. शिक्षा मंडळाने अत्यल्प दरात दज्रेदार शिक्षण दिले आहे. इतर संस्थांनी याचे अनुकरण केले तर देशातील शिक्षण क्षेत्रचा कायापालट होईल, असे मुखर्जी म्हणाले.
अल्पदरात गुणवत्तापूर्ण शिक्षण देणा:या संस्था महत्त्वपूर्ण ठरणार आहेत. अशा संस्थांना स्वायत्तता देण्याच्या दृष्टीने विद्यापीठाच्या नियमांमध्ये लवचिकता आणण्यासोबतच कायद्यात बदल करण्यात येणार असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
सोलरवर चालणा:या चरख्याच्या माध्यमातून खादी उद्योगाला चालना दिल्यास कापसाला भाव आणि बेरोजगारांना रोजगाराच्या संधी प्राप्त होतील या दिशेने सरकार विचार करीत आहे, असे नितीन गडकरी म्हणाले.
राष्ट्रपतींनी सेवाग्राम आश्रमाला भेट दिली. बापूकुटीतील प्रार्थना सभेसही ते उपस्थित होते. (प्रतिनिधी)
शिक्षण संस्थांनी गावे दत्तक घ्यावीत
पुणो : देशाचा वेगाने विकास साधण्यासाठी स्थानिक समस्या सोडविणो आवश्यक आहे. उच्च शिक्षण संस्था यात महत्त्वाची भूमिका बजावू शकतात. त्यांनी किमान 5 गावे दत्तक घेऊन तेथील सामाजिक प्रश्न समजून घेऊन तज्ज्ञांच्या मदतीने त्याची उत्तरे शोधून ते सोडविण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन प्रणव मुखर्जी यांनी केले. सिम्बायोसिस आंतरराष्ट्रीय विद्यापीठाच्या अकराव्या पदवीप्रदान समारंभात दादा जे. पी. वासवानी व प्रा. हरेश शहा यांना मुखर्जी यांच्या हस्ते डी.लिट्. पदवी देऊन गौरविण्यात आले.