शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

मुंबई ढगाळ; राज्यात धुळीच्या वादळासह उष्णतेची लाट

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 10, 2019 06:54 IST

विदर्भातल्या उष्णतेच्या लाटेने कहर केला असतानाच देशातही फारशी परिस्थिती वेगळी नसल्याचे चित्र आहे. हवामानातील बदलामुळे ही स्थित्यंतरे नोंदविण्यात येत असून, राज्यासह अवघ्या देशात धुळीचे वादळ, उष्णतेची लाट आणि हलक्या पावसाने कहर केला आहे.

मुंबई : विदर्भातल्या उष्णतेच्या लाटेने कहर केला असतानाच देशातही फारशी परिस्थिती वेगळी नसल्याचे चित्र आहे. हवामानातील बदलामुळे ही स्थित्यंतरे नोंदविण्यात येत असून, राज्यासह अवघ्या देशात धुळीचे वादळ, उष्णतेची लाट आणि हलक्या पावसाने कहर केला आहे. उत्तर भारताचा विचार करता येथील काही राज्ये उष्णतेच्या लाटेने होरपळून निघत आहेत. २४ तासांसाठी हीच परिस्थिती कायम राहणार आहे. मुंबईचा विचार केल्यास मुंबई आणि आसपासच्या परिसरात आकाश ढगाळ राहील.मुंबईचे कमाल तापमान ३३ अंश सेल्सियसवर स्थिर आहे. गुरुवारीही मुंबईचे कमाल तापमान ३३ अंश नोंदविण्यात आले आहे. मागील आठवड्याभर मुंबई व आसपासच्या परिसरात आकाश अंशत: ढगाळ राहील, असा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवला जात आहे. प्रत्यक्षात मात्र सकाळी अकराच्या सुमारास किंचित दाटून येणारे मळभ वगळता मुंबईकरांचा उन्हाचे चटकेच सहन करावे लागत आहेत. कडक उन आणि घाम फोडणारा उकाडा मुंबईकरांना तापदायक ठरत आहे.भारतीय हवामान शास्त्र विभागाच्या माहितीनुसार, गेल्या २४ तासांत कोकण, गोव्यात तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची नोंद झाली आहे. उर्वरित राज्यात हवामान कोरडे होते. विदर्भाच्या काही भागात कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय वाढ झाली. मराठवाड्याच्या काही भागात कमाल तापमानात किंचित वाढ झाली. मध्य महाराष्ट्राच्या काही भागात कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित घट झाली आहे.स्कायमेटच्या माहितीनुसार, राजस्थान, उत्तर प्रदेश, छत्तीसगढसह विदर्भात उष्णतेच्या लाट कायम आहे. आसाम, मेघालय, अरुणाचल प्रदेशात हलक्या पावसाची नोंद झाली आहे. पश्चिम बंगाल, सिक्कीम, तामिळनाडू, कर्नाटक, केरळच्या काही भागात हलक्या पावसाची नोंद झाली आहे.कर्नाटक, केरळमध्ये पावसाची शक्यतास्कायमेटच्या अंदाजानुसार पुढील २४ तासांत अरुणाचल प्रदेश, मेघालय, आसाममध्ये हलक्या स्वरूपाचा पाऊस होईल. तामिळनाडू, कर्नाटक, केरळमध्ये पावसाची शक्यता आहे. राजस्थान, पंजाब आणि हरियाणात धुळीचे वादळ उठण्याची शक्यता आहे. विदर्भ, आंध्र प्रदेश, उत्तर प्रदेश, छत्तीसगढ आणि तेलंगणात उष्णतेची लाट कायम राहील.मराठवाडा, विदर्भात मेघगर्जनेसह पाऊस१० मे : विदर्भात तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट येईल; तर काही ठिकाणी उष्णतेची तीव्र लाट येईल.११ मे : विदर्भात तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट येईल. मराठवाडा, विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडेल.१२ मे : मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडेल.१० आणि ११ मे रोजी मुंबई आणि आसपासच्या परिसरात आकाश अंशत: ढगाळ राहील. कमाल आणि किमान तापमान अनुक्रमे ३३, २५ अंशांच्या आसपास राहील.

टॅग्स :weatherहवामानMaharashtraमहाराष्ट्र