शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

उत्तराखंडमधील ढगफुटीचे थैमान; महाराष्ट्रातील ५१ पर्यटक सुरक्षित

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 7, 2025 06:24 IST

पर्यटकांना सुरक्षितस्थळी हलविण्यासाठी दिल्लीतील महाराष्ट्र सदनाच्या माध्यमातून प्रयत्न सुरू असल्याचे राज्य आपत्कालीन कार्य केंद्राने कळविले आहे...

मुंबई : उत्तराखंड राज्यातील उत्तरकाशी जिल्ह्यातील धराली परिसरात अतिवृष्टी आणि ढगफुटीमुळे महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांतील पर्यटक या भागात अडकले होते. त्यात नांदेड जिल्ह्यातील ११ व इतर जिल्ह्यांतील ४० अशा ५१ पर्यटकांचा समावेश असून हे सर्व पर्यटक सुखरूप असल्याची माहिती राज्य आपत्कालीन कार्य केंद्राकडून देण्यात आली.

उत्तराखंड आपत्ती व्यवस्थापन केंद्र व उत्तरकाशी जिल्हा आपत्ती केंद्राशी राज्य सरकारकडून संपर्क साधला जात आहे. पर्यटकांना सुरक्षितस्थळी हलविण्यासाठी दिल्लीतील महाराष्ट्र सदनाच्या माध्यमातून प्रयत्न सुरू असल्याचे राज्य आपत्कालीन कार्य केंद्राने कळविले आहे. 

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी उत्तराखंडचे सचिव दिलीप जवळकर, पोलिस महानिरीक्षक नीलेश भरणे यांच्याशी संपर्क साधून महाराष्ट्रातील पर्यटकांना तातडीने आवश्यक ती मदत पुरवण्याची विनंती केली आहे. प्रत्येक पर्यटकाला सुरक्षितपणे घरी परत आणणे हीच प्राथमिकता आहे, असे ते म्हणाले. 

मालेगावचे सात यात्रेकरू संपर्काबाहेर -उत्तराखंडमधील धराली गावात ढगफुटीमुळे झालेल्या दुर्घटनेनंतर यात्रेसाठी गेलेल्या शहरातील सात जणांचा संपर्क होत नसल्याने त्यांच्या नातेवाइकांच्या चिंता वाढल्या आहेत. राज्य व केंद्र सरकारने त्यांचा शोध घेत सर्वांना सुखरूप परत आणावे, अशी मागणी त्यांच्या परिवाराने केली आहे.  छत्रपती संभाजीनगरातून गेलेले १८, सोलापूरचे ४, पुण्यातील २४ आणि जळगावचे २२ भाविक सुखरूप आहेत. संपर्कासाठी क्रमांक :  राज्य आपत्कालीन कार्य केंद्र, महाराष्ट्र - ९३२११५८७१४३/ ०२२-२२०२७९९०/०२२-२२७९४२२९ राज्य आपत्कालीन कार्य केंद्र, उत्तराखंड : ०१३५-२७१०३३४/८२१८८६७००५

टॅग्स :MumbaiमुंबईMaharashtraमहाराष्ट्रUttarakhandउत्तराखंड