बंद गळ्याचा कोट की मोदी ज्ॉकेट ?
By Admin | Updated: October 28, 2014 01:30 IST2014-10-28T01:30:17+5:302014-10-28T01:30:17+5:30
संपूर्ण वैदर्भीयांची मान अभिमानाने उंचावेल़ आपला नेता मुख्यमंत्रिपदाची शपथ घेताना नव्या वस्त्रत असावा, अशी कार्यकत्र्यासह मित्रमंडळींची इच्छा असणो स्वाभाविक आहे.

बंद गळ्याचा कोट की मोदी ज्ॉकेट ?
नागपूर : राज्याचे मुख्यमंत्रिपद भूषविणो ही सन्मानाची बाब. त्यातच हा मान नागपूरला मिळत असेल तर संपूर्ण वैदर्भीयांची मान अभिमानाने उंचावेल़ आपला नेता मुख्यमंत्रिपदाची शपथ घेताना नव्या वस्त्रत असावा, अशी कार्यकत्र्यासह मित्रमंडळींची इच्छा असणो स्वाभाविक आहे. मुख्यमंत्री पदासाठी आ. देवेंद्र फडणवीस यांचे नाव चर्चेत आह़े किंबहुना त्यांचेच नाव निश्चित झाल्याचे मानले जात़े या पाश्र्वभूमीवर त्यांच्यासाठी विविध रंगांचे 5 ‘मोदी स्टाईल’ ज्ॉकेट तसेच बंद गळ्याचा कोट शिवण्यात आला आहे. शपथविधीप्रसंगी फडणवीस नेमक्या कुठल्या ‘लूक’मध्ये दिसतात याबाबत प्रचंड उत्सुकता आहे.
देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपाचे अन्य नेते काही वर्षापासून सीताबर्डी येथील अरुण ऊर्फ पिंटू मेहाडिया यांच्याकडून कपडे शिवून घेतात. यासंदर्भात पिंटू म्हणाले, जवळपास 2क् वर्षापासून फडणवीस माङयाकडूनच कपडे शिवून घेत आहेत.
पूर्वी त्यांचे वजन खूप होते, पण आता त्यांनी ते कमी केले आहे. त्यांना कुठल्या साईजचे कपडे हवेत, कोणते रंग, डिझाईन्स आणि कोणत्या पद्धतीचे कापड हवे असते याची इत्थंभूत माहिती माङयाकडे असल्यानेच त्यांनी नव्या कपडय़ांची ऑर्डर आपल्याला दिल्याचे पिंटू अभिमानाने सांगतात़ (प्रतिनिधी)
फडणवीस यांचे ‘फॅशन स्टेटमेन्ट’
च्केवळ पॅन्ट आणि शर्ट परिधान करणारे फडणवीस दोन वर्षापासून ज्ॉकेट वापरत आहेत़ नुकत्याच झालेल्या लोकसभा व विधानसभा निवडणुकांदरम्यान त्यांनी आवजरून आकर्षक
ज्ॉकेट्स वापरले होते.
च्शपथविधीदरम्यान त्यांचे व्यक्तिमत्त्व उठून दिसावे यासाठी राखडी, गुलाबी, केशरी, बदामी व फिक्कट हिरव्या रंगाचे ज्ॉकेट्स तयार केले आहेत.
च्शिवाय बंद गळ्याचा कोटदेखील शिवण्यात आला आहे. त्याचप्रमाणो भावी मुख्यमंत्र्यांसाठी पांढरा शर्ट आणि ब्ल्यूज ग्रे रंगाचा पॅन्ट देखील शिवण्यात आल्याचे पिंटू म्हणाल़े