साखर कारखान्यांना मदत बंद

By Admin | Updated: November 30, 2014 01:31 IST2014-11-30T01:31:09+5:302014-11-30T01:31:09+5:30

सहवीज प्रकल्प, इथेनॉल प्रकल्पातून चांगले पैसे मिळत असतानाही भ्रष्टाचार करून कारखाने संपवायचे आणि सरकारकडे मदत मागायची.

Close to help sugar factories | साखर कारखान्यांना मदत बंद

साखर कारखान्यांना मदत बंद

कोल्हापूर : सहवीज प्रकल्प, इथेनॉल प्रकल्पातून चांगले पैसे मिळत असतानाही भ्रष्टाचार करून कारखाने संपवायचे आणि सरकारकडे मदत मागायची. कारखाना चालवण्यास जमत नसेल, तर बंद करा; पण यापुढे सरकार मदत करणार नाही. अशा शब्दांत सहकारमंत्री चंद्रकांत पाटील यांनी शनिवारी कोल्हापुरात कारखानदारांना सुनावले. ‘एफ.आर.पी.’साठी शेवटची मदत करणार असून, यापुढे मदत करणार नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. 
जिल्हा बॅँकेत आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. आजरा साखर कारखान्याचा कर्जपुरवठा बंद केल्याबाबत बैठकीत मुद्दा उपस्थित करण्यात आला. या कारखान्याचे गेल्या वर्षी 24 लाखांचे निगेटिव्ह नेटवर्थ होते, या वर्षी 6 कोटींर्पयत गेल्याने कर्जपुरवठा बंद केल्याचे प्रशासक प्रतापसिंह चव्हाण यांनी सांगितले. यावर, व्यवसाय म्हणून साखर कारखाने चालविले पाहिजेत, विक्रमसिंह घाटगे, वैभव नायकवडी यांचे कारखाने नफ्यात चालतात, मग इतरांना काय झाले. सहवीज प्रकल्पातून पैसे मिळतात, मग मदतीची आवश्यकता कशाला? शेतक:यांना चांगला भाव देण्यासाठी काही हालचाली करायच्या नाहीत, भ्रष्टाचार करायचा आणि ‘एफ.आर.पी.’साठी सरकारकडे पैसे मागायचे, हे चालणार नाही. 
सरकारकडून मदतीचे हे शेवटचे वर्ष असेल. यापुढे मदत करणार नसल्याचेही त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी) 
 
च्दोन कारखान्यांमधील अंतराची अट रद्द करण्याची घोषणा केल्यानंतर टीका होऊ लागली. पण कारखाना जो चांगला चालवेल त्याला ऊस मिळेल. स्पर्धा नको असणा:यांनी बाजूला व्हावे, शेतक:यांच्या फायद्यासाठी या व्यवसायात स्पर्धा येणो गरजेचे आहे. पूर्वी टेलिफोन व्यवसायात ‘बी.एस.एन.एल.’ एकटीच कंपनी होती, आता अनेक कंपन्या आल्या म्हणून त्यावर परिणाम झाला का, असा सवालही मंत्री पाटील यांनी केला. 

 

Web Title: Close to help sugar factories

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.