लिपिकांचा ‘लेखणी बंद’चा इशारा
By Admin | Updated: May 3, 2016 02:59 IST2016-05-03T02:59:14+5:302016-05-03T02:59:14+5:30
वाढीव ग्रेड पे साठी आक्रमक पवित्रा घेतलेल्या जिल्हा परिषदेतील लिपीक संवर्गाने १ जूनपासून बेमुदत लेखणी बंदचा इशारा दिला आहे. या मागणीसाठी मंगळवारी आणि बुधवारी आझाद मैदानात

लिपिकांचा ‘लेखणी बंद’चा इशारा
मुंबई : वाढीव ग्रेड पे साठी आक्रमक पवित्रा घेतलेल्या जिल्हा परिषदेतील लिपीक संवर्गाने १ जूनपासून बेमुदत लेखणी बंदचा इशारा दिला आहे. या मागणीसाठी मंगळवारी आणि बुधवारी आझाद मैदानात उपोषण करण्यात येईल, अशी माहिती महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद लिपीक वर्गीय कर्मचारी संघटनेने सोमवारी पत्रकार परिषदेत दिली.
संघटनेचे अध्यक्ष गिरीश दाभाडकर म्हणाले की, अधिवेशन काळात म्हणजेच १६ ते ३१ मार्च दरम्यान बेमुदत लेखणी बंद आंदोलन करण्याचा इशारा फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यात संघटनेने दिला होता. त्यावर १५ फेब्रुवारीला ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी संघटनेसोबत बैठक घेतली. त्यात सकारात्मक निर्णय घेऊन मागण्या पूर्ण करण्याचे आश्वासनही दिले. मात्र २९ मार्च रोजी ग्रामविकास खात्यातील अधिकाऱ्यांनी संघटनेला पाठवलेल्या पत्रात मागण्या पूर्ण करता येणार नाही, असे सांगितले. ३१ मेपर्यंत सरकारने ठोस निर्णय
घेतला नाही तर १ जूनपासून आंदोलन सुरू होईल. त्यात राज्यातील ३४
जि. प.मधील १५ हजारांहून अधिक कर्मचारी या आंदोलनात सामील होतील. (प्रतिनिधी)