‘रॉक क्लायम्बिंग’साठीखदान ‘क्लीनिंग’ मोहीम
By Admin | Updated: April 12, 2015 01:02 IST2015-04-12T01:02:32+5:302015-04-12T01:02:32+5:30
कोणतीही शासकीय मदत न घेता येथील गिर्यारोहकांनी सलग दोन वर्षे स्वच्छता मोहीम राबवून कचऱ्याने भरलेली खदान मोकळी करून ‘रॉक क्लायम्बिंग’साठी खुली केली.

‘रॉक क्लायम्बिंग’साठीखदान ‘क्लीनिंग’ मोहीम
मिलिंद कांबळे ल्ल पिंपरी-चिंचवड
कोणतीही शासकीय मदत न घेता येथील गिर्यारोहकांनी सलग दोन वर्षे स्वच्छता मोहीम राबवून कचऱ्याने भरलेली खदान मोकळी करून ‘रॉक क्लायम्बिंग’साठी खुली केली. येथील शाहूनगर भागात दगडाची एक बंद खाण कचरा, झुडपांनी व्यापली होती. गिर्यारोहक गणेश आढाव, साहिल शहा, बिपीन शहा, अक्षय बागडे यांच्यासह एव्हरेस्टवीर श्रीकृष्ण ढोकळे २०११मध्ये तेथे क्लायम्बिंगचा सराव करीत. तेथील कचऱ्यामुळे सर्वांचीच गैरसोय होई.
अखेर या सर्व गिर्यारोहकांनी कंबर कसली अन् सलग दोन वर्षे स्वखर्चाने आणि श्रमदानातून १० ट्रक मावेल इतका कचरा येथून काढण्यात आला. बघता बघता खाणीतील चार एकर परिसर स्वच्छ झाला. खाणीच्या पालटलेल्या रूपामुळे येथे सरावासाठी येणाऱ्या मुला-मुलींची संख्या वाढली. नंतर स्थानिक लोकप्रतिनिधींनी खाणीत जिना, बसण्यासाठी बाक आणि दिव्यांची सोय करून दिली.
एकूण २०० फूट लांबीचा कडा असून, त्याची उंची सुमारे २५ फूट आहे. याला ‘नरवीर तानाजी मालुसरे गिर्यारोहण सराव मैदान’ नाव देण्यात आले. पिंपरी-चिंचवड माउंटेनिंअरिंग संघटनेतर्फे ढोकळे तेथे मोफत प्रशिक्षण देतात.
गिर्यारोहण या साहसी खेळामुळे व्यक्तिगत विकासाला चालना मिळते. संकटावर मात करण्याची मानसिक-शारीरिक क्षमता प्रबळ होते. पुढील वर्षी मुंबईत जागतिक स्पर्धा होणार आहेत. या पार्श्वभूमीवर येथील गिर्यारोहण मैदानावर मिळणारी सरावाची संधी नक्कीच उपयुक्त आहे.
- श्रीकृष्ण ढोकळे