स्वच्छ शहरांच्या यादीत इंदूर पहिल्या स्थानी, नवी मुंबई टॉप टेनमध्ये
By Admin | Updated: May 4, 2017 13:32 IST2017-05-04T12:40:36+5:302017-05-04T13:32:09+5:30
देशातील स्वच्छ शहरांची यादी जाहीर करण्यात आली असून यामध्ये महाराष्ट्रातील नवी मुंबई टॉप टेनच्या यादीत आहे. नवी मुंबई आठव्या स्थानावर असून पहिल्या स्थानावर इंदूर शहर आहे.

स्वच्छ शहरांच्या यादीत इंदूर पहिल्या स्थानी, नवी मुंबई टॉप टेनमध्ये
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 04 - देशातील स्वच्छ शहरांची यादी जाहीर करण्यात आली असून यामध्ये महाराष्ट्रातील नवी मुंबई टॉप टेनच्या यादीत आहे. नवी मुंबई आठव्या स्थानावर असून पहिल्या स्थानावर इंदूर शहर आहे.
केंद्रीय शहर विकासमंत्री व्यंकय्या नायडू यांनी स्वच्छ भारत अभियानांतर्गत करण्यात आलेल्या सर्वेक्षणानुसार देशातील विविध शहरांची यादी गुरुवारी जाहीर केली. यामध्ये पहिल्या स्थानवर मध्यप्रदेशातील इंदूर शहर असून अनुक्रमे भोपाळ, विझाग, सुरत, म्हैसूर, तिरुचिरापल्ली, नवी दिल्ली, नवी मुंबई, तिरुपती आणि बडोदा या शहरांचा टॉप टेनच्या यादीत समावेश आहे. यंदाच्या स्वच्छ सर्वेक्षणात 434 शहरांचा सहभाग होता. स्वच्छ शहरांमध्ये पहिल्या 50 पैकी 12 शहरे ही गुजरातमधील आहेत.
दुसरीकडे अस्वच्छ शहरांच्या यादीत महाराष्ट्रातील जळगाव जिल्ह्यातील भुसावळ हे दुसऱ्या क्रमांकावर आहे. तर उत्तर प्रदेशातील गोंडा हे सर्वात शेवटी आहे. तसेच, सर्वात अस्वच्छ शहरांमध्ये सुद्धा 20 शहरे ही एकट्या उत्तर प्रदेशातील आहेत.
दरम्यान, गेल्यावर्षी स्वच्छ शहरांच्या सर्वेक्षणासाठी देशातल्या 73 शहरांचा समावेश करण्यात आला होता. यामध्ये पहिल्या 10 शहरांत महाराष्ट्रातील नवी मुंबई आणि पिंपरी चिंचवड या दोन शहरांचा समावेश होता. यामध्ये अनुक्रमे म्हैसूर, चंदीगड, तिरुचिरापल्ली, नवी दिल्ली, विशाखापट्टणम, सूरत, राजकोट, गंगटोक, पिंपरी-चिंचवड आणि नवी मुंबईचा टॉप टेनमध्ये समावेश होता.
Indore (Madhya Pradesh) tops the list of cleanest cities, as per Swachh Survekshan 2017
— ANI (@ANI_news) May 4, 2017
Indore tops the list, followed by Bhopal,Vizag,Surat,Mysuru,Tiruchirapalli,New Delhi Municipal council,Navi Mumbai,Tirupati & Vadodara
— ANI (@ANI_news) May 4, 2017
टॉप 10 स्वच्छ शहरे...
1) इंदूर – मध्यप्रदेश
2) भोपाळ – मध्यप्रदेश
3) विझाग – आंध्रप्रदेश
4) सुरत- गुजरात
5) म्हैसूर – कर्नाटक
6) तिरुचिरापल्ली – तामिळनाडू
7) नवी दिल्ली
8) नवी मुंबई – महाराष्ट्र
9) तिरुपती – आंध्रप्रदेश
10) बडोदा – गुजरात