महिलेच्या चेहऱ्यावर फेकले 'टॉयलेट क्लीनर'

By Admin | Updated: August 12, 2016 22:19 IST2016-08-12T22:19:29+5:302016-08-12T22:19:29+5:30

महिलेवर अॅसिड हल्ला झाल्याच्या वृत्ताने घाटकोपरमध्ये खळबळ उडाली

'Cleaner Cleaner' thrown at woman's face | महिलेच्या चेहऱ्यावर फेकले 'टॉयलेट क्लीनर'

महिलेच्या चेहऱ्यावर फेकले 'टॉयलेट क्लीनर'

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 12 - महिलेवर अॅसिड हल्ला झाल्याच्या वृत्ताने घाटकोपरमध्ये खळबळ उडाली. मात्र हा अ‍ॅसिड हल्ला नसून यामध्ये आरोपीने टॉयलेट क्लीनरचा वापर केला असल्याचे समोर आले. जखमी महिलेवर राजावाडी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

घाटकोपर पश्चिमेकडील आझाद नगर परिसरात ४० वर्षीय तक्रारदार महिला राहण्यास आहे. ती गारमेंट कंपनीत काम करते. गुरुवारी सायंकाळच्या सुमारास कामावरुन घरी निघाली. त्याच दरम्यान येथील हिमालय सोसायटीजवळ एका इसमाने टॉयलेट क्लीनर तिच्या चेहऱ्यावर फेकून पळ काढला. अचानक चेहऱ्यावर जळजळ सुरू झाल्याने महिलेने ओरड घालण्यास सुरुवात केली. ही बाब स्थानिकांच्या लक्षात येताच त्यांनी महिलेला तात्काळ राजावाडी रुग्णालयात दाखल केले. महिलेची प्रकती स्थिर असून घाटकोपर पोलीस रुग्णालयात दाखल झाले आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी आणि महिला एकमेकांना ओळखतात. दोघांमध्ये वाद सुरू होते. त्या वादातून त्याने महिलेचा चेहरा विद्रूप करण्यासाठी टॉयलेट क्लीनरचा वापर केला असल्याची प्राथमिक माहिती तपासात समोर येत आहे. याप्रकरणी अधिक तपास सुरू असल्याची माहिती घाटकोपर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक व्यंकट पाटील यांनी दिली.

Web Title: 'Cleaner Cleaner' thrown at woman's face

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.