साफसफाईने आरोग्याचा प्रश्न गंभीर

By Admin | Updated: July 4, 2016 02:02 IST2016-07-04T02:02:04+5:302016-07-04T02:02:04+5:30

सार्वजनिक स्वच्छतागृहात घाणीचे साम्राज्य, साफसफाईचा अभाव यांमुळे खंडेवस्तीमध्ये आरोग्याच्या समस्यांनी केले आहे.

Clean question health serious | साफसफाईने आरोग्याचा प्रश्न गंभीर

साफसफाईने आरोग्याचा प्रश्न गंभीर


भोसरी : सार्वजनिक स्वच्छतागृहात घाणीचे साम्राज्य, साफसफाईचा अभाव यांमुळे खंडेवस्तीमध्ये आरोग्याच्या समस्यांनी केले आहे. गवळीनगरमध्ये योग्य नियोजनाअभावी स्वच्छतागृहाचे काम रेंगाळले आहे. स्वच्छतागृह नसल्याने नागरिकांची मोठी कुचंबणा होऊ लागली आहे. त्यामुळे एक बाजूला उच्च वस्ती असलेल्या इंद्रायणीनगर प्रभागाच्या दुसऱ्या बाजूच्या झोपडपट्ट्यांमध्ये बकाल अवस्था पाहायला मिळत आहे.
इंद्रायणीनगर प्रभाग क्रमांक २९ हा एक बाजूला उच्चभ्रू लोकांची वस्ती असलेला भाग म्हणून ओळखला जातो. हा भाग बहुतांशी प्राधिकरणामध्ये येत आहे. तर काही भाग एमआयडीसीमध्ये येत आहे. राष्ट्रवादीचे संजय वाबळे, नगरसेवक व भाजपाच्या वर्षा मडिगेरी येथे नगरसेविका आहेत. या प्रभागात गवळी माथा, खंडेवस्ती व गणेशनगर या तीन झोपडपट्ट्या येतात. झोपडपट्ट्यांमध्ये आरोग्यच्या समस्यांबरोबर पिण्याच्या पाण्याच्या व रस्त्यांच्या समस्या गंभीर आहेत. इंद्रायणीनगर प्रभागात दोन्ही नगरसेवकांमध्ये समन्वयाचा अभाव असल्यामुळे अनेक कामे वेळेवर मार्गी लागली नाहीत.
भोसरी परिसरातील सर्वांत मोठी अशी बालनगरी इंद्रायणीनगरमध्ये होत आहे. त्याचेही काम सुरू आहे. अनेक दिवसापासून मागणी असलेले डांबरीकरणाचे काम एमआयडीसी भागात काम पूर्ण झाले आहे. मात्र, सातत्याने वीज जाण्याचे प्रकार सुरू आहेत. प्राधिकरण असलेल्या भागात बहुतांशी नागरिकांना समस्यांना सामोरे जावे लागत नाही. इंद्रायणीनगरमध्ये भव्य अशा मंडईचे काम सुरू आहे. इंद्रायणीनगर मिनी मार्केट या ठिकाणी सध्याची मंडई भरत आहे. या ठिकाणी रस्त्यावर भाजी व फळ विक्रेते बसतात. त्यामुळे सायंकाळच्या वेळेस वाहतूककोंडी होत आहे. ही समस्या तातडीने सोडविणे गरजेचे आहे.
गवळी माथा, गणेशनगर व खंडेवस्ती या ठिकाणी असलेली अस्वच्छता, अर्धवट अवस्थेत रेंगाळलेल्या शौचालायचे काम व त्यामुळे आरोग्याची समस्या निर्माण झाली आहे. गवळी माथा भागात ड्रेनेज लाइनसाठी रस्ता खोदलेला कधी होणार, असाही प्रश्न नागरिक विचारत आहेत.
दोन महिन्यांपूर्वी स्वच्छतागृहाचे काम करण्यासाठी जुने स्वच्छतागृह पाडण्यात आले आहे. दुसरे स्वच्छतागृह नसताना तातडीने दुसरे बांधून देण्यात येईल, असे नागरिकांना सांगण्यात आले होते. नवीन स्वच्छतागृहाचे काम सुरूही झाले. मात्र, ते या वर्षी होईल का नाही, अशी दशांक नागरिक व्यक्त करत आहेत. (वार्ताहर)
गेल्या दहा वर्षांपासून या प्रभागाचे प्रतिनिधित्व करत आहे. प्रभागत अनेक वर्षे बससेवा नव्हती. ती सुरू केली. संपूर्ण प्रभाग डांबरीकरण झाला आहे. सर्व झोपडपट्ट्यांमध्ये अंडर ग्राऊंड ड्रेनेज लाइन टाकण्यात आल्या आहेत. त्यामुळे कुठे उघडी गटारे व राहिलेली नाहीत. खंडेवस्ती भागात स्वच्छतागृह बांधण्यात आले आहे. महापालिकेच्या स्वच्छ भारत अभियानांतर्गत प्रत्येक नागरिकांना स्वच्छतागृह बांधून देण्यात येत आहे . त्या योजनेचा नागरिकांना जास्तीत जास्त फायदा नागरिकांना व्हावा, यासाठी प्रयत्न केला आहे. - वर्षा मडिगेरी

Web Title: Clean question health serious

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.