आघाडीची घाण स्वच्छ करा
By Admin | Updated: October 11, 2014 05:29 IST2014-10-11T05:29:55+5:302014-10-11T05:29:55+5:30
भारत स्वच्छ होण्यासाठी प्रत्येक भारतीय सहभागी झाला पाहिजे. यासाठी सर्व राज्ये स्वच्छ झाली पाहिजेत

आघाडीची घाण स्वच्छ करा
गुहागर (जि़ रत्नागिरी) : भारत स्वच्छ होण्यासाठी प्रत्येक भारतीय सहभागी झाला पाहिजे. यासाठी सर्व राज्ये स्वच्छ झाली पाहिजेत. महाराष्ट्र स्वच्छ करण्यासाठी काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसची घाण स्वच्छ करावी लागेल, असे प्रतिपादन भाजपाचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी केले.
भाजपाच्या उमेदवाराच्या प्रचारार्थ आयोजित चिखली येथील सभेत ते बोलत होते. फडणवीस म्हणाले की, काँग्रेस जाहिरातीतून महाराष्ट्र पहिला असल्याचे सांगत आहे, पण मागून की पुढून हे विचारण्याची गरज आहे. कारण सर्वाधिक ७ हजार शेतकऱ्यांनी महाराष्ट्रात आत्महत्या केल्या. सर्वाधिक महिलांवर बलात्कार, अत्याचार महाराष्ट्रात होतात. ३ लाख कोटी रुपयांचे कर्ज महाराष्ट्रावर आहे. ७० हजार कोटी खर्चून एक टक्काही सिंचन क्षमता वाढली नाही. एवढे पैसे खर्चूनही कोणताच विकास झाला नाही, मग हा पैसा गेला कुठे, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. (प्रतिनिधी)