शहरं
Join us  
Trending Stories
1
भेटायला गेले अन् पक्षप्रवेश करून घेतला; सकाळी शिंदे गटात, संध्याकाळी ठाकरे गटात
2
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
3
अमित शाहांच्या मॉर्फ्ड व्हिडीओ प्रकरणी X कडून मोठी कारवाई, झारखंड काँग्रेसचं अकाऊंट केलं बंद
4
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
5
कूलर, पंखा, एसीमुळे किती वाढते विजेचे बिल?
6
स्ट्रोकनंतर पहिल्यांदाच समोर आले Zerodha चे फाऊंडर Nithin Kamath; हेल्थ बद्दल दिली 'ही' माहिती
7
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
8
किंमत वाढूनही आपण खरेदी केले टनाने सोने; भारतीयांनी तीन महिन्यांत घेतले १३६.६ टन सोने
9
जीएसटीने भरली सरकारची तिजोरी; एप्रिलमध्ये २.१० लाख कोटींची वाढ
10
अमेरिकेपेक्षा भारतातच ‘एआय’चा वापर अधिक; तंत्रज्ञान स्वीकारण्यात देश सर्वात आघाडीवर
11
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदानाची अंतिम टक्केवारी जाहीर; ३ टक्क्यांची वाढ
12
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
13
भाजप-उद्धवसेना फक्त एका ठिकाणी समोरासमोर; गळ्यात गळे घालून फिरणारे शिवसैनिक एकमेकांच्या विरोधात
14
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
15
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
16
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र
17
ठाण्यात दोघा माजी महापौरांमध्ये पुन्हा लढत; २०१४ मध्ये राजन विचारे विरुद्ध संजीव नाईक झाली होती लढत
18
प्रज्वल रेवण्णा उद्या बंगळुरूत येणार; आरोप तथ्यहीन असल्याचा दावा
19
पंतप्रधानांच्या पत्रात दडला निवडणुकीचा अजेंडा; उमेदवारांच्या माध्यमातून मतदारांना संदेश
20
श्रीकांत यांच्या कल्याणसाठी म्हस्केंना उमेदवारी देऊन विचारेंना बाय ? राजन विचारे यांना निवडणूक सोपी जाणार अशी चर्चा सुरू

दहावी, बारावी फेरतपासणी : केवळ अडीच हजार विद्यार्थ्यांच्या गुणांत बदल

By ऑनलाइन लोकमत | Published: August 16, 2018 5:13 AM

- दीपक जाधवपुणे -  राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ (राज्य मंडळ) बारावीच्या फेरतपासणीसाठी आलेल्या २२ हजार अर्जांपैकी केवळ २ हजार ३७४ पेपरच्या व दहावी फेरतपासणीसाठी आलेल्या १३ हजार अर्जांपैकी २ हजार २२५ पेपरच्या गुणांमध्ये बदल झाला आहे. सीबीएसई, आयसीएसई आदी बोर्डांच्या तुलनेत राज्य मंडळांकडे फेरतपासणी आलेल्या आलेल्या अर्जांची ...

- दीपक जाधवपुणे -  राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ (राज्य मंडळ) बारावीच्या फेरतपासणीसाठी आलेल्या २२ हजार अर्जांपैकी केवळ २ हजार ३७४ पेपरच्या व दहावी फेरतपासणीसाठी आलेल्या १३ हजार अर्जांपैकी २ हजार २२५ पेपरच्या गुणांमध्ये बदल झाला आहे. सीबीएसई, आयसीएसई आदी बोर्डांच्या तुलनेत राज्य मंडळांकडे फेरतपासणी आलेल्या आलेल्या अर्जांची संख्या व गुणांत झालेले बदल यांचे प्रमाण अत्यंत कमी आहे.राज्य मंडळाच्या मुंबई, पुणे, कोकण, नागपूर, औरंगाबाद, कोल्हापूर, लातूर, नाशिक, अमरावती या विभागीय मंडळांमधून दहावीसाठी १४ लाख १६ हजार ९८६ तर बारावीसाठी १६ लाख  २८ हजार ६१३ इतक्या मोठ्या संख्येने विद्यार्थी प्रविष्ट झाले होते. दहावी व बारावीचे निकाल जाहीर झाल्यानंंतर पेपर तपासणीवर शंका उपस्थित करून फेरतपासणीसाठी अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रमाण कमी होते.गुणपडताळणी, छायांकित प्रत व पुनर्मूल्यांकन या तीन पद्धतीद्वारे विद्यार्थ्यांना उत्तरपत्रिकांची फेरतपासणी करून घेता येते. गुणपडताळणीसाठी अर्ज केल्यास केवळ उत्तरपत्रिकेमधील प्रश्नांना देण्यात आलेल्या गुणांची बेरीज तपासण्यात येते. बारावीच्या गुणपडताळणीसाठी राज्य मंडळाकडे ३ हजार ४३८ अर्ज झाले होते. त्यापैकी केवळ १७० उत्तरपत्रिकांमध्ये गुणांमध्ये बदल झाले. तर दहावीच्या गुणपडताळणीसाठी आलेल्या १ हजार ३९६ अर्जांपैकी ५० उत्तरपत्रिकांच्या गुणांमध्ये बदल झाले.पुनर्मूल्यांकनामध्ये संपूर्ण उत्तरपत्रिका पुन्हा तपासली जाते. राज्य मंडळाकडे बारावीच्या २ हजार ६६० उत्तरपत्रिकांच्या पुनर्मूल्यांकनासाठी अर्ज आले होते, त्यापैकी केवळ १ हजार ३८३ उत्तरपत्रिकांच्या गुणात बदल झाले. तर दहावीचे २ हजार १४७ अर्ज पुनर्मूल्यांकनासाठी आले, त्यापैकी १ हजार ३७२ गुणपत्रिकांच्या अर्जात बदल झाला.राज्य मंडळ तसेच विभागीय मंडळस्तर पेपर तपासणीच्या मुख्य नियामकांच्या वेळोवेळी बैठका घेण्यात आल्या. त्यामुळे पेपर तपासणी काटेकोरपणे होण्यास मदत झाली. विद्यार्थ्यांचे फेरतपासणीसाठी आलेले अर्जही लवकर निकाली काढण्यासाठी प्रयत्न करण्यात आले. विभागस्तरावर प्रत्येक विषयनिहाय ३ सदस्यांच्या समितीकडून त्याचा वेगाने निपटारा करण्यात आला.- शकुंतला काळे, अध्यक्ष, राज्य मंडळ

टॅग्स :examपरीक्षाSSC Results 2018दहावी निकाल २०१८HSC Result 2018बारावी निकाल २०१८