जियाच्या आईविरोधात शंभर कोटींचा दावा

By Admin | Updated: July 6, 2014 01:33 IST2014-07-06T01:33:45+5:302014-07-06T01:33:45+5:30

अभिनेता आदित्य पांचोली, त्याची पत्नी झरीना वहाब व मुलगी साना यांनी रबिआविरोधात उच्च न्यायालयात 100 कोटींचा दावा दाखल केला आहे.

Claims 100 Crore against Jiah's mother | जियाच्या आईविरोधात शंभर कोटींचा दावा

जियाच्या आईविरोधात शंभर कोटींचा दावा

मुंबई : दिवंगत अभिनेत्री जिया खानची आई रबिआ यांनी टि¦टरवर बदनामीकारक मजकूर टाकल्याप्रकरणी अभिनेता आदित्य पांचोली, त्याची पत्नी झरीना वहाब व मुलगी साना यांनी रबिआविरोधात उच्च न्यायालयात 100 कोटींचा दावा दाखल केला आहे. 
जियाने गेल्या वर्षी आत्महत्या केली. मात्र ही हत्या असून, यासाठी अभिनेता आदित्य पांचोलीचा मुलगा सूरज जबाबदार असल्याचा रबिआ यांचा आरोप आहे. याची सीबीआय चौकशी करण्यासाठी रबिआ यांनी उच्च न्यायालयातच याचिकाही दाखल केली व त्याची दखल घेत न्यायालयाने हे प्रकरण सीबीआयकडे सोपवले. मात्र गेल्या वर्षापासून ही न्यायालयीन लढाई सुरू असताना रबिआ त्यांच्या टि¦टर अकाउंटवर अभिनेता आदित्य, झरीन व सानाविरोधात बदानामीकारक मजकूर टाकत आहेत. याविरोधात वरील तिघांनी एकत्रितपणो अॅड. प्रशांत पाटील यांच्यामार्फत हा दावा दाखल केला आहे. हा दावा दाखल करण्याआधी रबिआ यांना असा मजकूर न टाकण्याची नोटीसही देण्यात आली. तरीही त्या असा मजकूर टाकतच होत्या, असे अॅड. पाटील यांचे म्हणणो आहे.
तसेच अभिनेता आदित्य हे गेली तीन दशके बॉलिवूडमध्ये काम करीत आहेत. झरीन यांनीही अभिनेत्री म्हणून 75 चित्रपटांमध्ये काम केले आहे. तर साना ही योगा शिक्षिका आहे. रबिआ यांच्या मजकुरामुळे या तिघांच्याही कामावर परिणाम झाला असून, याचा त्रसही त्यांना झाला आहे. तेव्हा रबिआ यांनी या तिघांना 1क्क् कोटी नुकसानभरपाई द्यावी; तसेच रबिआ यांना असा मजकूर टाकण्यास मनाई करावी, अशी मागणी या दाव्यामध्ये करण्यात आली आहे. या दाव्यासाठी नियमानुसार 3 लाख रुपयांची कोर्ट फी भरण्यात आली आहे. न्या. एस.सी. गुप्ते यांच्यासमोर यावर सुनावणी झाली. (प्रतिनिधी)

 

Web Title: Claims 100 Crore against Jiah's mother