नागरी विमान वाहतूक समिती: विजय दर्डा यांची नियुक्ती
By Admin | Updated: January 31, 2015 23:50 IST2015-01-31T23:50:30+5:302015-01-31T23:50:30+5:30
लोकमत एडिटोरियल बोर्डाचे चेअरमन खा. विजय दर्डा यांची नागरी विमान वाहतूक संसदीय सल्लागार समितीवर नियुक्ती करण्यात आली आहे.

नागरी विमान वाहतूक समिती: विजय दर्डा यांची नियुक्ती
नागपूर : लोकमत एडिटोरियल बोर्डाचे चेअरमन खा. विजय दर्डा यांची नागरी विमान वाहतूक संसदीय सल्लागार समितीवर नियुक्ती करण्यात आली आहे.
यापूर्वीही दर्डा यांनी संसदेच्या माहिती आणि तंत्रज्ञान स्थायी समितीवर जबाबदारी सांभाळली आहे. मोहसिना किडवई आणि अब्दुल सलाम (अल्पसंख्याक व्यवहार मंत्रालय), आॅस्कर फर्नांडिस आणि डॉ. विजयालक्ष्मी साधो (ग्रामीण विकास, पंचायत राज, पेयजल आणि स्वच्छता) सतीश शर्मा आणि पी. कनान (ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण प्रणाली), विप्लोव ठाकूर (महिला आणि बालकल्याण), पी. गोवर्धन रेड्डी आणि महेंद्रसिंग महरा (खत आणि रसायन), मुकुट मिठी आणि राजीव शुक्ला (दळणवळण आणि माहिती- तंत्रज्ञान), शादीलाल बत्रा आणि एमव्ही राजीव गौडा (कायदा आणि न्याय), ए.के. अॅन्टनी (नागरी विमान वाहतूक), डॉ. एम.एस गिल आणि नाझनीन फारूकी (अन्नप्रक्रिया उद्योग), व्ही. हनुमंत राव आणि हुसेन दलवाई (पोलाद आणि खाण) यांचा वेगवेगळ्या सल्लागार समितींवर नियुक्ती झालेल्या सदस्यांमध्ये समावेश आहे.