नगरच्या टाळ-मृदुंगाचा पंढरीच्या वारीत नाद!

By Admin | Updated: June 27, 2016 05:01 IST2016-06-27T05:01:49+5:302016-06-27T05:01:49+5:30

येथील टाळ-मृदुंगाचा पंढरीच्या वारीत नाद घुमू लागला असून, खान्देश व मराठवाडा येथील वारकरी ही वाद्ये येथून खरेदी करीत असल्याचे सुखद चित्र आहे.

The city's tale-murudanga rhythm in the moonlight! | नगरच्या टाळ-मृदुंगाचा पंढरीच्या वारीत नाद!

नगरच्या टाळ-मृदुंगाचा पंढरीच्या वारीत नाद!

अरुण वाघमोडे,

अहमदनगर- येथील टाळ-मृदुंगाचा पंढरीच्या वारीत नाद घुमू लागला असून, खान्देश व मराठवाडा येथील वारकरी ही वाद्ये येथून खरेदी करीत असल्याचे सुखद चित्र आहे.
पारंपरिक वाद्ये सहज उपलब्ध होत नसल्याने हस्तकलेचे कौशल्य असलेल्या कारागिरांकडेच ती दुरुस्त केली जातात़ आषाढी एकादशी २० दिवसांवर येऊन ठेपल्याने येथील कारागिरांकडे सध्या वारकऱ्यांची गर्दी दिसत आहे़ खान्देश, मराठवाड्यातील बहुतांशी दिंडी सोहळे नगर शहरातून जातात़ तेव्हा वारकऱ्यांकडून कीर्तन-भजनासाठी लागणाऱ्या वाद्यांची नगरमधून खरेदी केली जाते़ हार्मोनियम, तबला, मृदुंग, वीणा, हलगी, ढोलकी आदी कच्चा माल आणून येथे हाताने वाद्ये तयार केली जातात.

Web Title: The city's tale-murudanga rhythm in the moonlight!