नगरमध्ये प्रेमप्रकरणातून तरुणाची विवस्त्र धिंड
By Admin | Updated: March 14, 2015 04:32 IST2015-03-14T04:32:00+5:302015-03-14T04:32:00+5:30
प्रेमप्रकरण आणि मुलीला फूस लावून पळवून नेल्याच्या आरोपातून वांबोरी (ता. राहुरी) येथे शुक्रवारी एका व्यापारी कुटुंबातील तरुणाला विवस्त्र

नगरमध्ये प्रेमप्रकरणातून तरुणाची विवस्त्र धिंड
वांबोरी/ राहुरी (अहमदनगर) : प्रेमप्रकरण आणि मुलीला फूस लावून पळवून नेल्याच्या आरोपातून वांबोरी (ता. राहुरी) येथे शुक्रवारी एका व्यापारी कुटुंबातील तरुणाला विवस्त्र करत त्याची गावातून धिंड काढण्याचा संतापजनक प्रकार घडला. जमावाने तरुणाच्या वडिलांच्या अंगावरील कपडेही उतरविले आणि त्याच्या
घरातील महिला, मुली आणि मध्यस्थी करण्यासाठी आलेल्यांना बेदम मारहाण केली. पोलिसांनी १२ जणांना अटक केली आहे.
वांबोरीचे सरपंच उदयसिंह पाटील यांच्यासह गावकरी घटनास्थळी धाऊन आले. त्यांनी तरुणाची टोळक्याच्या तावडीतून सुटका केली. पोलीस अधीक्षक लखमी गौतम यांच्यासह मोठा फौजफाटा तातडीने वांबोरीत दाखल झाला होता.
गावातील मुख्य पेठेतील एका व्यापाऱ्याच्या मुलाचे बारावीत शिक्षण घेणाऱ्या मुलीशी काही महिन्यांपूर्वी प्रेमप्रकरण होते. त्याची मुला-मुलीच्या कुटुंबियांना माहिती होती. दोन्ही कुटुंबातील सदस्यांनी त्याबाबत दोघांना समजही दिली होती.