‘आॅरेंज सिटी’ नव्हे अतिक्रमण ‘स्ट्रीट’!

By Admin | Updated: August 28, 2014 02:06 IST2014-08-28T02:06:20+5:302014-08-28T02:06:20+5:30

उत्पन्नाचे स्रोत आणि शहराच्या सौंदर्यात भर घालणाऱ्या ‘आॅरेंज सिटी स्ट्रीट’च्या आराखड्यास महापालिकेच्या स्थायी समितीने मंजुरी दिली. ८५ एकरात हा प्रकल्प होणार असून, यासाठी अनेक

'City of the City' encroachment 'Street'! | ‘आॅरेंज सिटी’ नव्हे अतिक्रमण ‘स्ट्रीट’!

‘आॅरेंज सिटी’ नव्हे अतिक्रमण ‘स्ट्रीट’!

कबाडी, गोठे, बाजारांचा बोलबाला : महापालिका करणार का कारवाई ?
नागपूर : उत्पन्नाचे स्रोत आणि शहराच्या सौंदर्यात भर घालणाऱ्या ‘आॅरेंज सिटी स्ट्रीट’च्या आराखड्यास महापालिकेच्या स्थायी समितीने मंजुरी दिली. ८५ एकरात हा प्रकल्प होणार असून, यासाठी अनेक वर्षापासून जागाही आरक्षित करण्यात आली आहे. मात्र या जागेवर अतिक्रमण करून अनेकांनी व्यवसाय थाटले आहेत. कबाडीच्या दुकानांपासून ते गाई-म्हशींच्या गोठ्यांपर्यंत सर्वांचाच बोलबाला आहे. साडेचार हजार कोटींचा प्रकल्प उभारण्याचा संकल्प करणारी महापालिका आधी ही कोट्यवधी रुपयांची जागा अतिक्रमणाच्या विळख्यातून मुक्त करेल का, हा खरा प्रश्न आहे.
वर्धा रोड ते हिंगणा रोडला जोडणारा, नागपूरचे रूप पालटणारा, आंतरराष्ट्रीय दर्जाचा प्रकल्प नागपूर महापालिकेने हाती घेतला आहे. पूर्वी या प्रकल्पाला ‘लंडन स्ट्रीट’ हे नाव होते. याच नावाने सोमलवाडा येथून थेट जयताळा आणि पुढे हिंगणा रोडपर्यंत जागा आरक्षित करण्यात आली आहे. जागेवर अतिक्रमण होऊ नये म्हणून, जागेच्या दुतर्फा भिंती उभारल्या आहेत. परंतू लंडन स्ट्रीटच्या नावाने हा प्रकल्प विकसित होऊ शकला नाही. अनेक वर्षापासून हा प्रकल्प थंडबस्त्यात पडला होता. महापालिकेने अचानक या प्रकल्पाला ‘आॅरेंज सिटी स्ट्रीट’ या नावाने बीओटी तत्त्वावर विकसित करण्याचा निर्णय घेतला. मात्र प्रकल्पासाठी आरक्षित केलेल्या या जागेवर सध्या अतिक्रमणाचा विळखा आहे.
सोमलवाडा ते जयताळा या दरम्यान दोन बाजार या रस्त्यावर भरतात. प्रकल्पाच्या भिंतीला लागून वसलेल्या दुधवाल्यांनी म्हशीचे गोठे प्रकल्पात बांधले आहे. पानटपऱ्या, नाश्त्याची दुकाने, भाजीविक्रेते, कबाडीवाले यांचे अतिक्रमण तर जागोजागी आहे. काही बिल्डर्सनी तर कामगारांची वसाहतच या जागेवर बसविली आहे. त्याचप्रमाणे परराज्यातून पोट भरण्यासाठी नागपुरात आलेल्या काही नागरिकांनी या जागेवर कच्ची वसाहतच बनविली आहे. शेकडोच्या संख्येने येथे लोक राहत आहे. एका कंपनीनेसुद्धा आपले साहित्य ठेवण्यासाठी या जागेवर अतिक्रमण केले आहे. एका जागेवर मंदीरही बांधण्यात आले आहे. बांधलेली संरक्षक भिंत अतिक्रमणधारकांनी जागोजागी तोडली आहे.
परिसरात राहणाऱ्या लोकांनी या जागेचा उपयोग ‘डम्पिंंग यार्ड’ म्हणून करण्यास सुरुवात केली आहे. प्रकल्पाच्या उत्तरेकडे मोठ्या प्रमाणात वसाहती वाढल्याने संरक्षक भिंती पाडून रस्ते तयार केले आहेत. मध्येच रेल्वेचे सुद्धा अतिक्रमण आहे.
प्रकल्पाच्या जागेवर आठवडी बाजार
वर्धारोडवरील सोमलवाडा येथून प्रकल्पाची सुरुवात होणार आहे. प्रकल्पाच्या अगदी सुरुवातीलाच आठवडी बाजार भरतो आहे. दक्षिण-पश्मिच नागपुरात सोमलवाड्याचा शनिवार बाजार अतिशय प्रसिद्ध आहे. जवळपास २०० च्यावर विक्रेते बाजारात आपला व्यवसाय करतात. बाजारासाठी प्रकल्पाच्या जागेवर ओटे बांधण्यात आले आहे. नाश्त्याचे ठेले, पानटपरीचालक अनेक वर्षांपासून येथे व्यवसाय करीत आहे. तर प्रकल्पाचा शेवटचा टप्पा जयताळ्याचा आहे. शेवटच्या टप्प्यातही रविवारी आठवडी बाजार भरतो. या बाजारातही हिंगणा आणि परिसरातील लोकांना सोयीस्कर झाले आहे. हा बाजारसुद्धा आरक्षित जागेवर भरतो आहे. येथेही बाजारासाठी ओटे बांधण्यात आले आहे. बाजारामुळे अनेकांना छोटामोठा रोजगार मिळाला आहे. बाजारासाठी विक्रेत्यांनी बांधलेल्या भिंती तोडून आपले व्यवसाय थाटले आहे. या दोन आठवडी बाजाराबरोबरच खामला परिसरात नियमित बाजारपेठ आहे. प्रकल्पाच्या भिंतीला लागून हे भाजी विक्रेते अनेक वर्षापासून आपला व्यवसाय करीत आहे. काही विक्रेत्यांनी येथे स्थायी निवाराही केला आहे. भाज्यांची साठवणूक आरक्षित जागेत होत आहेत. दोन आठवडी बाजार आणि खामल्याच्या नियमित बाजारपेठेचे अतिक्रमण प्रकल्पासाठी डोकेदुखी आहे.
कबाडीवाल्यांनी
थाटले व्यवसाय
वर्षानुवर्षापासून रिकाम्या पडलेल्या या जागेचा सर्वात चांगला उपयोग कबाडी व्यावसायिकांनी केला आहे. मोकळी जागा असल्याने कबाडीवाल्यांनी आपली दुकानदारी थाटली आहे. कबाडीचा माल साठविण्यासाठी प्रकल्पाच्या जागेचा ते उपयोग करीत आहे. अनेक वर्षापासून त्यांचा हा व्यवसाय सुरू आहे. सोमलवाडा ते जयताळादरम्यान ४ ते ५ कबाडीवाले या जागेवर व्यवसाय करीत आहेत.
बिल्डरने कामगारांसाठी बांधली वसाहत
सहकारनगर परिसरात आॅरेंज सिटी स्ट्रीटला लागून एका भव्य स्कीमचे काम सुरू आहे. या बिल्डरने प्रकल्पासाठी आरक्षित पडून असलेल्या या जमिनीचा अतिशय चांगला उपयोग केला आहे. या स्कीमवर काम करणाऱ्या शेकडो मजुरांना बिल्डरने झोपड्या बांधून स्थायी घरकुल उपलब्ध करून दिले आहे. बिल्डरने साहित्याची ने-आण करण्यासाठी क म्पाऊंडच्या भिंती पाडून रस्ता तयार केला आहे.

Web Title: 'City of the City' encroachment 'Street'!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.