नगर पुन्हा हदरले, धरमडीजवळ महिलेवर अत्याचार
By Admin | Updated: August 21, 2016 12:29 IST2016-08-21T12:29:59+5:302016-08-21T12:29:59+5:30
नगर-मनमाड राज्यमार्गावर राहुरीत तालुक्यातील धरमडीजवळ एका महिलेवर अत्याचार झाल्याची घटना शनिवारी सायंकाळी घडली

नगर पुन्हा हदरले, धरमडीजवळ महिलेवर अत्याचार
ऑनलाइन लोकमत
अहमदनगर, दि. २१ : नगर-मनमाड राज्यमार्गावर राहुरीत तालुक्यातील धरमडीजवळ एका महिलेवर अत्याचार झाल्याची घटना शनिवारी सायंकाळी घडली. मोटारसायकलवरून जाणारे जोडपे लघुशंकेसाठी थांबले असताना दोघा तरुणांनी या महिलेवर अत्याचार केला. याबाबत रात्री उशीरापर्यंत गुन्हा नोंदविण्याचे काम सुरु होते.
मोटारसायकलवरून एक पुरूष व एक महिला नगरच्या दिशेने जात होते. दोघे धरमडीनजिक लघुशंकेसाठी थांबले असता अचानक त्या ठिकाणी दोन युवक आले. त्यांनी या महिलेवर अत्याचार केला.
महिलेवर अत्याचार झाल्याच्या घटनेची माहिती मिळताच धरमडी येथे लोकांनी गर्दी केली. पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी दोघांना राहुरी पोलीस ठाण्यात आणले. तेथे दोघांचे जबाब घेण्याचे व गुन्हा नोंदविण्याचे काम रात्री उशीरापर्यंत सुरू होते.