शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
2
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
3
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
4
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
5
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
6
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
7
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
8
Abhishek Sharma Record : फक्त १३ चेंडूत गुरु युवीसह किंग कोहलीचा मोठा विक्रम मोडण्याचा पराक्रम
9
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
10
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
11
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
12
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
13
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
14
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
15
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
17
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
18
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान
19
अशोक चव्हाणांसारखा ‘वनवास’ सर्वांना मिळो हीच कार्यकर्त्याची भावना; काँग्रेसचा खोचक टोला
20
"आम्हीही खूप काही बोलू शकतो, मी जर तिथे असतो तर..."; हस्तांदोलन प्रकरणावर शोएब अख्तर बरळला

राज्यातील नागरिकही आमच्याच सोबत - नरेश म्हस्के

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 14, 2024 10:19 IST

नागरिक तुमच्यासोबत नाहीत, असा अपप्रचार केला जात असल्याचे म्हस्के यांनी नमूद केले.

नरेश म्हस्के प्रवक्ते, शिंदेसेनाखासदार, आमदार, लोकप्रतिनिधी तुमच्यासोबत असले, तरी नागरिक तुमच्यासोबत नाहीत, असा अपप्रचार केला जात आहे. परंतु, जे खासदार, आमदार, लोकप्रतिनिधी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सोबत आले आहेत, ते नागरिकांच्या विश्वासावरच आले आहेत. त्यामुळे अपप्रचाराचे परिणाम येत्या काही दिवसांत दिसतील. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे विचार, हिंदुत्वाचे विचार पुढे घेऊन जाण्याचे काम मुख्यमंत्री करीत आहेत. देशाच्या विकासासाठी मोदी यांना पंतप्रधान करायचे आहे, देशाची अर्थव्यवस्था बळकट करायची आहे, विकासाची कामे करायची आहेत, म्हणूनच आम्ही महायुतीत आहोत.

मुंबईत सहा मतदारसंघ आहेत, त्यातील तीन शिंदेसेनेला मिळतील, तर तीन मतदारसंघांत भाजप लढेल. या सहा मतदारसंघांतून विकासाची कामे नागरिकांपर्यंत नेण्याचे काम केले जात आहे. मतदार याद्यांवर काम करण्यासाठी प्रत्येक ठिकाणी १० शिवदूतांची नेमणूक केली आहे. मुंबई ठाण्याच्या जागेचा तिढा अद्याप सुटला नसला, तरी काही दिवसांत उमेदवाराची घोषणा होईल. प्रत्येक पक्षाला आपला पक्ष वाढावा, अशी अपेक्षा असते. त्यामुळे ठाण्यावर कोणी दावा केला, तर त्यात गैर काहीच नाही. परंतु, जो कोणी उमेदवार असेल, तो महायुतीचा असेल. आम्ही तर मोदी हेच आमचे उमेदवार आहेत, असे समजतो. ठाणे जिल्हा शिवसेनेच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. ठाण्यासह इतर आजूबाजूच्या शहरांचा विकास होत असून, ठाणे हे राहण्यायोग्य शहर असल्याने या शहराला प्राधान्य दिले जात आहे.

यापूर्वीही शिवसेनेची होती, यापुढेही शिवसेनेचीच राहणार आहे. 'गद्दारी विरुद्ध निष्ठावंत' अशी टीका केली जाते, परंतु बाळासाहेबांच्या विचारांशी गद्दारी कोणी केली? ज्या काँग्रेसने नेहमी सावरकरांचा तिरस्कार केला, त्यांच्या मांडीला मांडी लावून कोण बसले आहे?, महायुतीचा धर्म कोणी मोडला?, हिंदुत्वाचे विचार बाजूलाकोणी सारले?, ज्या दिवशी काँग्रेससोबत जाण्याची वेळ येईल, त्या दिवशी मी माझा पक्ष बंद करेन, असे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे सांगायचे. मात्र, त्याच काँग्रेसबरोबर जवळीक कोणी साधली?, स्वार्थासाठी हिंदुत्वाला तिलांजली देत मुख्यमंत्रीपद कोणी मिळविले?, त्यामुळे गद्दार व निष्ठावंत कोण, हे आम्हाला कोणी सांगायची गरज नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांचे सरकार आल्यानंतर महाराष्ट्राने अनेक बदल पाहिले. बंद प्रकल्प सुरू केले. मुंबई, ठाणे जिल्ह्यात विकासाची कामे झपाट्याने झाली आहेत. रस्त्यांची कामे, मेट्रो, कोस्टल रोड, सौंदर्गीकरणाची कामे आदींसह वाहतूककोंडी सोडविण्यावर भर दिला आहे. 

टॅग्स :lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४Shiv Senaशिवसेना