शहरं
Join us  
Trending Stories
1
अजित पवारांची सरकारमधून बाहेर पडण्याची तयारी?; 'वर्षा'वरील बैठकीत दादा संतापले, दानवेंचा दावा
2
डॉ. मुजम्मिलच्या डायरीतून समोर आलं मोठं गुपित, 'कोड वर्ड'मध्ये लिहिला होता दहशतीचा प्लॅन! आणखी 25 नावं समोर
3
आधीच BCCIची रोहित शर्माला 'वॉर्निंग'; त्यात आता MCAच्या 'त्या' विधानाने वाढवलं 'टेन्शन'
4
Groww Share Price Today : Groww च्या शेअर्सची दुसऱ्या दिवशीही जोरदार घोडदौड! गुंतवणूकदारांना ५०% हून अधिक फायदा, केलं मालामाल
5
दहशतवाद्यांसाठी काळ बनून आले 'हे' IPS अधिकारी; एका पोस्टरवरुन केला मोठ्या कटाचा खुलासा
6
दिल्ली स्फोटाची भीषणता! लाल किल्ल्यापासून ३०० मीटर दूर दुकानाच्या छतावर सापडला मानवी हात; मृतांचा आकडा १३ वर
7
पाकिस्तानची अफगाणिस्तान अन् भारताला पोकळ धमकी; एकाचवेळी युद्ध करण्याची क्षमता आहे किती?
8
SIP द्वारे कोट्यधीश व्हायचंय? '१०-७-१०' हा फॉर्म्युला येईल कामी; श्रीमंत होण्यापासून कोणीही थांबवू शकणार नाही
9
पार्थ पवारांच्या कंपनीला सूट द्यायची आहे का? बावनकुळेंच्या प्रश्नामुळे मुद्रांक शुल्क विभागच संभ्रमात
10
खळबळजनक! लेकाला PUBG चं व्यसन, कंटाळलेल्या आईने अखेर संपवलं जीवन, वडील म्हणतात...
11
CM देवेंद्र फडणवीस आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे एकाच मंचावर येणार; दोघांची भेट लक्षवेधी ठरणार
12
तहसीलदार पदावरून ४ वेळा निलंबन; ‘कामाची’ सवय असलेले सूर्यकांत येवले लाच प्रकरणांतही आघाडीवर
13
सोशल मीडियावर रातोरात व्हायरल झाली गिरीजा ओक, पहिल्यांदाच प्रतिक्रिया देत म्हणाली...
14
दिल्लीत स्फोटापूर्वी मशिदीत गेला होता दहशतवादी डॉ. उमर नबी; स्फोटाच्या आधीचे सीसीटीव्ही समोर
15
अल-कायदाचा माजी कमांडर; व्हाईट हाऊसमध्ये अल-शरा आणि डोनाल्ड ट्रम्प यांची ऐतिहासिक भेट
16
“बूट फेकीसारख्या घटना पुन्हा घडू नये यासाठी काय उपाय करता येईल?”; सुप्रीम कोर्टाचा सवाल
17
कर्तव्यनिष्ठेला सलाम! कुशीत बाळ अन् हातात मशीन... आई करतेय कंडक्टरचं काम; 'ती'चा संघर्ष
18
'या' सरकारी बँकेचा ग्राहकांना मोठा दिलासा; घर घेण्याच्या विचारात असाल तर, पाहा काय आहेत नवे दर?
19
Delhi Blast : व्हाईट कॉलर टेरर मॉड्यूल! दिल्ली स्फोट प्रकरणात आणखी एका डॉक्टरला घेतलं ताब्यात
20
Delhi Blast: दिल्ली बॉम्बस्फोटातील कारची ११ वर्षात ५ वेळा विक्री; खरा मालक कोण, शेवटचा व्यवहार कधी झाला?

सांगलीमधील अनाथ बालकाला इटलीचे नागरिक त्व

By admin | Updated: October 20, 2015 23:52 IST

दत्तक विधान : भारतीय समाज सेवा केंद्राचा पुढाकार; संस्थेला परदेशात दत्तक प्रक्रिया राबविण्यास शासनाची मंजुरी

सांगली : चिमुकल्या अनाथ जिवांना मायेची सावली देणाऱ्या सांगलीच्या भारतीय समाज सेवा केंद्राने आता दत्तक प्रक्रियेत देशाच्या सीमा ओलांडून पुढे जाण्यास सुरुवात केली आहे. शासनाने दिलेल्या परवानगीच्या आधारे प्रथमच येथील एका सहा वर्षाच्या बालकास इटलीतील कुटुंबास दत्तक देण्यात आले आहे. संस्थेतील सहा वर्षाच्या ‘नभी’ या बालकाला इटली येथील शिवकुमार कॅपेर डोनी यांनी दत्तक घेतले आहे. यामुळे सांगलीतील हे बालक आता इटलीचा नागरिक बनणार आहे. जिल्हा पोलीसप्रमुख सुनील फुलारी यांच्या उपस्थितीत मंगळवारी दत्तक विधानाचा हा कार्यक्रम झाला.या केंद्राकडून आजपर्यंत भारतामध्ये बालकांना दत्तक देण्याचे काम होत होते. यावर्षी या संस्थेला परदेशातील कुटुंबांसाठीही दत्तक प्रक्रिया करण्यास शासनाने मंजुरी दिली आहे. या निर्णयामुळे सांगलीतून परदेशात दत्तक देण्याची पहिलीच घटना झाल्याचे संस्थेकडून सांगण्यात आले. सांगली येथील घनशामनगरमधील भारतीय समाज सेवा केंद्र ही संस्था ० ते ६ वयोगटातील अनाथ, दुर्लक्षित बालकांचे संगोपन करीत आहे. दत्तक देऊन त्यांच्या पुनर्वसनाचे महत्त्वपूर्ण काम करीत आहे. यावर्षीपासून शासनाने परदेशातील कुटुंबांसाठीही दत्तक देण्यासाठी संस्थेला परवानगी दिली आहे. शासनाच्या या निर्णयानुसार संस्थेतील पहिलेच बालक इटलीचे नागरिक बनणार आहे. यावेळी फुलारी म्हणाले की, अनाथ मुलांना सांभाळणे आणि त्यांच्यासाठी संस्था चालविणे कठीण काम आहे. तरीही या संस्थेतर्फे उत्तम पध्दतीने हे काम केले जात आहे. बालकांना त्यांचे हक्काचे घर मिळवून देण्याचे खूप मोठे काम ही संस्था करीत आहे. त्यांना जिल्हा पोलिसांचे सर्व पाठबळ राहील.वास्तुविशारद प्रमोद चौगुले म्हणाले की, पूर्वी मुलांना दत्तक घेण्याकडे कुटुंबांचा कल फारसा दिसत नव्हता. परंतु, सध्या या मुलांना दत्तक घेण्यासाठी वेटिंग आहे, ही कौतुकाची बाब आहे. यावेळी डॉ. सुहास भावे, डॉ. दिलीप करमरकर, रोहिणी तुकदेव, अ‍ॅड. हरिष प्रताप यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. (प्रतिनिधी)हक्काचे घर मिळाल्याचे समाधानआमच्या संस्थेत मूल राहणे ही आमच्यादृष्टीने खूप चांगली गोष्ट नाही. त्या बालकास येथे दर्जेदार सुविधा मिळतात. पण त्यांनाही त्यांचे हक्काचे घर, आई-वडील असण्याची गरज आहे. ज्यावेळी त्या बालकास हक्काचे घर मिळते, त्यावेळी आम्हाला खूप आनंद होतो, असे केंद्राच्या संचालिका उज्ज्वला परांजपे यांनी स्पष्ट केले.