शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

CAA: जामियाची जालियनवालाशी तुलना हा तर शहिदांचा अपमान; फडणवीसांचा मुख्यमंत्र्यांवर पलटवार

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2019 17:19 IST

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना देवेंद्र फडणवीसांकडून जोरदार प्रत्युत्तर

नागपूर: जामिया विद्यापीठात झालेल्या घटनांची तुलना जालियनवाला बाग हत्याकांडाशी करणाऱ्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणीसांनी प्रत्युत्तर दिलं आहे. उद्धव ठाकरेंचं विधान देशासाठी सर्वस्व अर्पण करणाऱ्या तमाम शहिदांचा अपमान असल्याचं म्हणत फडणवीसांनी उद्धव ठाकरेंवर पलटवार केला आहे. जामिया विद्यापीठात दिलेल्या घोषणांशी उद्धव ठाकरे सहमत आहेत का, असा सवालदेखील त्यांनी उपस्थित केला आहे. फडणवीस यांनी दोन ट्विट करत घोषणांचे व्हिडीओदेखील शेअर केले आहेत.  'जामिया विद्यापीठातील घटनेची तुलना मुख्यमंत्री श्री उद्धव ठाकरे यांनी जालियनवाला बागशी करणं हा देशासाठी सर्वस्व अर्पण करणाऱ्या तमाम शहीदांचा अपमान आहे. जे नारे त्याठिकाणी दिले गेले, त्याच्याशी उद्धवजी सहमत आहेत का, याचं उत्तर त्यांनी कृपया देश आणि महाराष्ट्राला द्यावं', अशा शब्दांत फडणवीसांनी उद्धव ठाकरेंना प्रत्युत्तर दिलं. फडणवीसांनी ट्विट करुन उद्धव ठाकरेंवर शरसंधान साधताना सोबत एक व्हिडीओ शेअर केला आहे. त्यामध्ये विद्यार्थी आझादीच्या घोषणा देताना दिसत आहेत. 'अशाशा आंदोलनांना प्रोत्साहन देणं यावरून तडजोडीची किती मोठी परिसीमा तुम्ही गाठली आहे, हे आता स्पष्ट झाले आहे,' असा हल्लाबोल फडणवीसांनी दुसऱ्या ट्विटमधून केला आहे. या ट्विटसोबतही त्यांनी एक व्हिडीओ शेअर केला आहे.  नागपूरमध्ये सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनात मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी जामिया विद्यापीठातल्या परिस्थितीवरुन मोदी सरकारला लक्ष्य केलं. देशात आणि राज्यात अस्थिरतेचं, अशांततेचं वातावरण निर्माण केलं जातं. दिल्लीच्या विद्यापीठ परिसरात विद्यार्थ्यांवर गोळीबार केला. जालियनवाला बाग हत्याकांडासारखं वातावरण देशात निर्माण केलं जातंय का, याची शंका उपस्थित होते. संपूर्ण जगात भारत सर्वाधिक जास्त तरुण असलेला देश असणार आहे. त्यामुळे ही युवाशक्ती आहे, बॉम्ब आहे याची वात पेटवण्याचा प्रयत्न करु नये, अशा शब्दात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नरेंद्र मोदी सरकारवर घणाघात केला. ज्या देशातील युवक बिथरतो, तो देश स्थिर राहू शकत नाही. युवक देशाची शक्ती आहे. भावी आधारस्तंभ आहेत. युवकाला बिथरवू नका असं आवाहन त्यांनी केलं.

 

टॅग्स :citizen amendment billनागरिकत्व सुधारणा विधेयकDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसUddhav Thackerayउद्धव ठाकरेShiv SenaशिवसेनाBJPभाजपा