शहरं
Join us  
Trending Stories
1
नेहरू, इंदिरा गांधी अन् सोनिया गांधी...! अमित शाह यांनी थेट लोकसभेत दिली मत चोरीची 3 उदाहरणं, स्पष्टच बोलले
2
भरधाव ब्रेझा उभ्या असलेल्या वॅगनआरला धडकली, दोन्ही कारने घेतला पेट; 5 जणांचा मृत्यू
3
'उपमुख्यमंत्र्यांच्या मुलाला वाचवताय का?'; मुंढवा जमीन घोटाळ्याच्या FIR वर हायकोर्टाचा पोलिसांना थेट सवाल
4
STवर ४ हजार कोटींचा आर्थिक भार, देणी कधीपर्यंत फेडणार?; प्रताप सरनाईकांनी तारीखच सांगितली
5
स्मृती मानधना लग्न मोडल्यावर पहिल्यांदाच सर्वांसमोर, 'तिला' पाहताच मारली मिठी... (VIDEO)
6
समसप्तक वसुमान योगात कालाष्टमी २०२५: ६ राशींना धनलाभ योग, चौपट भरभराट; पण पैसे उसने देऊ नका!
7
अयोध्येच्या राम मंदिरात दर्शन घ्यायला केव्हा जाणार? अखिलेश यादव यांनी काय उत्तर दिलं पाहा
8
"काय बोलायचं ते मी ठरवेन, तुम्ही सांगू नका..."; अमित शाह-राहुल गांधींमध्ये लोकसभेत खडाजंगी
9
रोहित शर्मा नंबर १, विराट कोहली नंबर २ ... ताज्या ICC ODI क्रमवारीत टीम इंडियाचा धुमधडाका
10
“ज्यांनी लाडकी बहीण योजना आणली ते १ नंबरवरून दोनवर गेले”; जयंत पाटलांचा एकनाथ शिंदेंना टोला
11
चालत्या बसमधून उचलून २ महिने जेलमध्ये डांबलं; टॉपर विद्यार्थ्याला अडकवणारे पोलीस CCTV मुळे फसले
12
"EVM नव्हे, पंतप्रधान मोदी...!"; कंगना रनौतचा काँग्रेसवर जोरदार निशाणा, स्पष्टच बोलल्या
13
IPL 2026 Auction : मिनी लिलावाच्या फायनल यादीत घोळ! विराट-क्रिसचं नाव झालेले ‘गायब’, आता...
14
“भारतात राहणाऱ्या विरोधी पक्षनेत्याची देशाला गरज”; राहुल गांधींचे परदेश दौरे अन् भाजपाची टीका
15
तिरुपती मंदिरात ‘शाल’ घोटाळा, १०० रुपयांचं पॉलिस्टर १४०० रुपयांचं रेशीम असल्याचं सांगून विकलं  
16
‘तुम्हाला स्वप्नात पाहिलंय, कॉल करा ना?’, महिला DSP चं मधाळ चॅट आणि करोडपती झाला कंगाल
17
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहि‍णींना २१०० रुपये कधी मिळणार?; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची विधानसभेत मोठी घोषणा
18
चेहऱ्यावरचा नॅचरल ग्लो वाढवण्यासाठी दररोज किती पाणी प्यावं? डर्मेटोलॉजिस्टने दिलं अचूक उत्तर
19
गोवा क्लब अग्निकांड: थायलंडमधून प्रत्यार्पण टाळण्यासाठी लूथरा बंधूंची कोर्टात धाव; वकिलांचा अजब युक्तिवाद
20
बाजार सलग तिसऱ्या दिवशी कोसळला! फेड रिझर्व्हच्या धास्तीने १.०९ लाख कोटींचे नुकसान; काय आहे कारण?
Daily Top 2Weekly Top 5

‘सीआयएसएफ’चे सुरक्षारक्षकांना सक्षमतेचे धडे

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 6, 2025 08:45 IST

भारताच्या हायब्रीड बंदर सुरक्षा मॉडेलच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल उचलत केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल (सीआयएसएफ)ने बंदरांवर तैनात खासगी सुरक्षा कर्मचाऱ्यांसाठी विशेष प्रशिक्षण कार्यक्रम सुरू केला.

लोकमत न्यूज नेटवर्क अलिबाग: भारताच्या हायब्रीड बंदर सुरक्षा मॉडेलच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल उचलत केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल (सीआयएसएफ)ने बंदरांवर तैनात खासगी सुरक्षा कर्मचाऱ्यांसाठी विशेष प्रशिक्षण कार्यक्रम सुरू केला आहे. जवाहरलाल नेहरू पोर्ट अथॉरिटी, मुंबई आणि चेन्नई पोर्ट अथॉरिटी येथे एकाच वेळी हा उपक्रम सुरू झाला. दोन आठवड्यांचा सुरक्षा अभ्यासक्रमातून बंदर कार्यपद्धती, धोके ओळखणे आणि आपत्कालीन प्रतिसाद यासंबंधी आवश्यक ज्ञान दिले जाणार आहे.

यामुळे घेतला निर्णयभारतामध्ये सुमारे २०० लहान आणि मध्यम बंदरे आहेत. त्यातील सुमारे ६५-६८ बंदरे सक्रियपणे मालवाहतुकीच्या कार्यात गुंतलेली आहेत. सीआयएसएफ सर्व १३ प्रमुख बंदरांची सुरक्षा पुरविते, तर खासगी सुरक्षा एजन्सी लहान बंदरांवर मालवाहतूक क्षेत्र, गोदामे, प्रवेशद्वारे आणि इतर सुविधांची सुरक्षा सांभाळतात. बंदर प्राधिकरण, सीमा शुल्क विभाग, शिपिंग कंपन्या, मालवाहतूक एजंट्स, आदी संबंधित घटकांशी सल्लामसलत करून हा प्रशिक्षण कार्यक्रम पायलट प्रकल्पाच्या स्वरूपात सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. 

४० कर्मचाऱ्यांची नोंद जेएनपीए शेवा, डीपीए कांडला आणि एमपीए मुंबई या तीन प्रमुख बंदरांतील ४० खासगी सुरक्षा कर्मचाऱ्यांनी जेएनपीए प्रशिक्षण केंद्र, मुंबई येथे नोंदणी केली आहे. तसेच न्यू मंगळुरू पोर्ट अथॉरिटी, कामराजर पोर्ट लिमिटेड एन्नोर, चेन्नई पोर्ट अथॉरिटी आणि वी. ओ. चिदंबरनार पोर्ट अथॉरिटीच्या २६ जणांची नोंद झाली आहे.

भारताच्या हायब्रीड बंदर सुरक्षा मॉडेलला बळकटीसाठी महत्त्वपूर्ण पाऊल आहे. यामुळे खासगी सुरक्षा कर्मचाऱ्यांची क्षमता वाढेल. आंतरराष्ट्रीय मानकांचे पालन अधिक प्रभावीपणे सुनिश्चित होईल.पी. एस. रणपिसे, अतिरिक्त महासंचालक (दक्षिण)

बंदरांच्या गुंतागुंतीच्या वातावरणानुसार केंद्रित प्रशिक्षण देऊन सुरक्षा कर्मचाऱ्यांना आत्मविश्वास आणि व्यावसायिकतेसह त्यांच्या कर्तव्यांचे पालन करण्यासाठी सक्षम करीत आहोत. व्यापाराची सुरक्षा सुनिश्चित होत आहे.सरवनन, महानिरीक्षक (सीआयएसए) दक्षिण विभाग मुख्यालय

टॅग्स :alibaugअलिबागMaharashtraमहाराष्ट्र