दुष्काळीनिधीसाठी राज्यात सिगारेट, दारु, विडी महागणार
By Admin | Updated: September 30, 2015 15:13 IST2015-09-30T14:10:40+5:302015-09-30T15:13:15+5:30
धूम्रपान व मद्यपान करणारे तसेच वाहनचालकांच्या खिशाला आता कात्री लागणार आहे. दुष्काळनिधीसाठी राज्य सरकारने सिगारेट, विडी, दारुवर पाच टक्के अतिरिक्त कर वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.

दुष्काळीनिधीसाठी राज्यात सिगारेट, दारु, विडी महागणार
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. ३० - धूम्रपान व मद्यपान करणारे तसेच वाहनचालकांच्या खिशाला आता कात्री लागणार आहे. दुष्काळनिधीसाठी राज्य सरकारने सिगारेट, विडी, दारुवर पाच टक्के अतिरिक्त कर वाढवण्याचा निर्णय घेतला असून पेट्रोल व डिझेलवरील करातही वाढ केली जाणार आहे. याशिवाय हिरे व सोन्याचे दागिने यावरील व्हॅटमध्येही किरकोळ वाढ करण्यात आली आहे.
पावसाने पाठ फिरवल्याने राज्यभरात दुष्काळाचे संकट ओढावली आहे. दुष्काळ निधी उभारणीसाठी राज्य सरकारने सिगारेट, विडी, दारुवरील करात वाढ केली आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. पेट्रोल, डिझेल, सोन्याचे व हि-याचे दागिने यामधील करातही किरकोळ वाढ करण्यात आली आहे. या करवाढीतून राज्य सरकारच्या महसूलात तब्बल १६०० कोटी रुपयांची भर पडेल. पाच महिन्यांसाठी ही करवाढ लागू असणार आहे. तसेच पेट्रोल व डिझेलवरील एलबीटी रद्द करण्याचा महत्त्वाचा निर्णयही सरकारने घेतला आहे. एलबीटी रद्द केल्याने सरकारच्या तिजोरीवर ३५० कोटी रुपयांचा अतिरिक्त भार पडणार आहे.